Loading...

छत्रपती शिवाजी महाराजांना 100 वर्ष आयुष्य मिळाले असते तर काय झाले असते?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

एखाद्या शूर, दूरदर्शी, प्रजाहितदक्ष राजाला १०० वर्ष आयुष्य लाभणे ही त्या देशाला, देशातल्या नागरिकांना लागलेली लॉटरीच. जर शिवाजी महाराजांना १०० वर्ष आयुष्य लाभलं असतं तर नक्कीच महाराष्ट्राला, भारताला त्याचा फायदाच झाला असता. शिवाजी महाराजांचा जन्म १६३० सालच्या. म्हणजे महाराजांना शतकायुष्य लाभलं असतं तर ते १७३० पर्यंत जगले असते जगले असते.

शिवाजी महाराजांच्या दीर्घायुष्यामुळे मराठी साम्राज्याला जे फायदे झाले असते ते पुढील प्रमाणे,

१. शिवाजी महाराज वारले वयाच्या ५० व्या वर्षी. त्यावेळी मराठी साम्राज्य दक्षिण भारतापर्यंत पोचलं होतं. जर महाराजांना अजून ५० वर्ष मिळाली असती तर आचार्य चाणक्य यांचं अखंड भारताचा स्वप्न पूर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे दुसरे राजे असते.

Loading...

ज्या मराठी फौजा १८व्या शतकात अटकेपार पोहोचल्या त्या १७व्या शतकातच किंवा १८व्या शतकाच्या सुरवातीलाच पोहोचल्या असत्या.

२. औरंगजेबाच्या वाढत्या साम्राज्यविस्ताराला शिवाजी महाराजांनी बांध घातला असता. जो औरंगजेब १६८३ साली दक्षिणेत आला तो नक्कीच येऊ शकला नसता.

आदिलशाही, कुतुबशाही अस्ताला गेल्या नसत्या. आदिलशाह, कुतुबशहा आणि शिवाजी महाराज वेळ पडल्यास एकत्र आले असते आणि मुघलांशी लढा दिला असता.

संभाजी महाराजांची क्रूर हत्या झाली नसती. कुटुंबामध्ये गृहकलह झाला नसता. औरंगजेबानंतर जे मुघल साम्राज्य अगदी १८५७ पर्यंत टिकलं ते कदाचित महाराजांनी मरणाच्या अगोदरच संपवून टाकलं असतं.

3. इंग्रज, पोर्तुगीज, डच वगैरे फक्त व्यापारीच राहिले असते. पुढे जो भारत इंग्रजांच्या गुलामीत गेला तो कदाचित थोडा पुढच्या काळात गेला असता.

४. पेशवे पाहिले बाजीरावांसारखे शूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झाले असते.

शिवाजी महाराजांच्या दीर्घायुष्यामुळे त्याच्या कुटुंबात काही बदल झाले असते ते पुढील प्रमाणे,

१) संभाजी महाराजांची क्रूर हत्या झाली नसती, आणि जर संभाजी महाराजांना दीर्घायुष्य लाभलं असतं तर १७३० साली त्यांचं वय ७४-७५ असतं.

Loading...

२) शाहू महाराजांना शिवाजी महाराजांचा सहवास लाभला असता. ते व महाराजांचा बाकीचा परिवार (शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाईसाहेब, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई, दुर्गाबाई, संभाजी महाराजांचे दासी पुत्र आणि अनेक) ३० वर्ष मोघलांच्या कैदेत नसते.

३) शाहू महाराज आणि ताराबाई यांमध्ये सिंहसनासाठी जो वाद झाला तो झाला नसता. मराठी साम्राज्याचे २ भाग झाले नसते.

४) संभाजी महाराजांनंतर स्वराज्याच्ये तिसरे छत्रपती, शाहू महाराज असते.

५) पुढच्या काळात जी काही कुटुंबाबाहेरील दत्तक विधानं झाली ती कदाचित झाली नसती. आत्ताचे छत्रपती, शिवाजी महाराजांचं रक्त असतं.

थोडक्यातच काय तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे मराठी साम्राज्याला जे नुकसान सहन करावे लागले ते करावे लागले नसते. मराठी माणसाला जो त्रास सहन करावा लागला तो कदाचित झाला नसता.

स्वातंत्र्यलढा, जो मुख्यतः अहिंसेच्या मार्गाने लढला गेला तो शिवछत्रपतींचा आदर्श ठेवून लढला गेला असता. स्वातंत्र्य मिळायला जी काही १००-१५० वर्ष लागली ती कदाचित लागली नसती. भारताचे तुकडे झाले नसते. त्यामुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असता. जो भारत आत्ता developing countries मध्ये गणला जातो तो devoloped देश असता.

लेखक: ओंकार ताम्हनकर (सौजन्य कोरा)

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.