जास्त वेळ झोप घेताय सावधान! जास्त वेळ झोप घेतल्याने होऊ शकतो हा गंभीर आजार…

.

झोप ही सर्वांच प्रिय असते पण तुम्हाला ठाऊक आहे का पुरेशी झोप न घेणं हे आरोग्यासाठी जितकं धोकादायक आहे त्याहीपेक्षा जास्त घातक गरजेपेक्षा जास्त झोप घेणं हे. तुम्हाला ही असेल जास्त वेळ झोपण्याची (ओव्हरस्लीपिंगची) सवय तर नक्की वाचा त्यामुळे होणारे हे दुष्परिणाम.

स्थूलता: ओवरस्लीपिंगचा आपल्या शरीराची चरबी कशी साठवायची आणि ते गमावण्याची क्षमता ह्यावर प्रभावशाली प्रभाव पडतो. एका अभ्यासानुसार वजन वाढण्यावर जास्त झोपेचा प्रभाव किती शक्तिशाली आहे हे सिद्ध केले.

6 वर्षांच्या कालावधीत, जे रात्री 10 पेक्षा जास्त तास झोपी जातात त्यांच्यात 7-8 तास झोपलेल्यांपेक्षा 21% जास्त लठ्ठ होण्याची शक्यता असते. आश्चर्याची बाब म्हणजे तुम्ही कितीही समतोल आहार आणि व्यायाम केला तरी ओवरस्लीपिंग तुमची सगळी मेहनत वाया घालवण्यास पुरेशी आहे.

डोकेदुखी: जास्त झोपल्याने डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. ह्याला “वीकएन्ड डोकेदुखी” असे म्हणतात. हे न्यूरोट्रान्समिटर जसे की सेरोटोनिनच्या पातळीत बदल झाल्याने होऊ शकते. दिवसभर झोप घेतल्याने रात्रीची योग्य झोप मिळणे ही कठीण होते त्यामुळे सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

पाठदुखी: कदाचित हे वाचून नवल वाटेल पण जास्त वेळ झोपल्याने पाठदुखीचा त्रास जाणवू शकते. शरीराला बराच वेळ एकाच ठिकाणी स्थिर ठेवून अजिबात हालचाल न दिल्याने असे होऊ शकते.

हृदयरोग आणि मधुमेह: अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की दररोज रात्री 9-11 तास झोपेमुळे हृदयविकाराचा धोका 28% ने वाढू शकतो. याव्यतिरिक्त, जास्त झोपेमुळे हृदयाच्या समस्येने मरण्याचा धोका 34% वाढू शकतो. जास्त झोप घेतल्याने तुमची रक्तातील साखर वाढू शकते. बैठी जीवनशैली, स्थूलता ह्यामुळे टाईप 2 डायबेटीसचा धोका वाढतो.

ह्याशिवाय वंध्यत्व, डिप्रेशन, अकाली वृद्धत्व आणि मृत्यू ह्यांना देखील ओवरस्लीपिंगमुळे सामोरं जावं लागू शकत. त्यामुळे योग्य वेळी योग्य तेवढी झोप घ्या आणि स्वतःला अनेक आरोग्याशी निगडीत समस्यांपासून दूर ठेवा.