Loading...

हे उपाय करा आणि मिळवा मासिक पाळीत होणाऱ्या त्रासातून मुक्ती !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

मासिक पाळी म्हणलं की बऱ्याचदा लोकं बोलणं बंद करतात. स्त्रियादेखील ह्यामुळे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल गप्प बसतात. खरंतर मासिक पाळी मध्ये होणारा त्रास हा प्रत्येकीच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात असतो. बहुतेक वेळा डॉक्टरांचा सल्ला न घेता किंवा कुठलीही माहिती नसताना कोणीतरी सांगितलं म्हणून ह्यावर काही उपाय केले जातात. त्यामुळे त्रास अजून वाढतो. तेव्हा कुठलाही उपाय करण्याआधी त्यामागील शास्त्रीय कारण नक्की जाणून घ्या.

ह्या काळामध्ये गर्भाशयात तयार होणाऱ्या बीजांडाचे फलन होत नाही. गर्भशयातून हे बीजांड रक्तासोबत बाहेर फेकले जाते. त्यामुळे मासिक पाळी येते. हे रक्त बाहेर फेकताना गर्भाशय आकुंचित होते त्यामुळे ओटीपोटात प्रचंड वेदना होतात.

ह्यासोबतच कंबर दुखणे, पायांना गोळे येणे, मूड स्विंग्स हा त्रास जाणवतो. काही स्त्रियांमध्ये मळमळ, उलट्या ह्यांसारखी लक्षणे ही दिसून येतात. तर काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी येण्याआधी त्यांना त्रास होतो, टेन्शन येतं ह्याला शास्त्रीय भाषेत Premenstrual Stress (PMS) असं म्हणतात.

Loading...

अशा वेळी काय कराल?
● भरपूर पाणी प्या : काही स्त्रियांमध्ये मळमळ, उलट्या, अतिसार सारखी लक्षणे दिसतात. त्यावेळी शरीराला सतत हायड्रेटेड ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे कमीतकमी 6-8 ग्लास पाणी दिवसातून पिले पाहिजे.

● गरम पाणी : ह्याकाळात स्नायूंमधील ताण वाढतो. त्यामुळे स्नायूंमध्ये वेदना होतात. अशावेळी हॉट पॅड किंवा गरम पाण्याने शेक घ्यावा. कोमट पाणी पिल्याने पोटाच्या दुखण्यापासून थोडा आराम मिळतो.

● योग्य आहार
ह्याकाळात होणाऱ्या रक्तस्रावामुळे अशक्तपणा येतो. शिवाय ह्या काळात जास्त ऊर्जेची गरज असते. शरीराला लागणारी ऊर्जा मिळण्यासाठी थोड्या थोड्या अवकाशाने योग्य तो आहार घेतला पाहिजे. आहारात शक्यतो फळं, भाज्या, डाळी ह्यांचा समावेश असावा.

आलं-मधाचा चहा:आलं-मध घालून केलेला चहा स्नायूंमधील ताण कमी करतो. त्यामुळे पाय, कंबर ह्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

Loading...

बदाम : बदामात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि फायबर असतात. हे पायांत किंवा कंबरेमध्ये अचानक येणाऱ्या चमकांना कमी करते.

पालक : पालकामध्ये मॅग्नेशियम असते. हे स्नायूंना शिथिल करून त्यातील ताण कमी करण्यास मदत करते.

● स्वच्छता : पुरेशी स्वच्छता न बाळगल्याने बऱ्याच जणींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे ह्याकाळात आवश्यक ती स्वच्छता बाळगावी. सॅनिटरी पॅडचा वापर करावा. योग्य वेळेनंतर ते बदलावे.

● आराम: ह्याकाळात शरीराला व मनाला आरामाची गरज असते. त्यामुळे शक्यतो कठीण कामे टाळावी व आराम करावा.

भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.