सोनाक्षीला आवडतो हा भारतीय क्रिकेटर !

सोनाक्षी सिन्हा हीच्याबद्दल आपण सर्वच जाणता, या जनरेशनच्या स्टारकीड अभिनेत्रींपैकी सर्वात लवकर सुरूवात करणारी पहिलीवहीली जाणती अभिनेत्री म्हणजेच सोनाक्षी सिन्हा. सोनाक्षीला बाॅलिवूडचा पहिलाच ब्रेक मिळाला तो म्हणजे, बाॅलिवूडच्या दबंग भाईजान उर्फ सलमान खान याच्याकरवी. दबंगच्या सिरीजच्या तिन्ही भागात सोनाक्षीने आपली छाप प्रेक्षकांवर सोडली.

हे सर्व वगळता सोनाक्षीने एक-दोन वुमन सेंट्रींक चित्रपटही केले जे बऱ्यापैकी योग्यरित्या चालल्या गेले. सोनाक्षीला दबंग सिरीजमुळे “दबंग गर्ल” असंही म्हटलं जातं. शत्रूघ्न सिन्हा ज्यांनी बाॅलिवूडवर एक काळ बखूबी गाजवला त्यांची मुलगी अभिनयात नक्कीच योग्य ठरली आहे. तर चाहत्यांच्या या लाडक्या दबंग गर्लच्या नुकत्याच चर्चेत असलेल्या बाबीवर एक नजर टाकूयात.

भारतीय क्रिकेट क्षेत्राच चित्रपट इंडस्ट्रीशी अगदीच जवळचं आहे. अर्थात, दोन्ही क्षेत्रातले नंतर सेलेब्रिटी म्हणूनच ओळखले जातात. भारतीय क्रिकेटमधील वेगवेगळ्या शैलींचे अनेक खेळाडू आले आणि त्यांनी प्रेक्षकांना थोडक्यात चाहत्यांना आपलंस करून घेतलं. अशातलाच एक म्हणजे “सुरेश रैना.” रैना जरी सध्या भारतीय क्रिकेटपासून दूर असला तरी तो अनेकांचा लाडका असल्याने सतत इन्स्टाग्राम वा इतर सोशल माध्यमातून प्रसिद्धीझोतात राहत असतो.

तर आता ही एक खबर अशीच काहीशी आहे, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा हीने आपला आवडता चहीता क्रिकेटपटू म्हणून सुरेश रैना याचं नाव घेतलं. सोनाक्षीच्या म्हणण्यानुसार सुरेश रैना ची फलंदाजी करण्याच्या शैलीत एक वेगळी खासीयत आहे जी तिला आवडते. सुरेश रैनाच्या प्रसिद्धीला आयपीएलमधून आणखीच झळाळी मिळत असते.

मीस्टर आयपीएल या नावाने तो ओळखला जातोच शिवाय चेन्नई सुपर किंग्स साठी तो आजवर एक महत्वपूर्ण भाग राहिला आहे. काही दिवस गुजरात लायन्स या संघाच प्रतिनिधित्वही त्याने केलं. पण मुळात लग्न झालं असलेला रैना आजही सोनाक्षी सिन्हा सारख्या दबंग अभिनेत्रीस आवडतो ही बाब खुपचं इंटरेस्टिंग आहे. यातूनच सोनाक्षीची क्रिकेटबद्दल असलेली ओढ दिसूनच येते शिवाय ती क्रिकेटवर बारकाईने लक्षही ठेवते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.