तानाजी चित्रपटाचा फर्स्ट लूक? तानाजीच्या भूमिकेत अजय आणि शिवाजी महाराजांच्या भूमिकेत? जाणून घ्या.
चौथीतल्या शिवछत्रपती या पुस्तकात मला एक पाठ होता. “सिंहगड” नावाचा. तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित हा पाठ आणि “गड आला पण सिंह गेला” हे शिवरायांचे शब्द आजही मनात घर करून आहेत. अभिनेता अजय देवगण आणि ओम राउत मिळून सध्या ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर‘ सिनेमा काढत आहेत. सिनेमाची सर्वांना आतुरतेने वाट लागली आहे कारण हा सिनेमा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे सर सेनापती सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे.
या सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राउत यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वर या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध केलाय. तानाजी : द अनसंग वॉरिअर मध्ये प्रमुख भूमेकेत अजय देवगण आहेत. या फोटो हातात तलवार घेऊन शिवछत्रपतींच्या खऱ्या योद्धा सारखे ते दिसून पडतात.
चित्रपटाची शुटींग मागच्या वर्षी सप्टेंबरमध्येच सुरु झाली आणि यावर्षी २२ नोव्हेंबर ला हा सिनेमा चित्रपट गृहात येतोय. याआधी सुद्धा सिनेमाचं एक पोस्टर समोर आलं होतं. मात्र या पोस्टरमध्ये अजय देवगन स्पष्ट दिसत नव्हता. पोस्टरमध्ये तानाजी मालुसरे ढालीच्या साहाय्याने स्वरक्षण करताना दाखवले होते.
या चित्रपटात अजय देवगन प्रमुख भूमिकेत असून सैफ अली खान, काजोल, सुनील शेट्टी, पंकज त्रिपाठी हे कलाकार सुद्धा विभिन्न भूमिकेत झळकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार औरंगजेबाच्या भूमिकेसाठी सैफ अली खानची तर लक्ष्मीबाईच्या भूमिकेत काजोलची नेमणूक केली आहे. मिर्जा राजे जयसिंह यांच्या भूमिकेत सुनील शेट्टी दिसतील. छत्रपती शिवरायांची भूमिका अद्यापि समोर आलेली नव्हती पण मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान शिवरायांची भूमिका साकारणार आहे.
इतिहास: जर तुम्हाला माहिती नसेल तर तानाजी मालुसरे हे शिवरायांच्या सेनेचे सेनापती होते. आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन तानाजी शिवाजी महाराजांकडे गेले. त्यावेळी कोंढाणा किल्ला ताब्यात घेणाचा बेत शिवाजी महाराज आखत होते. तानाजींच्या घरी लग्न असल्याचे माहिती झाल्यावर शिवरायांनी निर्णय बदलला पण तानाजींनी स्वतःहून प्रेरित होऊन शिवाजींना या लढाईचं नेतृत्व आपल्याला देण्यास सांगितलं. आधी लगीन कोंढाण्याचे, मगच रायबाचे असे तानाजींचे उद्गगार काढीत मोहित धरली आणि गड जिंकल्यावर मात्र त्यांना वीरगती प्राप्त झाली.

तानाजी मालुसारेंच हे बलिदान व्यर्थ गेलं नाहीच. त्यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांच्या ‘गड आला पण सिंह गेला‘ उद्गारला चालना देत कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. या चित्रपटाची कथा मराठी इतिहासावर आधारित असल्या कारणाने मराठी बांधवांना त्याची फारच उत्सुकता आहे.