ज्या वयात लोकं सेवानिवृत्त होतात त्या वयात हे लोक घडवत आहेत नाव इतिहास !

0

जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर वयाचा काहीही अडसर येत नाही आणि त्या इच्छा शक्तीच्या जोरावर कोणतेही काम सहज शक्य होते. सर्वसाधारणपणे वयाच्या 60 वर्षानंतर लोक सेवा निवृत्त होतात. कारण त्यांची शारीरिक क्षमता कमी व्हायला लागते. पण काही लोकांची शारीरिक क्षमता इतकी जबरदस्त असते की वयाच्या शंभरी पर्यंत सुद्धा ते चांगल्याप्रकारे वेगवेगळी कामे करू शकतात, ह्याचे कारण म्हणजे त्यांच्यात असलेली जबरदस्त इच्छाशक्ती हीच होय.

असे काही लोक आपल्या देशात सुद्धा आहेत की जे आज त्यांची वयाची शंभरी ओलांडून सुद्धा काही वेगळी कामे हाती घेऊन त्यात खूप मोठं यश मिळवताना दिसतात. अशाच काही भारतातल्या वयोवृद्ध तरुणांची कामगिरी बघूयात.

१- लक्ष्मी श्रीवास्तव :- ह्या आहेत ८७ वर्ष वय असलेल्या आणि काहीतरी नवीन शिकण्याची आवड असलेल्या महिला. ह्या वयोवृद्ध लोकांच्या हॉस्पिटलमध्ये राहतात. आणि रुग्णांची सेवा करतात. पण त्यांना ‘डाएटीशीयन’ चा कोर्स करायची इच्छा वयाच्या ८७ व्या वर्षी झाली. त्यांनी इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी च्या ह्या कोर्सला ऍडमिशन घेतली त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांनी त्यांच्या ह्या वयात कोर्स करण्याच्या इच्छा शक्ती ला सलाम केला आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं.

२-श्याम शरण नेगी:- १०२ वर्षे वय असलेले हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून नावाजले गेलेले वयोवृद्ध नागरिक. १९५१ च्या पहिल्या निवडणुकीपासून ते सतत मतदान करत आले आहेत , आत्तापर्यंत त्यांनी सतत ३२ वेळा मतदान करून एक इतिहास रचला आहे.

३- फौजा सिंह :- हे १०७ वर्ष वय असलेले मॅरेथॉन चे धावपटू. आजही त्यांच्यातला उत्साह एखाद्या तरुणासारखा आहे. २०११साली झालेल्या टोरांटो मॅरेथॉन मध्ये फौजा सिंह ह्यांनी भाग घेतला होता. ह्या मॅरेथॉन मध्ये सगळ्यात वयाने मोठे धावपटू म्हणून त्यांना बहुमान देण्यात आला.

४- सालूमरदा थिमक्का :- १०४ वर्ष वय असलेली महिला मजुरी करून आपला चरितार्थ चालवते. ह्या वयात मजुरी करते म्हणजे काय जबरदस्त इच्छाशक्ती असेल ह्या महिलेची. ह्या वयात ह्याच महिलेला झाडे लावण्याची आवड असल्या मुळे आत्ता पर्यंत ४०० वडाची झाडे लावण्याचा उच्चांक तिच्या नावावर आहे. ही गोष्ट गौरव करण्यासारखीच आहे.

५- मान कौर:- वय वर्ष १०३ . ही महिला आतंरराष्ट्रीय ख्यातीची ऍथलेट (धाव पटू) आहे. आज सुद्धा सगळ्यात वयस्क म्हणून धावण्याच्या शर्यतीत भाग घेते. आत्तापर्यंत २० मेडल मिळवून स्वतःची अशी एक छाप पाडली आहे.

६- सुमित्रा राय :- ही सिक्कीम मधली सगळ्यात वृद्ध महिला आहे. ह्या महिलेचं वय आहे १०७ वर्ष. आत्ता च्या २०१९ च्या निवडणुकीत ह्या महिलेने व्हील चेअर वर जाऊन पोक्लोक , कमरंग इथल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे, ही एक विशेष गोष्ट म्हणता येईल.

७- गोल्ड वूमन रुक्मिणी नशीने :- 77 वर्ष वय , प्रसिद्ध धावपटू , भिलई ची दादी म्हणून आज लोक ह्या महिलेला ओळखतात. पती बरोबर ह्या क्रीडा क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि नंतर ८ सुवर्ण पदकं आणि एक रौप्य पदक ह्या महिलेनं मिळवलं. म्हणून ‘गोल्ड वूमन’ म्हणून नावाजलं जाऊन प्रसिद्धी मिळाली.

 

 

८- देवकी अम्मा :- वय वर्ष ८५, एक झाड लावण्यापासून सुरुवात केली. आणि अलापूजा गावात ५ एकर जमिनीवर १००० झाडं लावून दाट जंगल तयार केलं ह्या एकट्या महिलेनं. ह्या जंगलात अनेक प्रकारची झाडं लावलीत. ह्या कार्यामुळे देवकी अम्मा यांना २०१९ चा नारी शक्ती पुरस्कार मिळाला आणि वृक्ष मित्र पुरस्कार सुद्धा मिळाला.

अशी ही निवृत्ती नंतर इतिहास निर्माण करणारी, भारत भूमीवर जन्मलेली ज्येष्ठ मंडळी , आणि त्यांचं हे अचाट कर्तृत्व. त्यांच्या ह्या कर्तृत्वाला आमचा सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!