दहावी पास तरुण या छोट्या व्यवसायातून कमावतो महिन्याला लाखो रुपये !

0

शिक्षण कसेबसे दहावी पास पण हा मराठी तरुण स्वतःच्या हिमतीवर बनलाय मिसळ दरबारचा यशस्वी उद्योजक राजा..! वाया गेलेला मुलगा अशी पदवी प्राप्त झालेला आणि घरच्यांचंही न ऐकणारा, कॉपी करून कसा तरी पास झालेला आपल्या कथेचा तरुण. हा पक्का खान्देशी म्हणजे जळगावचा तरुण एक दिवस आला नशीब अजमावायला पुण्यात. ३/४ मोठ्या कंपन्यांमध्ये टेम्पररी काम करून वैतागला.

एका नगरसेवकाला भेटला, नगरसेवकाने नोकरी न करण्याचा आणि नोकरीच्या शेवटी मिळणाऱ्या पगाराचं गणित करून दाखवलं, आणि पेटलाच एकदम, आता कुठंही नोकरीच नाही करणार अशी शपथच घेऊन टाकली. आणि फिरायला लागलं डोक्यात व्यवसायाचं चक्र. फिरणारं चक्र थांबलं एका “भन्नाट” व्यवसायावर. घरातून भांडून थोडे पैसे घेतले , ते कमी पडले म्हणून चोरले थोडे पैसे घरातून. आणि सुरू झालं नवीन व्यवसायाचं ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’.

एक नाही, दोन नाही, सात वर्षे चालू होतं ह्या पेटलेल्या तरुणाचं ‘रिसर्च’ आणि “डेव्हलपमेंट”. इतकं???? हो इतकं….. आणि १०वी पास तरुणाचं? काय तारे तोडले ह्या पोरानं? त्यानं सुरू केला एक ‘भन्नाट’ व्यवसाय, एक ब्रँड असलेला व्यवसाय, कसला व्यवसाय सुरू केला असेल? सात वर्षे रिसर्च करून ह्या जिद्दी तरुणानं सुरू केला ” मिसळ दरबार “.

एका मिसळ प्लेट ची किंमत ६० रुपयांपासून ते १६०० रुपये पर्यंत असणारा हा “मिसळ दरबार”. पुण्यमधल्या सातारा रोड वर सुरू केला हा दरबार. वेगवेगळ्या चवींची मिसळ. लहान मुलांसाठी मिसळ, तरुणांसाठी झणझणीत मिसळ, वृद्ध मंडळींसाठी वेगळी मिसळ, जैन मिसळ, कोल्हापुरी, पुणेरी, मालवणी आशा वेगवेगळ्या चवींची मिसळ, याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांची मिसळ, असे असंख्य प्रकार इथे आहेत. पुण्यातल्या खवय्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण भारतभर आता ह्या मिसळ दरबाराचे आउटलेट्स सुरू होणार आहेत. पुण्यात आणि महाराष्ट्रात आत्ता १४ ठिकाणी मिसळ दरबरच्या शाखा चालू झालेल्या आहेत.

प्रीमियम , सिल्व्हर, गोल्ड, आणि प्लॅटिनम आशा चार मॉडेल्स मध्ये ह्या मिसळीचे अनेक प्रकार विभागले गेलेले आहेत. १६००रुपये किमतीची मिसळ ही प्लॅटिनम मॉडेलमध्ये मोडते , तर ६० रुपये किमतीची मिसळ ही प्रीमियम मॉडेलमध्ये मिळते. २०२० ते २०३५ ह्या काळात संपूर्ण भारतात ह्या ब्रांचेस तयार झालेल्या असतील, आणि इतक्यावरच न थांबता इंग्लड, अमेरिका, द. आफ्रिका, दुबई इथल्या मराठी लोकांना सुद्धा ह्या मिसळीची मजा चाखता येणार आहे . ह्यासाठीच सात वर्षे रिसर्च करून साता समुद्रा पलीकडे ही मिसळ घेऊन जाण्यासाठी तयारी चालू आहे.

ह्या मिसळीची खासीयत हीच आहे की ह्या मिसळीत प्रिझरवेटिव्हज चा वापर होणार नाही आणि कोणतेही कृत्रिम रंग वापरले जाणार नाहीत म्हणून ही मिसळ सातासमुद्रापालिकडे जाणार आहे, मॅक्डोनाल्ड, के एफ सी, प्रमाणेच ह्या मिसळीची आउटलेट्स परदेशात उघडली जाणार आहेत. म्हणजे ही महाराष्ट्राची मिसळ आता आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात जशी चव असणार आहे तीच चव अमेरिकेतल्या लोकांनाही मिळणार आहे.

सगळ्या गोष्टी ठरलेल्या प्रमाणात एकत्र केल्यावर प्रत्येक मिसळीची चव तीच असणार मग तुम्ही मुंबईत खा किंवा कोल्हापूरला खा. ह्याचं आणखी एक विशेष म्हणजे ही मिसळ तयार करायला ठराविक शेफ , किंवा कूक ची आवश्यकता लागणार नाही, प्रमाण ठरलेले आहे, ते फक्त मिसळून एकत्र करायचे. त्यामुळे कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त ८ कामगारांची जरुरी असणार आहे. २०३५ पर्यंत १००० ब्रांचेस सुरू करण्याचा ह्या तरुणाचा मानस आहे त्यामुळे सात आठ हजार कामगारांना रोजगार मिळणार आहे हेही एक मोठे योगदान म्हणता येईल.

हे सगळं ‘ मिसळ दरबार ‘ मुळे शक्य होणार आहे. ह्या मिसळ दरबारचे ‘ मिसळ साम्राज्य’ होणार आहे. ते फक्त ह्या १०वी पास झालेल्या तरुणांच्या डोक्यात शिरलेल्या व्यवसायाच्या किड्यामुळे, त्याच्या जिद्दीमुळे, आणि सात वर्षे त्याने घेतलेल्या मेहनतीमुळे, ह्या8 अफलातून व्यक्तीचं नाव आहे सचिन विंचरकर. पुण्यातल्या सातारा रोड वर , बालाजी नगरला शतायु हॉस्पिटल जवळ गेल्या वर्षी चालू झालेला हा पहिला “मिसळ दरबार” आहे. आज हा सचिन कामावतोय महिन्याला पाच लाख रुपये. अशा ह्या तरुण सचिनच्या जिद्दीला सलाम आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी स्टार १ मराठी तर्फे शुभेच्छा..!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!