Loading...

अभिनेते सुबोध भावे यांच्या आयुष्यातील रोचक गोष्टी !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

कोणतीही भूमिका पदरी पडली तर त्या भूमिकेला योग्य न्याय देऊन ती रसिकांच्या पसंतीस कायमस्वरूपी छाप पाडून जाणारा अभिनेता हा खूप भाव खाऊन जातो. कारण त्याचं नावचं सुबोध भावे असं आहे. मराठी रंगभूमीवर आयुष्याची सुरुवात करताना “पुरुषोत्तम करंडक ” मधून केलेल्या एकांकिका ह्या कलाटणी दयायला महत्वाच्या ठरल्या. सुबोध भावे चं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे पुण्याच्या दगडूशेठ गणपती जवळ असलेल्या नूतन महाविद्यालयात झालं.

Loading...

त्यानंतर अनेक काळ पुण्यात एकांकिका आणि नाटक केल्यानंतर सुबोध भावे नी मुंबई ची वाट धरली. फक्त मराठीत चं काम करायचं अस त्यानं ठरवलं होतं. आणि आजही तो मराठीमध्ये काम करत आहे. आणि सध्या आघाडीचा महान अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. बायोपिक चित्रपट जर मराठीत कुणी अभिनित करत असेल तर त्यासाठी सुबोध भावे ह्या हरहुन्नरी समजून उमजून काम करणाऱ्या अभिनेत्याचं नाव नसेल असा एखादा चित्रपट सोडून बाकी सर्व भावेंच्या नावावर आहेत.

बालगंधर्व , लोकमान्य टिळक , काशीनाथ घाणेकर , कट्यार काळजात घुसली अश्या चित्रपटामधून सुबोध भावे नावाचा नट मराठी चित्रपटसृष्टीला प्रगल्भ करण्यात खूप प्रयन्त करत आहे. अश्रूंची झाली फुले , कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटकासहीत अनेक गाजलेली नाटकं करून सुबोध भावे या अभिनेत्याने मराठी रंगभूमीवर ची नाटकं हाऊसफुल कशी करता येतात हे सिद्ध करून दाखवलं आहे.

Loading...

पुष्पक विमान , हापूस , फुगे , सनई चौघुडे अश्या अनेक चित्रपट मध्ये सुबोध भावे या अभिनेत्याने खूप उत्तमोत्तम कामं केली आहेत. मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी दोन्हींचा अभिमान आहे सुबोध भावे !.. तुला पाहते रे ही मालिका साधारणता एक वर्षांपूर्वी भेटीस आली होती. ती मराठी प्रेक्षकांनी खूप प्रचंड उचलून धरली होती. त्यातील विक्रम ही भूमिका सुबोध भावे नी केली होती. तीही भूमिका रसिकांना खूप आवडली होती.

प्रत्येक भूमिका ही वेगळी साकार करून त्याला योग्य न्याय देणारा सध्यातरी एकच अभिनेता मराठीत वावरताना दिसत आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त सुबोध भावे !…सहज आणि साध्याशा वावरातून अभिनय करणं म्हणजे शेतीची नांगरणी करणं..अभिनयाच्या आयुष्यात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटणारा अवलिया अभिनेता सुबोध भावे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !…

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.