हे आहेत वजन कमी करण्याचे सोपे व सरल घरगुती उपाय !

0

वजन कमी करणे एक अशी गोष्ट आहे जिथे जितके तोंड तितके जास्त सल्ले आपल्याला ऐकायला मिळतील. प्रत्येकाचे आपले विचार, प्रत्येकाचा आपला अनुभव. लोकं अश्या गोष्टी सांगतात (किंवा इतकं मोठं-मोठं फेकतात) कि वजन कमी करणे म्हणजे पोरखेळ आहे. सत्य तर हे आहे कि हे खूपच आव्हानात्मक काम आहे म्हणून आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यात मदत होईल.

वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु करण्याआधी तुम्हाला हे माहिती असायलाच हवं कि तुमचं वजन तुमच्या शरीरासाठी योग्य आहे कि नाही. तुमचा Body Mass Index बरोबर असला पाहिजे. तुमचा Body Mass Index ठरवतो कि तुम्हाला आता काय करण्याची गरज आहे. जर BMI १८.५ पेक्षा कमी आहे तर वजन खूपच कमी आहे, १८.५ पासून २५ पर्यंत असेल तर साधारण वजन आहे.

२५ ते २९.९ असेल तर वजन जास्त आहे आणि त्यापेक्षाही वर असेल तर मात्र आता तुम्ही वजन कमी करण्याची घाई केली पाहिजे. नाश्त्यानंतर पाणी हे आपले मुख्य खाद्य बनवा: न्याहारीला चहा, दुध, संत्र्याचा रस किंवा आणखी कोणत्या फळाचा रस घेऊ शकता पण मात्र त्यानंतर दिवसभर पाणी वापरा. कोल्डड्रिंकला तर हातच लावू नका आणि चहा-कॉफी सुद्धा होईल तेवढं टाळा. असं केल्याने तुम्ही दिवसाला २०० ते २५० कॅलॉरी कमी खाल.

तीन वेळा एकत्र सगळं जेवण्याऐवजी; ५-६ वेळा थोडं थोडं खा: दक्षिण आफ्रिकेत केलेल्या संशोधनानुसार जर कुणी दिवसात ३ वेळा पूर्ण जेवण करण्याऐवजी ५-६ वेळा थोडं-थोडं खात असाल तर तुम्ही जवळपास ३०% कॅलॉरी कमी खाता असं सिद्ध झालं आहे.

रोज ४५ मिनिटे चला: दररोज ३० मिनिटे चालले तरी हा व्यायाम तुमचे वजन वाढू देणार नाही पण जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर निदान ४५ मिनिटे चालायला पाहिजे. जर तुमची दररोज ४५ मिनिटे चालण्याची तयारी असेल तर मग तुम्हाला आपल्या आहारात सुद्धा बदल करण्याची गरज नाहीये आणि वर्षभऱ्यात १५ किलो वजन कमी करू शकता. संयम बाळगावा लागेल बरं का!

आठवड्यात एकदा तरी कठीण काम करत जा: निदान एकदा तरी तुम्ही कठीण काम केलं पाहिजेच. मग ते कार किंवा मोटारगाडी धुण्याचे असो, मुलांसोबत बाहेर फिरायला जायच किंवा आपल्या सोबत्याला/सोबतीनीला त्यांच्या कामात मदत करायची. फुटबाल खेळता येत असेल तर मग उत्तमच बरं का!

लिंबू आणि मध वापरायला सुरुवात करा: सकाळी उठल्या बरोबर तुम्ही कोमट पाण्यात मध आणि लिंबू घालून पिऊ शकता. असं केल्याने तुमचं पोट भरूनही राहील आणि वजन कमी होण्यास मदत होईल. असं केल्याने जवळपास १० किलो वजन तुम्ही कमी करू शकता. हे आहेत काही घरेलू उपाय जे तुम्ही वजन कमी करण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला वजन कमी करण्यात यांची नक्कीच मदत होईल आणि याचे काही साईड इफेक्ट सुद्धा नाहीये. निरोगी रहा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!