Loading...

‘गोवाच्या किनाऱ्याव’ फेम अभिनेता अडकला लग्न बंधनात, पत्नी आहे खूपच सुंदर!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

आपल्या सर्वांनाच मध्यंतरी एका गोड कोकणी साज असलेल्या गीताने भलतच वेड लावून सोडल होतं, ते गाणं म्हणजे, “गोवाच्या किनाऱ्याव”. आता तुम्ही म्हणालं या गाण्याचं नवीन काय? तर नवीन म्हणजे एक खास खबर आहे ती अशी की, या गाण्यातील अभिनेता सुह्रद वार्डेकर हा नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. आणि महत्वाच म्हणजे, एकदम रूबाबदार दिसणाऱ्या या अभिनेत्याची पत्नीदेखील दिसायला खूप सुंदर आणि सुबक आहे.

तर तुम्हीदेखील त्याच्याविषयी अलीकडील काही बाबी जाणून घेण्यासाठी उत्सुक असालचं. अभिनेता सुह्रदचा पहिला म्युजिक व्हिडीओ २०१८ साली प्रेक्षकांसमोर आला. विशेष म्हणजे अल्पावधीतच त्याने पसंतीस उतरून महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला. यातूनच सुहृद वार्डेकर सोबतच सिद्धी पाटणेलादेखील भरभरून प्रसिद्धी देखील मिळाली.

Loading...

या म्युजिक व्हिडीओनंतर दोघांना एकत्रित स्टार प्रवाहची ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ‘भास तुझा’ या नंतरच्या म्युजिक व्हिडिओमधून हे दोघे पुन्हा एकत्र झळकले. सुहृद वार्डेकर तसा आहे मूळचा नागपूरचा. त्याने करिअरच्या सुरुवातीला रेडिओ जॉकी आणि साउंड इंजिनिअर म्हणून रेडिओसिटी मधे काम पाहिले होते.

पुढच्या टप्प्यावर सुहृदने “असावा सुंदर स्वप्नांचा बंगला” ही मालिका साकारली होती. या मालिकेला तितकासा प्रतिसाद मिळाला नसला तरी सुह्रदने नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही. पुन्हा नव्याने झी युवावरील “एक घर मंतरलेल” ही रहस्यमय मालिका सुह्रदने अभिनेता म्हणून निभावली. या वर्षी नुकताच मल्हार गणेश दिग्दर्शित ‘दाह’ हा आगामी मराठी चित्रपटात सुह्रदलाच रोल मिळाला असून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मोठ्या पडद्यावरून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Loading...

नुकताच सुहृद वार्डेकर हा अभिनेता पुण्याच्या प्राची खडतकर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला असल्याचे समोर आले. हा विवाहसोहळा अमरावतीत चांगल्याच थाटामाटात पार पडला. त्याच्या लग्नाचे हे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले असून या विवाहसोहळ्यात अभिनेता संग्राम समेळसह अनेक सहकलाकारांनी हजेरी लावल्याची पाहायला मिळालं. अभिनेता सुहृद वार्डेकर आणि प्राची यांना सर्व रसिकप्रेक्षकांकडून त्यांच्या आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.