भारतातच का राष्ट्रपतींपेक्षा पंतप्रधान महत्वाचे असतात..? चला जाणून घेऊया !

0

मंडळी, आपण रोज बातम्या बघतो. त्यातली एक खास बाब तुमच्या लक्षात आली आहे का..? तर आपण ज्या बातम्या ऐकतो त्यात सर्वसाधारण पणे, अमुक देशाचे राष्ट्रपती तमुक आज भारत भेटीवर. तमुक देशाचे राष्ट्राध्यक्ष अमुक दौऱ्यावर आले आहेत. अशा प्रकारे सांगितले जाते. भारतातून मात्र पंतप्रधान असतात जे इतर देशांच्या राजकीय चर्चेस जाताना दिसतात. भारतातील राष्ट्रपती जात नाहीत अशातला भाग नव्हे पण इतर देशात जे अधिकार त्यांच्या राष्ट्रपतीला असतात ते आपल्याकडे नाहीत.

अगदी देशावर आणीबाणी लढण्याचे काम सुद्धा पंतप्रधानच करू शकतो. राष्ट्रपतींकडे इतके महत्वाचे अधिकारच नाहीत. एकदा नाही म्हणून पुढच्या वेळेस पंतप्रधान आणि सरकारच्या दबावामुळे राहत्रपतींना काही निर्णय सारखारच्या बाजूने द्यावेच लागतात. भारतात बघाल तर सर्वाधिकार हे पंतप्रधानांकडेच असतात. त्यामानाने राष्ट्रपतींच्या अखत्यारीत खूप कमी अधिकार असतात. देशातील सगळ्या निर्णयांवर पंतप्रधानांचे शिकमोर्तब असते. हे असे का बरं असेल..?? राष्ट्रपती ह्या सर्वोच्च पदापेक्षा पंतप्रधान कसे बरं मोठे..? आज हेच आपण जाणून घेऊया.

आपल्याकडे राष्ट्रपतींची निवड कशी होते हे कळल्यावर त्यांच्या कडे अधिकार का कमी असतात हे लगेच कळून येते. राष्ट्रपतींची निवड ही सत्ताधारी खासदार आणि आमदारांच्या मतदानावर अवलंबून असते. विरोधी पक्षातील खासदार आणि आमदार देखील मतदान करतात पण जर सत्ताधारी पक्षातील मते एकूण मतांच्या ५०% च्या वर असतील तर तेवढे सुद्धा राष्ट्रपती निवडून देण्यास उपयुक्त ठरते. भारतात राष्ट्रपती पदाचा उमेदवार वयस्क निवडण्यामागे एक कारण आहे. वयस्क उमेदवार हा पंतप्रधानपुढे जाऊ पाहत नाही. त्यांच्या कक्षेत येणाऱ्या कामांव्यतिरिक्त इतर कशात आपले अधिकार गाजवत नाहीत.

भारत सरकारला गरजेनुसार सल्ले देणे आणि सरकारने घेतलेल्या ठरावांना हिरवा सिग्नल दाखवणे एवढेच रराष्ट्रपतींकडून अपेक्षित असते. सत्ताधारी पक्षाच्या सर्वसनुमाते राष्ट्रपती निवडले गेलेले असल्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहून पंतप्रधानांचे सगळे निर्णय राष्ट्रपतींतर्फे मान्य करून घेतले जातात. कारण राष्ट्रपतीची जबाबदारी देशाच्या सरकार पर्यंतचं मर्यादित असते. त्यांच्याकडे लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार असला तरी ते बऱ्याचदा सत्ताधारी पक्षाकडून निवडून आलेले असल्याने त्यांनी असे करणे दुरापास्तच असते.

ह्या उलट पंतप्रधान भारतीय जनतेला जाब देण्यास बांधील असतात. त्यांची जबाबदारी सरकार आणि जनता ह्या सगळ्यांना सामावून घेण्याची असते. पंतप्रधान हे स्वतः संपूर्ण सरकारचे आणि देशाचे मुख्याधिकारी असतात. ते स्वतः मंत्रिमंडळातील सदस्य ठरवतात आणि राष्ट्रपतींकडून त्यावर शिक्कामोर्तब करून घेतले जाते. भारतातील मुख्य अधिकारी असल्यामुळे ते राष्ट्रपतींचे चीफ अडवायजर म्हणजेच मुख्य सल्लागार मानले जातात. भले कमी अधिकार असले तरी राष्ट्रपतींना मात्र इंग्रजीत फर्स्ट सिटीझन ऑफ द नेशन असेही संबोधले जाते. तरीही देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम पंतप्रधानच करतात आणि त्याचे श्रेय देखील त्यांचेच असते.

हे अधिकार इतर देशात राष्ट्रपतींकडे राखून ठेवलेला असतात . मात्र आपल्याकडे पाहिल्यापासूनच पंतप्रधानांना जास्ती अधिकार दिले गेले असल्याने ते राष्ट्रपतींपेक्षा वरचढ ठरतात. म्हणजे सोप्प्या शब्दात सांगायचे तर एखा कुटुंबातील सदस्य म्हणजे सरकार. वडील हे पंतप्रधान आणि आजोबा हे राष्ट्रपती. सगळे निर्णय हे जरी आजोबांच्या सल्ल्याने होत असतील तरी वडीलच ठरवतात की निर्णय घ्यायचा की नाही ते. अगदी ह्याच सोप्प्या थेअरीप्रमाणे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे कार्य भारतात चालते.

तर मित्रानो तुम्हाला आता नीट उलगडा झालाच असेल की इतर देशांप्रमाणे भारतात राष्ट्रपतींपेक्षा पंतप्रधान वरचढ कसे..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!