९ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर शिल्पा शेट्टीने केलाय मोठा गौप्यस्फोट. ह्या कलाकाराशी होते प्रेमसंबंध !

0

शिल्पा शेट्टी गेली ९ वर्षे राज कुंद्राशी झालेल्या विवाहबंधनात आनंदाने राहत आहे. तिला एक मुलगा देखील आहे. असे असताना जुन्या आठवणींना आज उजाळा देत तिने चाहत्यांवर टाकलाय एक बॉम्ब. लग्नापूर्वी तिचे बऱ्याच हिरोंशी प्रेमसंबंध होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण हे प्रेमसंबंध सगळेच त्याकाळी लपवून ठेवले जायचे. ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत’ ह्या गोंडस नात्याखाली सगळेच कलाकार आपले ‘अफेअर्स’ दाबून टाकायचे.

शिल्पाने देखील ९० च्या काळात आपले संबंध उघड केले नव्हते. पण आज मात्र ती कबुली देते तिच्या खास प्रेमप्रकरणाची.. परवाना चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्या चित्रपटाच्या हिरोशी म्हणजेच ‘भाई’ सलमान खानशी तिचे संबंध जोडले गेले. सेट वर आणि सेट बाहेरही त्यांच्या मध्ये प्रेमाचे वारे वाहात होते. शिल्पा सांगते सलमान तिच्या घरी नेहमी यायचा. दिवसभर किंवा रात्रीही तो तिथेच थांबायचा.

आता रात्रीचे एका हिरॉईनच्या घरी राहणे हे समाजाला न आवडण्यासारखेच.. पण त्याचे कारण मात्र खूप मजेशिर होते. शिल्पाचे वडील आणि सलमान ह्यांच्यात खूप चांगली मैत्री होती. ते संपूर्ण कुटुंब च एकत्र खूप मजा करत. सलमान आणि शिल्पाचे पप्पा तर सोबत ड्रिंक्स पण घेत. रात्र रात्र गप्पा मारत त्यांचे हे कार्यक्रम चालत असत. सलमान शिल्पाच्या पप्पांशी सख्ख्या मुलाप्रमाणे वागत असे. त्यांच्यामध्ये बापलेकाचे घनिष्ठ नाते तयार झाले होते.

शिल्पाचे वडील देवाघरी गेले तेव्हा सलमान खूप रडला होता. ज्या घरात, ज्या टेबलावर सलमान आणि शिल्पाचे वडील बसून ड्रिंक्स घेत, गप्पा मारत, मज्जा मस्ती करत तिथे बसून सलमाने पप्पांच्या आठवणीत काही वेळ काढला. त्यांच्या आठवणी काढून तो बराच वेळ रडत होता असे शिल्पा सांगते. काही कारणाने शिल्पा आणि सलमान विभक्त झाले पण शिल्पाच्या वडिलांशी असलेले नाते सलमान कधीच विसरू शकला नाहीये.

भले आज शिल्पा आणि सलमान चांगल्या मित्रांप्रमाणे भेटतात, बोलतात पण त्यांचे प्रेमसंबंध असताना शिल्पाला कुणकुण लागली होती की मित्रता टिकवण्यातच दोघांचे भले आहे. ह्या नात्यात भविष्यात पुढे काहीच होणार नाहीये. म्हणून शिल्पा आणि सलमान ने सामंजस्याने त्यांचे प्रेमाचे नाते संपवले. शिल्पाने हे नाते तुटल्यावर राज कुन्द्रा शी लग्न केले. आता मात्र शिल्पा तिच्या संसारात खूप सुखी आहे आणि सलमान त्याच्या आयुष्यात…!!

तर असा होता शिल्पा चा गौप्यस्फोट.. धक्कादायक नव्हे तर मजेशीर.. ह्या मानलेल्या बापलेकाच्या नात्याचा खुलासा करताना शिल्पा आजही भावुक होते. तुम्हाला कश्या वाटल्या शिल्पाच्या आयुष्यातील ह्या गोड आठवणी..??!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!