फक्त सुगंध किंवा पचन होण्यासाठी नाही तर सौफचे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत !

0

लहान असताना पाहुण्या मंडळीची नजर चुकवून आणि आई-वडिलांचे लक्ष नसताना पानपुड्यातून गुपचूप उचलल्या गेलेली वस्तू म्हणजे सौफ. मुखात सुगंध म्हणून किंवा चांगल पचन व्हावं म्हणून जनसामान्याचा मोठा वर्ग जेवणानंतर सौफ खाणे पसंत करतो. जर तुम्हालाही सौफ खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे माझ्याकडे. मुखात सुगंध म्हणून किंवा चांगली पचनक्रिया सोडलं तरी सौफचे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत. चला तर एक नजर टाकूया त्या फायद्यांवर.

सौफचा चहा : सौफचा चहा प्यायल्याने शरीरातील उर्वरित तरल पदार्थ फ्लश केले जातात आणि आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरात तसे तरल पदार्थ असल्याने डोळ्यांवर सुजन वैगेरे देखील होऊ शकते. सौफमध्ये असलेल्या डीएफोरेटिक गुणधर्मामुळे आपल्याला घाम सुद्धा कमी येतो. एक-दिड चमचे सौफ पावडर 1 कप पाण्यात मिसळा आणि 7 ते 10 मिनिटे उकळवा. असा चहा तुमच्या शरीरातील मूत्रपिंडासाठी खूप फायद्याचा असतो.

 वजनात कमी : सौफचा वापर केल्याने तुम्ही तुमचं वजन देखी कमी करू शकता. वाढत्या वजनावर प्रतिबंध घालायला सौफ एक उत्तम उपाय आहे कारण सौफ खाल्ल्याने माणसाची भूक कमी होते. आपलं पोट भरलं असल्यासारखे वाटते आणि त्यामुळे आपण कमी जेवण करतो किंवा कमी खाद्य खातो. ताजे सौफ नैसर्गिक चरबी म्हणून काम करते. हे पचनक्रियेला उत्तेजित करते आणि चरबी पचवायला मदत देखील करते.

 कर्करोगाविरुद्ध लढा : सौफ कोलोन-कर्करोगाविरुद्ध लढायला मानवी शरीराला मदत करते. ही अत्यंत मदतगार आहे कारण ब्रूहदंत्रामधून कर्करोगासाठी कारणीभूत असणार्या विषारी द्रव्यांचा नाईनाट करते. या शिवाय सौफ मध्ये इथेनॉल नावाचे एक उत्तम एंटी-इंफ्लेमेटरी फायटोनुट्रिएंट असते जे कर्करोगावर प्रतिबंध घालण्यास मदत करते. २०१२ मध्ये झालेल्या टेक्सास विश्वविद्यालयाच्या एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे कि फायटोनुट्रिएंट ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींना थांबविण्यास देखील मदत करते.

नेत्रसुख : दिल्ली इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल साइंस आणि रिसर्च च्या संशोधकांच्या असं लक्षात आलं कि सौफ डोळ्यांचा ताण कमी करतो आणि रक्त वाहिन्यांना पसरण्यात आणि सुरळीतपणे चालण्यास देखील मदत करतो. मोतीबिंदूचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे; त्यामुळे अनेक लोकांना आपली दृशी गमवावी लागते. सौफ मोतीबिंदू पासून देखील आपलं संरक्षण करते पण किती प्रमाणत करते याचे अजूनपर्यंत आकलन करण्यात आलं नाहीये.

 त्वचा आणि हाडे : सौफमध्ये एंटीमिक्राबियल (प्रतिजैविक) गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेची समस्या देखील दूर होऊ शकते. त्वचेची स्वच्छता करण्यासाठी; त्वचा उजळविण्यासाठी , उकळत्या पाण्यात सौद टाकून त्याला उकळू द्या आणि उकळल्यानंतर ते थंड करायला ठेवा. हे मिश्रणात फनेल ऑइलचे काही थेंब मिसळा आणि ते मिश्रण फिल्टर करा. मिश्रण आपल्या त्वचेवर कापसाने लावा ज्याने तुम्हाला तुमची उजळवायला मदत होईल.

सोबतच सौफ स्त्रियांमध्ये स्तनपान वाढवते, हर्नियाचा उपचार करण्यासाठी देखील याचा फायदा होतो, सौफ खाण्यामुळे यकृतांच्या रोगाचा धोका कमी होतो, चांगली झोप येते, हे केस देखील मजबूत करते आणि त्यांना गळण्यापासून प्रतिबंध घालते. तर हे आहेत काही फायदे सौफचे. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी शेयर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!