असं एक बेट, ज्या बेटावर आहे माणसांना जायला बंदी कारण वाचून थक्क व्हाल !

0

आपण दरवेळी पिकनिक, किंवा काहीतरी चेंज म्हणून वेग वेगळ्या पिकनिक स्पॉटला जातो किंवा निसर्गाच्या सानिध्यात डोंगर दऱ्या असलेल्या ठिकाणी जाऊन फ्रेश होऊन येतो आणि परत सुरू होतं आपलं रुटीन. ताजं तवानं झाल्यासारखं वाटतं. म्हणून आपण जातो पिकनिकला. आता अंदमान , निकोबार सारखी घनदाट जंगलं असलेली बेटं सुद्धा आता पर्यटनासाठी प्रसिद्ध झालीत, बरेच लोक तिकडे आता पर्यटनाला जातात.

असंच एक छोटं बेट आहे , त्या बेटावर आहे निसर्गरम्य वातावरण, घनदाट जंगल, चारही बाजूने समुद्र, कोणत्याही गजबजाटापासून दूर ,शांत. असं आहे हे बेट. पण ह्या सुंदर बेटावर माणसांना जायला बंदी आहे. होss बंदी आहे. इतक्या शांत आणि सुंदर बेटावर जायला बंदी? पण कशासाठी आहे ही बंदी? आता बंदी कशासाठी असणार? काहीतरी धोका बिका असणार माणसांना, किंवा माणसांमुळं तिथं जे लोक राहतात त्यांना. त्या बेटावर जर का एखादा माणूस चकून गेलाच तर तो काही जिवंत परत येऊ शकत नाही.

असलं खतरनाक असं काय असणार ह्या बेटावर अशी शंका आपल्याला येणारच. माणूस जिवंत परत येणार नाही म्हणजे जंगली लोक तिथं राहत असणार आणि ते नवीन येणाऱ्या माणसांना भीतीपोटी मारून टाकतात का काय? नाही. “ह्या सुंदर बेटावर आहेत फक्त भयानक विषारी साप.” ह्या संपूर्ण बेटावर फक्त विषारी सापांचं राज्य. कुठेही बघा, सापच साप. आणि सगळेच विषारी साप.

ब्राझील मध्ये आहे हे बेट ह्या बेटाचं नाव आहे ‘इलाहा दा क्यूईमादा’. ह्या बेटावर काही वर्षांपूर्वी माणसं जात होती. ब्राझील सरकारच्या अधिकारात असलेलं हे बेट तिथे सरकारतर्फे लाईट लावण्याची व्यवस्था केली गेली . ते लाईट लावण्यासाठी एक माणूस त्याच्या कुटुंबासह त्या बेटावर सरकारी खर्चाने एक घर बांधून तिथे राहत होता. त्या जंगलात थोडेफार साप होते. पण काही महिन्यातच तिथल्या सापांची संख्या खूपच वाढली. त्या माणसाला त्या जंगलात फिरणेच कठीण व्हायला लागलं.

पण कोणाला सांगणार? घरातच दारं खिडक्या बंद करून त्याला राहावे लागत होते. एकदा त्या घराच्या खिडकीची काच फुटली, आणि बाहेरच्या सापांनी घरात यायला सुरुवात केली. तो माणूस घाबरून कुटुंब सह पळून जाण्यासाठी कसातरी समुद्राच्या किनाऱ्याकडे धावला त्याची छोटी होडी किनाऱ्याला बांधून ठेवली होती. पण तो माणूस तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याला आणि त्याच्या सगळ्या कुटुंबाला ह्या विषारी सापांनी गाठलं.

काही दिवसांनी त्या बेटावर त्याला अन्न धान्य पुरवणारी सरकारी नेव्ही ची बोट तिथे आली पण त्या बोटीतल्या खलाशांना त्या माणसाच्या संपूर्ण कुटुंबाचे विषाने काळे ठिक्कर पडलेले मृत देह पाहायला मिळाले. ह्या असंख्य सापांच्या तिथल्या हालचाली बघून खलाशी सुद्धा घाबरून पळाले आणि ही बातमी सरकारी अधिकाऱ्यांना कळवली. तेंव्हा ब्राझील सरकारने तातडीने ह्या बेटावर प्रवेश बंदी असल्याचे जाहीर केलं. कारण ४३००००० स्क्वेअर फुटाच्या ह्या बेटावर सुमारे दोन ते अडीच लाख सापांचं राज्य त्या ठिकाणी सुरू झालं होतं. मग एवढ्या मोठ्या सापांच्या राज्यात कोणीही माणूस गेला तर जिवंत परत येऊच शकणार नाही.

एवढी मोठी सापांची दहशत त्या बेटावर आहे म्हणून ही माणसांना जाण्याची बंदी योग्य ठरली. गोल्डन पिट वायपर जातीचे हे भयंकर विषारी साप रोज आपलं साम्राज्य वाढवत चालले आहेत. ह्या ठिकाणी बंदी असून सुद्धा काही लोकांनी लपून छपून जायचा प्रयत्न केला पण ते परत आलेच नाहीत. अशी ही भयंकर सापांची दहशत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!