या मराठमोळ्या अभिनेत्याचे फॅन आहेत नवाजुद्दीन सिद्दीकी !

0

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये “ठाकरे” या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रसिध्द होत आहे. याचनिमित्ताने या चित्रपटाची टीम म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्रकार, राज्यसभा संसद सदस्य संजय राऊत कार्यक्रमामध्ये आले आहेत. मकरंद अनासपुरे यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं या दोघांनी एकदम बेधडक तर काही उत्तरं एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली.

या भागामध्ये संजयजी राउत आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबतच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. ज्यामध्ये नवाजुद्दीनने त्याच्या कारकिर्दी दरम्यानच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. पहिल्यांदा जेंव्हा शिवसेनेतून फोन आला तेंव्हा काय वाटले ? याचे उत्तर नवाजुद्दीने काय दिले हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.

तसेच या मनोरंजन क्षेत्रामध्ये तब्बल १२ वर्ष स्ट्रगल केलं त्यावेळेस “आता सगळं संपल” असा विचार कधी मनामध्ये येऊन गेला का? असे विचारताच त्याने नक्कीच असा विचार मनामध्ये येऊन गेला असे म्हंटले आणि पुढे या क्षेत्रामधील वाटचालीबद्दल देखील सांगितले. तसेच कुठला फजितीचा किस्सा आठवतो का ?

असे विचारताच नवाजुद्दीन म्हणाला एकदा मला फिल्मालय मध्ये बोलावले होते आणि मी चुकून फिल्मसिटी जाऊन पोहचलो हे मला अजून आठवत. Watchman ते अक्टर या प्रवासामध्ये काय फरक पडला असे विचारले तेंव्हा त्याने जे उत्तर दिले ते तुम्हाला कार्यक्रमाच्या भागामध्ये बघायला मिळेलच. तसेच “दादा कोंडके” हे माझे आवडते कलाकार असे देखील तो म्हणाला आणि याच्याविषयीच्या आठवणी देखील सांगितल्या.

संजयजी राउत यांच्यासोबत देखील प्रश्न उत्तर चांगलीच रंगली. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज साहेबांशी जिवलग मैत्री आणि नारायण राणे सरांशी जिव्हाळ्याचे संबंध, राजकारणामुळे किंवा राजकीय भूमिकांमुळे हे जवळचे सबंध दुरावतात असं वाटतं का ? यावर ते म्हणाले, दुरावतात … हे खरं आहे ! राजकारणात नव्हतो तेंव्हा आम्ही सगळे एकाच कुटुंबात वावरत होतो.

परंतु नंतर नाती दुरावली राजकारणामुळे नाती दुरावली जाऊ नये या मताचा मी आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, अडचणीच्या वेळेस जात, धर्म, राजकीय पक्ष न पाहता लोकांच्या पाठीशी उभं रहाण्याचे धारिष्ट ते अनेकदा दाखवत. तेंव्हा बघयाला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा धमाकेदार भाग संजयजी राउत आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबतच्या येत्या शुक्रवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर…

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!