बघा कशाने बनतात औषधी कॅप्सूल आणि गोळ्या.. वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल..

0

रामबाण इलाज म्हणून आपल्याला झटकन बरे करण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन वर ढिगाने अलोपॅथी औषधे दिली जातात. आपण त्या कॅप्सूल आणि टॅब्लेट डॉक्टर्स च्या सांगण्यानुसार वेळेत घेतोही.. त्या चमकदार आवरण असलेल्या कॅप्सूल किती सुंदर दिसतात. पारदर्शक अवरणामुळे आतले औषधी कण देखील मजेदार वाटतात. ही औषधे कोणत्यातरी खाण्यालायक पदार्थाने बनलेली आहेत असे समजून आपण बेधडक खाऊन टाकतो. पण कधी विचार केला आहे का? की ह्यांचे हे चकचकीत आवरण कशाचं बनलेले असते..??

हे आवरण प्लास्टिक चे तर नक्की नसते. कारण प्लास्टिक आवरण आपल्याला पचणारच नाही. ते पचायला किंवा विघटन व्हायला ४०० वर्षे लागतात. म्हणून प्लास्टिक आवरण असते तर ते सरळ मलविसर्जनाच्या मार्गाने बाहेर पडून गेले असते.. मग पोटात गेल्यावर विरघळून जाणाऱ्या ह्या गोळ्यांच्या वर कशाचे असेल हे पारदर्शक आवरण..? काही वर्षांपूर्वी तुम्ही ‘प्राणी प्रेमी’ मनेका गांधी यांचे लेख किंवा बातम्या वाचल्याचं आठवत असेलच. त्यांनी सतत ह्या औषधी कंपन्यांवर आरोप केले होते की ह्या कॅप्सूल आणि गोळ्या शाकाहारी नाहीत. ह्या औषधी गोळ्या आपण सेवन करत असू तर नकळत आपण गाय आणि डुकराचे मांस सेवत आहोत. होय..!! हे खरेच आहे. ह्या पारदर्शी चकचकीत गोळ्या जिलेटीनच्या अवरणातून आपल्या पोटात जात आहेत. अगदी गूगल देखील आपल्याला हीच माहिती देतो की अलोपॅथी औषधात जिलेटीन असते..!!

हे जिलेटीन म्हणजे काय..?? ते प्राण्यांच्या मांसापासून आणि आतांड्यापासून बनलेले आवरण जे ह्या गोळ्यावर वापरले जाते. ज्या गोळ्या आवरण विरहित असतात त्या मध्ये असते प्राण्यांच्या हाडाचा चुरा..!! नक्कीच धक्कादायक आहे हा प्रकार. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या औषधी गोळ्या असोत त्यात प्राण्यांचे केस, चरबी, हाडे, मांस, आतडे असे काही ना काही आढळतेच. ह्यातली काही औषधे अतिप्रमाणात सेवन केली गेली तर आपल्याला जिवालाही धोका उद्भवू शकतो.

ह्यापैकी कोणत्याच टॅब्लेटसवर त्या शाकाहारी आहेत की मांसाहारी ह्याबद्दल काहीच माहिती दर्शवलेली नसते. खाद्यपदार्थाप्रमाणे लाल किंवा हिरवा ठिपका नसतो. ह्याबाबतीत कोर्टकचेऱ्याही झाल्या आहेत पण परिणाम शून्य झाला आहे. त्यामुळे असल्या अलोपॅथी औषधांनी तुमचा एक रोग लवकर बरा होत असला तरी दुष्परिणामही दिसून येतात. जसे की मधुमेह, कॅन्सर, लिव्हर आणि किडन्या खराब होणे, ब्रेन हॅमरेज हे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागू शकतात.

भारतात अथवा भारताबाहेर गौ हत्या फक्त मास खाण्यासाठी नव्हे तर अशा कंपन्यांच्या उत्पादनांसाठीही केल्या जात असाव्यात. कारण टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने, खाण्याचे पदार्थ, औषधे, चप्पल, बॅग आशा सगळ्याच उत्पादनांसाठी गाय आणि डुक्कराचा उपयोग केला जातो. म्हणजेच कधी जिलेटीन वापरले जाते तर कधी हाडांचा चुरा. आपल्या भारताचा इतिहास सांगतो की ह्याच दोन प्राण्यांच्या कातद्याच्या काडतुसाच्या वापरामुळे मंगल पांडे ह्यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीचा लढा दिला पण आता अपण हेच प्राणी औषध रूपाने खात आहोत.

आता अलोपॅथी चा वापर करावा की नाही हा तुमचा निर्णय आहे. तरीही ह्याच्या बदल्यात पर्यायही उपलब्ध आहेत. भारताने जगाला दिलेला आयुर्वेद हा उत्तम आणि परिणामकारक पर्याय. अशी प्राण्यांच्या मांस आणि अवयावांनी बनलेली औषधे खाण्यापेक्षा आपण आयुर्वेदाकडे नक्कीच वळून पाहावे..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!