श्रीदेवी चा मृत्यू की खून ? श्रीदेवीच्या मृत्यूबाबत खूप मोठा खुलासा ! वाचा नक्की !

0

श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा ऋषिराज सिंह यांनी केला आहे. ऋषिराज सिंह यांनी त्यांचा सहकारी डॉ. उमादथन भारत यांच्या हवाल्यातून हा दावा केला आहे. श्री देवी ही भारतीय चित्रपट क्षेत्रातील नामवंत अभिनेत्री होती. १९९० च्या दशकात अनेक चित्रपट श्रीदेवी चे येऊन गेले. आणि श्री देवी भारतीय रसिकांच्या मनावर अभिनेत्री म्हणून राज्य करू लागली.

पण अचानक मिळालेल्या मृत्यूच्या बातमी नंतर सगळीकडे खळबळ झाली. सगळ्या तिच्या चाहत्याना दुःख झाले. आणि सगळयांना एकच प्रश्न पडला होता ? की कोणतीही व्यक्ती दारुच्या नशेत एका छोट्या बाथटबमध्ये बुडून मरू शकत नाही.’ १९७५ ला फिल्म जुली मधून श्रीदेवी ने हिंदी चित्रपट सृष्टीत बाल अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं होतं.  त्यानंतर जशी मोठी होत गेली तशी तशी तिची कलेची अदा बहरत गेली. पुढं अभिनेत्री म्हणून सक्षम होत गेली. हिम्मत्वाला, सदमा ,नागिन ,मिस्टर इंडिया या सुपरहिट चित्रपट देऊन श्री देवीन स्वतःची एक सुपरस्टार अभिनेत्री ची ओळख केली होती.

63 हिंदी फिल्म ,62 तेलगू , 58 तामिळ फिल्म करनाऱ्या श्री देवी सारख्या अभिनेत्री चा मृत्यू बाथरूम च्या बाथ मध्ये पडून नेमका कसा होऊ शकतो? हा सगळयांनाच पडलेला खूप मोठा प्रश्न आहे . पण ऋषीराज सिंह यांनी सांगितल्या नुसार तिचा खून की मृत्यू हे सांगणं जरा अवघड होऊन बसलं आहे. जर खून असला तर कुणी केला ? का केला ? आणि मृत्यू तर मग बाथरूम च्या टब मध्ये पडून कसा होऊ शकतो ? अश्या अनेक प्रश्नाचं उत्तर सध्या मिळणं जरा कठीणच.

श्रीदेवी 2-3 दिवस रूममधून बाहेर आल्या नव्हत्या तर त्यांना सोडून बोनी कपूर भारतात का परतला असा सवाल दुबई सरकारनं बोनी यांना विचारला होता. त्यावेळी संशयाची सुई बोनी कपूर यांच्यावर होती. पण त्यावेळी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्यांचा अपघाती मृत्यू झाला असं सांगण्यात आलं आणि ते प्रकरण तिथेच बंद करण्यात आलं. दरम्यान, ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांच्या हवाल्याने केलेल्या दाव्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू नाही तर त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यावर पुन्हा काही तपास होणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

श्री देवी आणि बोनी कपूर यांच्यात काही भांडणं होती का ? किंवा जुनं काही उकरून काढून तिच्यावर हल्ला होऊन खून झाला का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या शोधण्याची खूप गरज आहे. कारण श्रीदेवी ही पद्मश्री पुरस्कार मिळालेली अभिनेत्री आहे. भारताच्या सुंदर अभिनेत्री मध्ये तिचं नाव होतं. तर मग या अभिनेत्री चा अचानक आलेला मृत्यू पचत नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!