जगातील या 11 देशांकडे स्वत:ची आर्मीच नाही, कोणाकडे पैसे नाहीत तर कोणी शेजाऱ्यांवर अवलंबुन आहेत.

0

मित्रांनो या संपूर्ण जगात एकूण 195 देश आहे , आज बहुतांश देशांकडे त्यांना लागणार्या गरजा आणि त्या गरजा पुर्ण करण्यासाठी लागणारा अमर्याद पैसा आहे. पण असेही काही देश आहेत ज्यांना बर्याचशा गरजा पूर्ण करण्यासाठी दुसर्या देशांवर निर्भर राहावे लागते, त्या गरजांची पुर्तता करण्यासाठी विविध गोष्टींची आयात- निर्यात परस्परांकडून करावी लागते. पण काही देशांकडे अशा काही गोष्टी नाहीत, ज्यांची आयात – निर्यात सुद्धा करता येत नाही.

आज सशस्त्र सेना जगातिल प्रत्येक राष्ट्राचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. देशाची शक्ती सैन्याच्या ताकदीने मोजली जाते, तसेच प्रत्येक देशाला अन्य देशांपेक्षा अधिक शक्तिशाली असलेली शस्त्रे पाहिजे असतात. परंतु, आजही या जगात काही देश शस्त्रांच्या शर्यतीत अडकले आहेत.

असे काही देश आहेत, ज्यांच्याकडे स्वत:च्या संरक्षणासाठी एकही सैन्य नाही. तुम्हाला ही गोष्ट कदाचित खोटी वाटेल, पण हे सत्य आहे. सर्व देशांपैकी एकुण 11 देश असे आहेत, ज्यांच्याकडे स्वत :चे सैन्य नाही. या एकुण 195 देशांपैकी कोणत्याही सैन्याशिवाय जगणार्या देशांची यादी खालीलप्रमाणे:

1. व्हॅटिकन सिटी : व्हॅटिकन सिटी हा जगातिल सर्वांत लहान देश आहे. व्हॅटिकन सिटी इटलीमध्ये आहे. व्हॅटिकन सिटी कडे स्वत:ची आर्मी नसल्यामुळे व्हॅटिकन सिटीची सुरक्षा इटलीच्या सेनेवर अवलंबुन आहे.

2. पलाऊ : पलाऊदेखिल एक बेट आहे. याला पश्चिम महासागर म्हटले जाते. हेसुद्धा आपल्या सुंदर सौंदर्य आणि स्कुबा ड्राइविंग साठी प्रसिद्ध असल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी पाहण्यास मिळते. येथेसुद्धा कोणतीहीआर्मी नसून पोलिस कर्मचार्यांची संख्या फक्त 30 आहे.

3. मार्शल आयलँड : मार्शल आयलँड एक बेट देश आहे. याला ‘प्रशांत महासागर’ म्हणुन सुध्दा ओळखले जाते. या देशाची लोकसंख्या माहिती केली तर ती जवळजवळ 52,634 इतकी आहे. आणि या देशात कोणतीही आर्मी नाही.

4. सालोमन बेटे: शेकडो द्विपांचा समुह याला मानले जाते आणि हे दक्षिण प्रशांत महासागरांमध्ये येतात. येथेसुद्धा पर्यटकांची पार गर्दी असते. येथिल स्कुबाड्राइविंग आणि अनेकशे वाटर स्पोर्ट्स प्रसिद्ध आहेत. या देशाकडे सुद्धा आर्मी नाही.

5. समोहा : समोहाची स्वत:ची आर्मी नसल्यामुळे अनौपचारिक संरक्षणाची जबाबदारी न्यूझीलँडकडे आहे.

6. डॉमिनीका : हा देश कैरेबियन सागरामध्ये वसलेला पहाडी द्विप देश आहे. डॉमिनीका आपल्या गरम पाण्याच्या धरणासाठी प्रसिद्ध आहे. साल 1981 पासुन या देशातसुद्धा स्व संरक्षणासाठी आर्मी नाही .

7. तुवालु : तुवालु ओशनिया (Oceania) मध्ये आहे. ओशनिया हे दक्षिण प्रशांत महासागरामध्ये एक स्वतंत्र बेट आहे. या देशामध्ये पोलिस फोर्स आहे पण आर्मी नाही. तसेच आंतरिक सुरक्षा आणि समुद्र क्षेत्रातिल देखरेख करण्यासाठी पोलिस आहेत.

8.अंडोरा : युरोपच्या लहान देशांपैकी एक देश म्हणजे अंडोरा. येथिल लोकसंख्या जवळजवळ 85 हजार आहे, परंतु या देशाजवळ सुद्धा कोणी आर्मी नाही. त्यामुळे संरक्षणासाठी या देशाचा स्पेन आणि फ्रांस सोबत सुरक्षा करार झाला आहे.

 

9. लिकटेस्टिन : लिकटेस्टिन युरोपमध्ये आहे आणि येथे असलेले मध्यकालिन किल्ले खुप प्रसिद्ध आहे. येथिल आर्मी देशाला परवडत नसल्यामुळे 1886 मध्ये समाप्त करण्यात आली होती.

10. नौरू : या देशामध्ये सुद्धा आर्मी नाही पण संरक्षणासाठी पोलीस आहेत. तरिही नौरुची संरक्षण जबाबदारी ऑस्टेलियाची आहे.

11. ग्रनाडा : ग्रनाडा हा देश वेस्ट इंडिज मध्ये आहे. हा कॅरेबियन समुद्रामधिल ग्रनेडाइन्स दीपेच्या साखळीच्या दक्षिणेच्या किनार्यावरिल एक देश आहे. येथे झालेल्या 1983 सालाच्या अमेरिकी हल्ल्यानंतर या देशाला स्वत:ची आर्मी नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!