70 वर्षाच्या या माणसाने केलं 30 वर्षाच्या मुलीसोबत लग्न कारण ऐकून व्हाल दंग !

0

“प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नही की, चूप-चुपके आहें भरना क्या” हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. नाही ऐकलं? मग “त्याने केलं, तिने केलं, सांगा तुमचं काय गेलं?” असा कडक प्रश्न विचारणारी मंगेश पाडगावकरांची कविता तुम्ही ऐकली असेल? कुणी कुणावरही प्रेम करो, कुणी कुणाशीही लग्न करो या तुम्हाला काहीच घेणं-देणं नसून; त्यांचं आयुष्य त्यांना त्यांच्या परी जगू द्यावं हा बोध देण्यासाठी कदाचित ती कविता लिहिली असावी.

आपण त्यात ;लक्ष देत नाही पण कधीकधी काही अश्या बातम्या समोर येऊन जातात कि लक्ष द्यावंच लागतं. आता हेच बघा, एका सत्तर वर्षाच्या माणसाने आपल्यापेक्षा ४०-४५ वर्ष लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं म्हणे. लक्ष नाही जाणार का तिकडे?

या “आजोबांच्या” आणि त्यांच्या “आजीच्या” फोटो सध्या सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे आणि प्रत्येकाला या गोष्टीचं आश्चर्य होत आहे कि हे झालंच कसं? सोबतच अशीही बातमी व्हायरल होत आहे कि हे आजोबा आणखी दुसरे कुणी नसून जग-प्रसिद्ध अपोलो हॉस्पिटलचे संचालाक राजेश कुमार हिम्मतसिंका आहेत.

ही बातमी आम्हीही बघतली आणि घेतला शोध त्या बातमीचा कि काय सत्य आहे त्यामागे. कोण आहेत या व्यक्ती आणि का म्हणून त्यांनी आपल्यापेक्षा इतक्या कमी वयाच्या मुलीशी लग्न केलं? त्यावरील हा सपशेल रिपोर्ट.

पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही कि हे काही नुकतंच झालेलं लग्न नाहीये, या लग्नाला जवळपास दीड ते दोन वर्ष झाली आहेत आणि एवढ्या वेळा नंतर आता त्यांच्या लग्नाचे फोटो आता जाणून बुजून सोशल मिडीयावर विनोद म्हणून व्हायरल केले जात आहेत.

दुसरी गोष्ट अशी कि या फोटो मध्ये असलेले व्यक्ती नसून जग-प्रसिद्ध अपोलो हॉस्पिटलचे संचालाक राजेश कुमार हिम्मतसिंका नसून हिमतसिंग्का ऑटो एंटरप्राइजेज लिमिटेड चे मेनेजिंग डायरेक्टर राजेश कुमार हिम्मतसिंका आहेत. जर तुम्हाला कुठे अशी खोटी बातमी सापडली तर त्वरित रिपोर्ट करा.

आता आणखी एक प्रश्न, त्यांनी इतक्या कमी वयाच्या मुलीशी लग्न करणं योग्य आहे का? फेसबुक वापर्कार्त्यांपैकी एकाने त्या पोस्ट खाली कॉमेंट केली आहे कि तो राजेश कुमार हिम्मतसिंका यांना खूप आधीपासून ओळखतो आणि ते लोक चांगले मित्र आहेत. तो त्यांना काका म्हणतो. राजेश कुमार हिम्मतसिंका त्यांच्या वडिलांचे चांगले मित्र आहेत पण तो राजेश कुमार हिम्मतसिंका त्यांच्या अश्या निर्णयाचे समर्थन करत नाही.

काकूंच्या निधनानंतर त्यांना आता एकटा वाटायला लागलं होतं पण त्याच्या अर्थ असा नाही कि इतक्या कमी वयाच्या मुलीशी लग्न करावं. समोर बोलतांना तो असाही म्हणाला कि राजेश कुमार हिम्मतसिंका एका विधवा किंवा त्यांच्या वयाच्या कोणत्याही अविवाहित स्त्री शी लग्न करू शकले असते पण त्यांनी तरुणीशी लग्न करायला नको होतं.

कनिश्क (राजेश कुमार हिम्मतसिंका यांचा मुलगा) ची बायको सुद्धा त्या मुलीपेक्षा वयाने मोठी आहे असेही तो म्हणाला. काही लोकांनी पैश्यासाठी अश्या मुली कुणाशीही लग्न करतात असंही म्हटलं. राजेश कुमार हिम्मतसिंकाच्या मृत्युनंतर ती दुसऱ्याच दिवशी दुसरा मुलग शोधेल अशीही एका व्यक्तीने कॉमेंट केली आहे.

त्यांची इच्छा होती, त्यांनी लग्न केलं; आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही पण या फोटो मध्ये नेमकी व्यक्ती कोण ही माहिती देणे आमचे काम आहे. जर तुमच्या पर्यंत खोट्या बातम्या आल्या तर त्या तिथेच थांबवा आणि तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांशी शेयर करा आणि अश्याच माहितीसाठी स्टार मराठीच्या पेजला लाईक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!