या माजी मुख्यमंत्र्यांच्या जावयाने केली आत्महत्या ! मृतदेह सापडला या अवस्थेत

0

व्यवसायात झालेला तोटा आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. सोमवारपासून ते बेपत्ता झाले होते. CCD या प्रसिद्ध कॉफी शॉप साखळीचे मालक सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांचे ते जावई आहेत.  जवळपास 36 तासांनंतर मंगळुरु येथील नेत्रावती नदीत सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. काही वेळात सिद्धार्थ यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.

 

सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता होते. पोलीस त्यांचा गेल्या 24 तासांपासून शोध घेत होते. काल पोलिसांनी नेत्रावती नदीजवळील परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यासाठी जवळपास 200 हून अधिक पोलीस, शोधपथक आणि 25 बोटींची मदत घेण्यात आली.

सोमवारी सिद्धार्थ आपल्या गाडीने चिक्कमगलुरु येथे गेल होते. तेथून त्यांना केरळ येथे जायचे होते. मात्र मंगळुरुजवळ नेत्रावती नदीच्या पुलाजवळ त्यांनी आपली गाडी ड्रायव्हरला थांबवायला सांगितली आणि खाली उतरले. त्यावेळी सिद्धार्थ फोनवर कुणाशी तरी बोलत होते, अशी माहिती त्यांच्या ड्रायव्हरने दिली.

त्यानंतर ड्रायव्हरने सिद्धार्थ यांची जवळपास अर्धा तास वाट पाहिली, मात्र ते आलेच नाहीत. त्यानंतर ड्रायव्हरने त्यांना फोन केला तर त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यांनंतर ड्रायव्हरने लगेचच सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली.

समस्यांशी लढलो पण… सिद्धार्थ यांचे भावूक पत्र; बेपत्ता होण्यापूर्वी व्ही.जी. सिद्धार्थ यांनी ‘सीसीडी’च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि कर्मचाऱयांना पत्र लिहिले होते. हे पत्र ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. ‘‘ कठोर परिश्रमानंतर सीसीडीमध्ये 30 हजार रोजगारांची निर्मिती करू शकलो. टेक्नॉलॉजी कंपनीतून 20 हजारांवर रोजगार दिला. मात्र प्रचंड मेहनत केल्यानंतरही यशस्वीपणे हा व्यवसाय पुढे नेण्यास मी अपयशी ठरलो. माझ्यावर ज्यांनी विश्वास टाकला त्यांची मी माफी मागतो. सध्या कंपनीला तोटा होत आहे. त्यातून मी कंपनीला सावरू शकत नाही. एका मित्राकडून मोठय़ा प्रमाणावर कर्ज घेतले. देणेकरांचा दबाव वाढला आहे. आयकर विभागाच्या महासंचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर छळवणूक सुरू आहे. सीसीडीचे शेअर्स जप्त करण्यात आले आहेत. मी खूप त्रास सहन केला. आता हा तणाव सहन होत नाही, असे सिद्धार्थ यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.’’

आयकर विभागाने आरोप फेटाळले – सिद्धार्थ यांचे पत्र वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आयकर विभागाने खुलासा करताना आरोप फेटाळले आहेत. सिद्धार्थ यांचे माइंड ट्री लिमिटेड या कंपनीत 21 टक्के शेअर्स आहेत. या शेअर विक्रीतून सिद्धार्थ यांना 3200 कोटी रुपये मिळाले होते. नियमाप्रमाणे त्यांनी 300 कोटी आयकर भरायला हवा होता. त्यांनी फक्त 46 कोटी भरले. 2017मध्ये टाकलेल्या धाडीत हे पुरावे मिळाले. माईन ट्री लिमिटेडचे 7490000 शेअर्स जप्त केले. तसेच सीसीडीचे 2 लाखांवर शेअर्स जप्त करण्यात आले आहेत. सिद्धार्थ यांच्याकडे 362 कोटी काळा पैसा असल्याचे त्यांनीच मान्य केले होते. तसेच 118 कोटी कॅश असल्याचेही त्यांनी यापूर्वीच मान्य केले आहे, असे आयकरने आपल्या खुलाशात म्हटले आहे.

कॉफीचे साम्राज्य उभा करणारा उद्योगपती ‘सीसीडी’ हा ब्रँड देशात लोकप्रिय करणारे व्ही.जी. सिद्धार्थ यांनी 1996मध्ये अवघ्या पाच लाखांत कॅफे चेनची सुरुवात केली. बंगळुरू, मंगलोरमध्ये सुरुवात केलेल्या ‘सीसीडी’चे देशभरात सर्व मोठय़ा शहरांमध्ये आज आऊटलेट आहेत.

चिक्कमंगळूर येथे सिद्धार्थ यांच्या मालकीच्या 12 हजार एकर जमिनीवर कॉफीचे पीक घेतले जाते. तब्बल 28000 टन कॉफी निर्यात होते. चिक्कमंगळूरच्या कॉफीच्या मळ्यात 75 हजार टन कॉफी उत्पादन होते. हीच कॉफी ‘सीसीडी’मध्ये वापरली जाते. सिद्धार्थ यांच्या सीसीडी ब्रँडचा वार्षिक टर्नओव्हर अब्जावधी रुपयांचा आहे. 30 हजारांवर लोक त्यात काम करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!