या लोकसभेला जो मतदान करणार नाही त्याच्या खात्यातून पैसे कपात होणार !

0

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत आणि अश्या वेळी प्रत्येक खासदार आणि नेता आप-आपला रंग आपणास दाखवत आहेत; सोबतच आहे वर्षातील सर्वात मोठा रंगीन उत्सव, होळी. या निमित्ताने सर्व वाचक वान्ध्वांना होळीच्या शुभेच्छा. खासदार आपले काहीही रंग दाखवत असले तरी त्यांच्या चार पैश्यांचा मिशाला न जुमानता योग्य त्या उमेदवाराला मत देऊन देशाचा विकास घडविण्यासाठी हातभार लावा; मत द्यायला चुकू नका कारण तो तुमचा अधिकार आणि कर्तव्य दोन्ही आहे आणि आता तर नियम सुद्धा आलाय; मत दिलं नाही तर तुमच्या खात्यातून ३५० रुपये काढून घेतले जातील.

नमस्कार, आजची महत्वाची बातमी आणि त्याबद्दलची सर्व माहिती घेऊन आम्ही आज पुन्हा तुमच्या भेटीला आलोय. निवडणुकीला फक्त २०-२२ दिवस असताना निवडणूक आयोगाने “बुरा ना मानो, होली है” म्हणत एक नवीन आदेश जारी केला आहे. जाहीर केलेल्या या आदेशानुसार जे व्यक्ती या वर्षी मतदान करणार नाही त्यांच्या खात्यातील ३५० रुपयांची रक्कम बँक वजा करणार आहे.

व्यक्ती विशेषच्या आधारकार्डवरून त्याची ओळख केली जाईल तसेच त्याच्या आधारकार्डशी जोडले असलेले अकाऊंट शोधून त्याच्या खात्यातील रक्कम वजा करण्यात यावी असा आदेश निवडणूक आयोगाने बँकेला दिला आहे. मला वाटलं कि निवडणूक आयोग आणि बँक असं काहीच करणार नाही पण जर त्यांनी असं केलं तर मात्र ३५० रुपयांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी मत द्यायला जाईलच.

आदेश जारी करून त्यावर एकदम नियंत्रित आणि अचूकपणे अंबलबजावणी करण्याची ताकीदही आयोगाने बँकेला दिली आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. देशातील सर्व मतदारांना लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले; थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही मत दिलं नाही तर तुमचे 350 रुपये गेलेच म्हणून समजा.

आता तुम्ही म्हणाल कि माझं तर बँक अकाऊंट आहेच नाही तर निवडणूक आयोग माझे पैसे कापू शकणार नाही. तर मग हि महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी; जर तुमचं कोणत्या बँकेत खाते नसेल तर आपल्या मोबाईलचा रिचार्ज करते वेळी तुमचे ते पैसे कापले जाईल. ते ३५० रुपये दिल्याशिवाय तुमचा मोबाईल मध्ये नवीन रिचार्ज करता येणार नाही. आता तुम्ही म्हणाल कि माझ्याकडे तर मोबाईल देखील नाहीये; आणि बँक अकाऊंट देखील नाहीये तर मग खरंच तुम्ही या जगातील नाहीत आणि मग या जगातील नाहीत तर तुम्हाला मत द्यावं लागणार नाही. (बुरा ना मानो, होली है).

तर, निवडणूक आयोगाचे असे म्हणणे आहे कि प्रत्येक निवडणुकीत एका मतदाराच्या मागे त्यांना सुमारे ३५० रुपये खर्च येतो आणि त्याने मत दिली नाही तर आम्ही ते पैसे त्यांच्या कडून वसूल करून घेऊ. आता ते कसं माहिती करतील याची तर तुम्हाला कल्पना आलीच असेल? आठवते? तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं होतं? आणि तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला होता? म्हणजेच तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या बँक खात्याशी लिंक एकला होता? म्हणजे… आपले पैसे काढून घेण्यासाठी निवडणूक आयोग तुम्हाला आरामात शोधून काढू शकतो आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही.

बरं, आणखी एक; निवडणूक आयोगाच्या विरोधात तुम्ही कोर्टात दाद मागू शकत नाही कारण आयोगाने आधीच कोर्टातून परवानगी घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुका ७ टप्प्यात होणार असून २३ मी रोजी निकाल जाहीर होणार आहे; या निवडणुकीत मत द्या, चांगल्या उमेदवाराला द्या आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावा; आणि आपले ३५० रुपये देखील वाचवा.(बुरा ना मानो, होली है).

टीप : निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतल्यावर कोणीही आपल्या मतदान चुकवणार नाही  (बुरा ना मानो, होली है).

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!