भारतातील या सुप्रसिद्ध ब्रिज चे आजपर्यंत उदघाटन का होऊ शकले नाही ??? जाणून घ्या ह्या मागची कहानी ..

0

मधुबालाचे सुप्रसिद्ध गाणे, ‘आईये sss ये मेहेरबान… बैठिये जाने जाँss..!! हे गाणं आठवतंय..?? हे आहे १९५८ सालच्या ‘हावडा ब्रिज’ ह्या चित्रपटातील गाणे. हा सिनेमाचं जवळ जवळ ६० वर्षे जुना.. त्याहूनही जुना हा कलकत्त्यातील म्हणजे सध्याच्या कोलकात्यातील ‘हावडा ब्रिज’, जो हावडा आणि कोलकाता ह्या दोन शहरांना जोडतो. हा ७६ वर्षे जुना पूल फक्त भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. ह्याची बांधणी १९३६ ला सुरू झाली होती आणि १९४२ साली हा बांधून पूर्ण झाला होता.

हा ब्रिज भारतीय इतिहासाची साक्ष देतो. इंग्रजांची सत्ता ह्या ब्रिज ने झेलली आहे. तसेच दुसरे महायुद्ध ही जवळून पाहिले आहे. कारण जपान ने भारतावर टाकलेला एक बॉम्ब ह्या पुलाच्या जवळ पडला होता. ह्या पुलाचे नशीब बलवत्तर म्हणून ह्याला काही नुकसान झाले नाही. ह्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात देखील हा पूल न्हाऊन निघाला आहे. आणि आता स्वतंत्र भारतात हा दिमाखात उभा ही आहे.

का बनवला गेला हा पूल?
एकोणीसाव्या शतकातील शेवटच्या काही दशकांत म्हणजेच १८७० नंतर ब्रिटिशांनी कोलकाता आणि हावडा जोडण्यासाठी हुगळी नदीवर एखादा तरंगता पूल बांधायची योजना आखली होती. कारण ह्या नदीतून त्यावेळी मोठमोठी मालवाहू जहाजे येजा करत असत. मजबूत खांबांचा न हलणारा पूल ह्या जहाजांच्या दळणवळणासाठी अडथळा बनला असता. त्यामुळे १८७१ साली ब्रिटिशांनी हावडा ब्रिज ऍक्ट पास केला. मात्र ती योजना सत्यात उतरायला पुढची ६५ – ७० वर्षे उजाडली. १९३६ ला सुरू झालेला हा ब्रिज ४ फेब्रुवारी१९४३ ला लोकांच्या वापरासाठी सुरू करून दिला गेला. खूप सुंदर दृश्य होते त्या दिवशी, हा नवीन ब्रिज पाहायला अथांग जनसागर ह्या पुलावर लोटला होता.

का नाही झाले ह्याचे उदघाटन..?
कोणताही पूल बांधून झाल्यावर तो लोकार्पण करण्यासाठी मोठा सोहळा संपन्न होतो. पण हावडा ब्रिज मात्र कोणत्याही सोहळ्याविना लोकार्पण झाला. ना कोणी उदघाटन केले, ना ही कोणी नारळ वाढवून फुले चढवली.. अर्थात ब्रिटिशांकडे ही पद्धत नव्हतीच. पण भारतीयांना देखील उदघाटन करायला कुठे वेळ होता..?

जेव्हा हा पूल लोकांसाठी खुला झाला तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा बिकट काळ होता. ह्या युद्धा दरम्यान ह्या पुलाने बॉम्बवर्षाव झेलला आहे. भारतीय स्वतंत्रता आंदोलन आणि बंगाल मधील भयंकर दुष्काळ पहिला आहे. अश्या सगळ्या परिस्थितीत ह्या ब्रिज कडे कोणी कधीच आपुलकीने पाहिले नाही. त्यानंतरही स्वतंत्र भारतात आलेल्या सरकारने ह्या ब्रिजचे उदघाटन करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे हा पूल त्याच्या बांधणी पासून ते आजतागायत उद्घाटनाच्या हारफुलांविराहित आहे.

ह्या ब्रिजचे नामकरण मात्र २ – ३ वेळा झाले आधी ह्याला ‘न्यू हावडा ब्रिज’ तर नंतर रवींद्रनाथ टागोरांच्या नावावर ‘रवींद्र सेतू‘ असे नाव देण्यात आले. पण ‘हावडा ब्रिज’ हेच नाव प्रचलित झाले. त्याकाळी अडीच करोड रुपयात बनलेला हा पूल १५२८ फूट लांब आणि ६२ फूट रुंद आहे. ५ हजार टन स्टील ह्या ब्रिज साठी वापरण्यात आले असून त्यातील बरेच स्टील हे ‘टाटा स्टील’ मधून पुरवण्यात आले आहे. त्या काळच्या जगातील तिसरा लांबच लांब ब्रिज गणला गेला होता.

पर्यटन आणि फिल्म क्षेत्रात हा ब्रिज कायम वाखाणला गेला आहे. ४ फेब्रुवारी २०१९ ला हा ब्रिज ७५ वर्षांचा झाला त्या निमित्ताने त्यावर खास सजावटही करण्यात आली होती. हा पूल आता कोलकाता पोर्ट ट्रस्ट च्या अखत्यारीत असल्याने त्याची संपूर्ण देखरेख त्यांच्याकडूनच होते. आणि ह्यापुढे लागणारे सगळे बदलही त्यांच्या मार्फत केले जातील. मजबूत बांधकामामुळे इतके वर्ष शाबूत असलेला हा ब्रिज ह्या पुढे खास दिवसांना लायटिंग करून दिमाखात उजळेल असाही प्रस्ताव पोर्ट ट्रस्ट ने केला आहे. आजपर्यंत कित्येक अडचणींवर मात करून हावडा ब्रिज आजही कोलकातावासीयांची सेवा करतो आहे. कधी ना कधी ह्याचे पुनःलोकार्पण व्हावे आणि कधीही न झालेले उद्घाटन व्हावे अशी आशा बाळगूयात..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!