“ठाकरे” चित्रपटात खेडकरांचा नव्हे तर “यांचा” असणार बाळासाहेबांचा आवाज.

0

हिंदू समुदायाचे महानेता, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर चित्रपट येतोय आणि ही बात्मिया आता सगळ्यांना माहिती आहे. YouTubeवरच्या त्यांच्या हिंदी ट्रेलरला १५ मिलियन पेक्षा जास्त वेळा पहिल्या गेला आहे. बाळासाहेबांच्या प्रमुख भूमिकेत नवाजुद्दिन सिद्धिकी आहे. ट्रेलरला मिळालेला भरगोस रीस्पोंस पाहून निर्माते देखील सुखावले आहेत. पण बाळासाहेबांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा माराठी ट्रेलर लोकांना फारसा आवडलेला दिसत नाहीये. त्यावरचा हा रिपोर्ट.

बाळासाहेबांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची मराठी डबिंग केलं आहे आणि त्यात आवाज आहे सचिन खेडकर यांचा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा खर्जातला आवाज ऐकून अख्खं शिवाजी पार्क उसळायचं. कारण, त्या आवाजात जरब होती, दम होता, वेगळीच जादू होती. आवाजात तीच जबर आणि तोच जादू कदाचित सचिन खेडकरांच्या आवाजातून प्रेक्षकांना दिसला नाही म्हणून नेटकरांनी ट्वीटर, फेसबुक आणि युटूबवर आपल्या समीक्षा नोंदवल्या आणि कदाचित तेच पाहून निर्मात्यांनी तो आवाज बदलायचा निर्णय घेतला आहे. ‘साहेबां’चा आवाज बदलण्याबाबत विचार सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. विशेष म्हणजे, नेटिझन्सच्या इच्छेनुसार आवाजाचे जादुगार, प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट चेतन शशितल यांच्याकडून बाळासाहेबांचा आवाज डब करून घेण्याची तयारी केली जातेय.

तुम्हाला या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला आणि या चित्रपटाकडून काय अपेक्षा आहेत आम्हाला नक्की कळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!