Loading...

….म्हणून अनुष्काने केलं विराटशी लग्न !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

अनुष्काने वयाच्या २९व्या वर्षीच लग्न केले.बॉलिवूड अभिनेत्रींसाठी हे वय खूप कमी मानले जाते. क्रिकेटपटू विराट कोहली ची पत्नी आणि बॉलिवूड स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा ही आज 29 वर्षांची आहे. अजूनही ती खूप तरुण दिसत आहे. बॉलीवूड चा जर विचार केला तर अभिनेत्री ही आधी स्वतःच्या करियर वर लक्ष देते. व मग ती लग्नाचा विचार करते. पण अनुष्का शर्माने मात्र वयाच्या 29 व्या वर्षीच लग्न केलं आहे. म्हणून काही लोक तिला ट्रोल करत आहे.

काही दिवसांपूर्वी वर्ल्डकप चालू होता आणि तिथं अनुष्का शर्मा ही पोहचली होती. तेव्हा तिला अनेक नेटकर्यांनी लक्ष केलं होतं. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघे भारतीय टीम, वर्ल्डकप च्या बाहेर गेल्यानंतर लंडन मध्ये फिरत होते. तेव्हा काही फोटो व्हायरल झाले तेव्हा अनेक लोकांनी क्रिकेट खेळायला गेले होते की मजा करायला अशा भाषेत ट्रोल केलं.

Loading...

बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. २०१७ साली या दोघांनी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते. अनुष्काने लग्न केले तेव्हा तिचे वय फक्त २९ वर्ष होते. बॉलिवूड अभिनेत्रींसाठी हे वय खूप कमी मानले जाते.

नुकतंच ‘फिल्मफेयर’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचे कारण उलगडले. ती म्हणाली की, “मला असं वाटतं, बॉलिवूडचा प्रेक्षक खूप समजूतदार आहे. कलाकाराला स्क्रीनवर बघण्यातच त्यांची आवड आहे. तुमचं लग्न झालं आहे की नाही किंवा तुम्हांला मुलं आहेत की नाही याने त्यांना काही फरक पडत नाही. आपल्याला या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. एका अभिनेत्रींसाठी २९ हे लग्नासाठी कदाचित कमी वय असेल पण, मी लग्न केले कारण मी प्रेमात होते आणि आहे.”

Loading...

ती पुढे म्हणाली की, “लग्न तर करायचेच होते. मी नेहमीच महिलांशी समान व्यवहार करावा या मताची आहे. जर अभिनेते लग्नाआधी फार विचार न करता त्यांचं काम सुरु ठेवतात तर, महिलांनीच का विचार करावा? मला आनंद आहे की, आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी लग्न केले आहे.” भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी लंडनला पोहोचली होती. दरम्यान, अनुष्काच्या वेगवेगळ्या लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

कधी लग्न करायचं ? कधी फिरायचं ? कधी खायचं आणि कधी काय करायचं ? हा सगळा अभिव्यक्ती चा मुद्दा आहे. त्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण कुणावरही कधीच काहीच वयक्तिक आयुष्यवर बोलू शकत नाही. फक्त टीका करू शकतो. अनुष्का शर्मा ही विराट शी प्रेम होतं म्हणून लवकर व त्याच्याशीस लग्न बंधनात अडकली आहे असं ती सांगते आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.