प्रेमविवाह करूनही त्याला जावा लागलं मृत्यूला सामोरं ! सासरच्या घरच्यांच्या धमक्यांना कंटाळून एका तरुणाने केली आत्महत्या !

0

प्रेम करावं की न करावं ? प्रेम केल्यावर आयुष्यभर सोबत राहायची शपथ घ्यावी की न घ्यावी ? जिच्यावर जीव ओवाळून टाकला तिच्या सोबत लग्न करावं की न करावं ? अशी अडचणीची परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसून येत आहे. ओळख होते. मन जुळतात. आणि मग प्रेमाला सुरुवात होते. पुढं हीच सुरुवात दोघांकडून ही लग्नापर्यंत जाते.काहींचे लग्न ही होतात. पण काहींचे झालेले लग्न मोडतात. आयुष्य ही मोडलं जातं. ही खरंच एक शोकांतिका आहे.

प्रियकराने प्रेयसीनं ब्रेकअप केल्यामुळे केली आत्महत्या ! प्रेयसीवर निसिम प्रेम करून तिनं दुसऱ्यासोबत लग्न केलं ! किंवा प्रेयसी सोबत पळून जाऊनही लग्न केलं पण सासऱ्याकडून होणाऱ्या दमदाटी मुळे सुद्धा काहींनी आत्महत्या केली आहे. प्रेमाच्या नावावर देशामध्ये कितीतरी आत्महत्या झाल्या आहेत. कितीतरी जीव या प्रेमात पडून, मृत्यूच्या नदीत वाहून गेले आहेत.

अशीच एक घटना पुण्यात घडली. प्रेयसी सोबत लग्न करूनही, तिच्या घरच्यांच्या दमदाटी, त्रासाला कंटाळून कृष्णा नावाच्या युवकाने हडपसर च्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. पण आत्महत्या करायच्या आधी त्यानं व्हॉट्सअप वर तिला एक मेसेज केला. आणि तो मेसेज त्याचा प्रचंड व्हायरल होत आहे. तुझ्या जीवाला त्रास करुन घेऊ नकोस !  हा कृष्णाने आत्महत्येपुर्वी व्हॉटस्‌अपवर पाठविलेला मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

लग्न झाल्यानंतर लगेचच पत्नी दुरावल्याची वेदना त्याने मेसेजद्वारे व्यक्त केली. त्याला तिचं दुरावलेले सहन नाही झाल्याची भावना ही त्याने त्यात व्यक्त केली आहे. हडपसर ( पुणे ) येथील प्रेमविवाह करणाऱ्या तरुणास त्याच्या सासऱ्याने दमदाटी केल्याच्या कारणावरुन त्याने शुक्रवारी पहाटे पावणे दोन वाजता हडपसर येथे रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी तरुणाच्या सासऱ्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्याने आत्महत्या केली त्याच्या घरावर शोककळा पसरली आहे. ऐन तारुण्यात लं पोरगं आज आपल्यात नाही हे घरच्यांना सहन होत नाही आहे. कृष्णा मंडलिक असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय साधारणपणे २४ वर्ष आहे. याप्रकरणी यमुनाबाई मंडलीक यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन धोंडीबा साहबेराव शिंदे म्हणजेच पोरीच्या बापावर गुन्हा दाखल झाला आहे.

 हडपसर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा कृष्णा मंडलीक हा हडपसर येथील एका सराफी दुकानामध्ये काम करीत होते. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणीसमवेत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिच्यासमवेत सात जुलैला लग्न केले.  दुसऱ्या दिवशी त्याने हडपसर पोलिस ठाण्यात जबाबही दिला. लग्नानंतर दोन दिवसांनी त्याने प्रथा-परंपरेप्रमाणे पत्नीला माहेरी पाठविले. त्यानंतर एकदा त्याने पत्नीस फोन केला, त्यावेळी तिने त्यास पुन्हा फोन न करण्याबाबत बजावले. तर तिच्या वडीलांनी त्यास दमदाटी केली. त्यामुळे अस्वस्थ होऊन त्याने शुक्रवारी पहाटे पावणे दोन वाजता रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.

तुझ्या जीवाला त्रास करुन घेऊ नकोस !  कृष्णाने आत्महत्येपुर्वी व्हॉटस्‌अपवर पाठविलेला मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लग्न झाल्यानंतर लगेचच पत्नी दुरावल्याची वेदना त्याने मेसेजद्वारे व्यक्त केली. “झाले ना आता तुझ्या मर्जीसारखे. स्वप्न तू रंगवले आणि त्याचा त्रास मला झाला. तु सगळे तुझ्या मर्जीसारखे केलेस, जवळपण तूच घेतलेस आणि लांबही तुच केले.” असे सांगतानाच त्याने “काल मला तुझ्या घरच्यांनी खूप धमकावले, खूप त्रास दिला’ अशा शब्दात तिच्या वडीलांनी धमकावल्याचाही उल्लेख केला. “माझं काय चुकले वर्षा, तू म्हणाली तसं मी वागत होतो. सॉरी, मी हे चुकीचं पाऊल उचलतोय. तू तुझ्या जिवाला त्रास करून घेऊ नको’ अशा स्वरुपाचा मेसेज त्याने जवळच्यांना पाठविला.

त्याने पाठविलेला संदेश हा खुपचं संदेश देण्याचं काम करत आहे. प्रेमात माणूस कोणत्या थराला जाऊन जिवाचं बरं वाईट करायला ही मागे पुढं पाहत नाही हे ही त्यावरून लक्षात येत आहे. कधी कधी चूक नसणाऱ्याला ही चुकीचे फळं भोगायला लागतात. प्रेमात पडल्यावर मात्र सर्वांनी जरा विचार करूनच प्रेम करावे. आणि पडायच्या आधी आणि पडल्यावर दहा वेळा विचार करून पाहावं की आपण चालत असलेला रस्ता योग्य आहे का ?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!