Loading...

फिटनेस गर्ल शिल्पा शेट्टी करतीये पुन्हा कमबॅक !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

शिल्पा शेट्टी हिचं बॉलीवूड ला असणारं योगदान खूप मोठं आहे. तिचे अनेक चित्रपट खूप गाजलेले आहेत. वेगवेगळ्या भूमिका ही तिनी आत्ता पर्यंत केलेल्या आहेत. धडकन मध्ये केलेलं काम हे खूप कौतुकास्पद आहे. राज कुंदरा सोबत ती लग्न बंधनात अडकलेली आहे. पण लग्न केल्या नंतर तिनं खुप काळ काम केलेलं आहे.  कर्ज , परदेशी बाबू ,फिर मिलेंगे ,बाजीगर , जानवर या अनेक चित्रपट तिनं करून आव्हानात्मक भूमिका केलेल्या आहेत.  तिच शिल्पा शेट्टी पुन्हा पुनरागमन करत आहेत.

Loading...

तिच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. बॉलिवूड मधील सर्वाधिक फिट मानली जाणारी शिल्पा शेट्टी हिने राखलेली फिगर आणि तिच्या फिटनेस चा मंत्र अनेकजणी फॉलो करतात. माघील काही वर्ष्यापासून टीव्हीवर रुळलेली शिल्पा आता लवकरच पुन्हा एकदा चित्रपटाच्या पडद्यावर दुसून येणार आहे. शिल्पाने तिच्या कम बॅक ची तय्यारी जोरदार पद्धतीने सुरू केली आहे.मी एका चागल्या भूमिकेची वाट पाहत होते ,अस ती सांगते.

निर्माते रमेश तौरानी यांच्या आगामी चित्रपटाच्या पडद्यावर ती दिसून येणार असून ,या चित्रपटासाठी यापूर्वी अभिनेत्री यामी गौतम आणि दिलजीत दोसाज यांची निवड झाली आहे. यांमी आणि दिलजीत ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करताना रसिक प्रेक्षकांना दिसणार आहेत.या दोघांसह चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची गरज हवी होती.

Loading...

ही भूमिका महत्वाची असल्याकारणाने तौरानी यांनी या भूमिकेसाठी शिल्पाची निवड केली आहे. यापूर्वी शिल्पाने २००८ मध्ये” दोस्ताना” या चित्रपटासाठी एक गाणं केलं होतं. त्यानंतर २०१४ च्या दरम्यान “ढिशक्याव” ह्या चित्रपटात देखील ती एका गाण्यात पाहायला मिळाली होती. गेल्या काही वर्ष्यामध्ये तुम्ही चित्रपटात केव्हा काम करणार असा प्रश्न तिला खूपदा विचारण्यात आलेला होता.

मात्र ,यापूर्वी केल्यात तश्याच भूमिका तिला ऑफर होत असल्याने तिन तीच काम बऱ्यापैकी थांबवलं होत. टीव्हिवरच्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून ती गेल्या दोन वर्ष दिसून येतीये. आता नवीन चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा काय नवीन कमाल करतीये हे पाहण्यासाठी तिचा फॅन वर्ग मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे.तिचं काम पाहण्यास सगळे उत्सुक आहेत. तिच्या निर्णयाच सगळ्या चाहत्याकडून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.