फ्रिज मधील थंड पाणी पिताय तर हे पहा त्याचे दुष्परिणाम !

0

आता उन्हाळा आला आहे आणि याच उन्हळ्यात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्याऊ आपल्याला पाहायला मिळतात. तहानलेल्याला पाणी पाजणे पुण्या आहे पण मग तेच पाणी जर उन्हाळ्यात पाजत असाल तर मग तुम्ही स्वर्गातच जाल हे नक्की. उन्हाळ्यात थंड पाणी आपलं पहिलं आणि शेवटचं प्रेम. माठात/मटक्यात आपण आवर्जून पाणी थंड करायला ठेवतो; काही लोकं फ्रीजमध्ये देखील ठेवतात पण तुम्हाल माहिती आहे का फ्रीजमधील थंड पाण्याचे आरोग्याला दुष्परिणाम होतात?

तुम्हाला माहिती असायला पाहिजे कि थंड पाण्याने तुमच्या शरीरावर काही दुष्परिणाम होतात ज्यामुळे येत्या उन्हाळ्यात तुम्ही काळजी घेऊन शकाल.  थंड पाणी पिणे आपल्या शरीरावर प्रभाव पाडत असते. १९७८ मध्ये 15 लोकांच्या एका गटाने अभ्यास केला आणि त्यात असे आढळले कि की शीतपेय/ पिण्याचे थंड पाणी प्यायल्याने नाकातील म्युकस थोडा घट्ट आणि जाडा होतो ज्यामुळे त्यांना आपल्या श्वसनवाहिनीद्वारे वाहून जाण्यात अडथळे येतात.

तुलना केल्या नंतर असं आढळून आलं कि गरम पाणी आणि चिकन सूप श्वसन क्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. जर तुम्ही सर्दी-ताप थंड पाणी पिऊन ठीक करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो आणखीच वाईट होऊ शकतो. 2001 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असाही लक्षात आलं कि ज्या लोकांना माईग्रेनचा त्रास आहे त्या लोकांना थंड पाणी प्यायल्याने तो त्रास वाढू शकतो.

अचलसियाशी संबंधित वेदना आणखी वाईट होऊ शकतात. प्राचीन चीनी औषधी शास्त्रांमध्ये गरम अन्नासोबत थंड पाणी प्यायल्याने शरीराचे असंतुलन होते असेही पहिल्या गेले आहे. सामान्यतः, चिनी संस्कृतीत जेवण उबदार/कोमट पाण्यासोबत किंवा गरम चहासोबत वाढल्या जाते. याचेच प्रतिबिंब जगभरातील बर्याच संस्कृतींमध्ये पहिल्या जाऊ शकते.

थंड पाण्याचे आणखी काही दुष्परिणाम आहेत: १. फ्रीजमधील पाणी शरीरासाठी हानिकारक आहे कारण ते कृत्रिम रित्या थंड केल्या जाते. माठात/मटक्यात थंड केलेले पाणी हे नैसार्गीत रित्या थंड होते, त्याचा काही दुष्परिणाम नसतो पण कृत्रिम प्रकारे थंड केलेले फ्रीजमधील पाणी तुमच्या रक्तवाहिन्यावर परिणाम करू शकते.

२. पाण्याला काही पचन व्हायची गरज नसते. आपले आतडे ते शोषून घेतात. फ्रीजचे थंडगार पाणी आतड्यांत गेलं तर आतडे आकुंचन पावतात आणि मग अन्नपचनाचा त्रास होतो. अन्न बरोबर पचत नाही आणि आणि मग त्यामुळे पोटही साफ होत नाही आणि मग होतात पोटाचे विकार.

३. जास्तच थंड पाणी प्यायल्याने तुमच्या रक्तवाहिन्यावर प्रभाव होतोच सोबत तुमच्या पेशींवर देखील होतो. तुमच्या मेटाबॉलिज्मवर थंड पाण्याचा सरळ प्रभाव पडतो.

४. फ्रीज मधील थंड पाण्याने गळा देखील खराब होऊ शकतो. जर तुम्ही रोजच थंड पाणी पीत असाल तर मग टोंसिल्सचा त्रास, श्वसनाचा त्रास, पचक्रियेचा त्रास या सगळ्या साधारण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला होतातच आणि मग त्यांना वेळीच आला घातला नाही तर त्याचा त्रास देखील वाढतो.

तर या आहेत काही गोष्टी ज्या थंड पाणी पिण्याची आवड असणाऱ्या लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. सोबतच हेही लक्षात घेतलं पाहिजे कि थंड पाणी पिणे हे काही नुकसानदायक नाही पण अति जास्त थंड पाणी पिणे हे मात्र नुकसानदायक आहेच. उन्हाळा आला आहे, तुम्ही आपली योग्य ती काळजी घ्यावी असंच आम्हला वाटते. आणखी अश्या अश्या माहितीसाठी स्टार मराठीच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!