हे आहेत पाच पदार्थ जे भारतात आवडीने खातात, परंतु विदेशात आहे त्यावर बंदी !

0

भारत हा खवय्यांच्या देश.. एकेक राज्य तिथल्या खास अन्नपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.. कोणाला नाश्त्याला वैविध्य लागते तर काहींना रात्रीचे जेवण बहारदार हवे असते. पण आवडीने खाणार त्याला आवडीने बनवून देणार अशीच रीत आपल्याकडे आहे. जगाच्या पाठीवर असा देश शोधूनही सापडणार नाही. चहाच्या ठेल्यापासून मोठमोठ्या रेस्टरेंट पर्यंत आपल्या आवडीचे खानपान मिळत असते. आणि जे खायची इच्छा होते तेच खायला आपण काही किलोमीटर प्रवासही करून जातो.

तसेच परदेशातून आयात झालेले पदार्थ देखील आपण मजेने खातो. पास्ता, पिझ्झा, बर्गर आणि नाचो, लेज, पेप्सी, कोक असे हवा बंद बाटली बंद पदार्थ देखील रोजच्या खानपानाचा अविभाज्य घटक बनलेले दिसतात. पण आपल्याला बऱ्याचदा सगळ्या खाद्य उत्पादनांची वित्तंबातमी नसते. जर तुम्हाला कोणी सांगितले की, असेही काही पदार्थ जे आपण रोजच वापरतो ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे काही देशांमध्ये बॅन केलेले आहेत.. तर तुमचा विश्वास बसेल?

अहो पण हे खरं आहे. असे काही प्रॉडक्ट्स जे आपण मजेत खातो किंवा पितो त्यांना परदेशातून पिटाळून लावले आहे. औषधालाही तिथे हे पदार्थ विमल जाऊ शकत नाहीत. तसे तिथल्या सरकारचे फर्मानच असते. बघुयात तर कोणते.

१. रेडबुल : तरुणांचे आवडते पेय. मी मद्य पित नाही तर रेडबुल घेईन असे अभिमानाने सांगणाऱ्यानो इकडे लक्ष द्या. हे रेडबुल ड्रिंक तुमच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक असते. डॉक्टर्स सांगतात की ह्याच्या नित्य सेवनाने तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम, डिप्रेशन, हायपर टेन्शन आणि उच्च रक्तदाबाच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकेल. फ्रांस, डेन्मार्क सारख्या देशात हे ड्रिंक पूर्णपणे बंद आहे. पण भारतात मात्र ‘शौकीन’ मोठ्या मजेत हे पितात..!!

२. केचप : ‘उंगली घुमके बोल..’ म्हटल्यावर लहान मुलं सुद्धा सांगतील कशाबद्दल बोलतोय. तर हे केचप आपल्या घरात नाश्त्या पासून रात्रीच्या जेवण पर्यंत खाल्ले जाते. ब्रेड सँडविच, पास्ता, पिझ्झा, बर्गर ह्यात तर असतेच पण त्या परदेशी केचपला आपण चायनीज प्रमाणे भारताळले आहे.. म्हणजे त्याचे भारतीयकरण केले आहे.

पनीरच्या भाज्यात, भारतीय पद्धतीच्या चायनीज पदार्थात इतकेच काय तर लहान मुलांच्या डब्यातल्या पोळी भाजीत सुद्धा हे जाऊन पोचले आहे. पण गमतीची बाब अशी की, ‘हे खाऊन मुले आपली संस्कृती विसरून चाललेत’ ह्या सबबीखाली फ्रांसनी चक्क केचप बॅन केलेले आहे.

३. जेली स्वीटस: भारतीय लहान मुलांना गप्प करण्यासाठी गोळ्या, चॉकलेट आणि हल्ली मिळणारे साखरेच्या पाकतले दातात अडकणारे जेली स्वीट्स हमखास दिले जातात. पण ह्या जेली मध्ये कोंजेक नावाचे रसायन वापरतात. हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे.

पालकांनी ही बाब ध्यानात ठेवली पाहिजे.. ब्रिटन युरोप मध्ये आपल्या मुलांना असल्या गोष्टी देण्यापासून पालक स्वतःच जागरूक झालेले आहेत.. भारतात मात्र मुलांना ह्या जेली खायला स्वतः पालकच आणून देतात.

4. एशियन मध: ह्या ब्रँडच्या मध मध्ये हानिकारक अँटिबायोटिक आणि घातक धातू वापरले गेल्याचे उघडकीस आलेले आहे. अमेरिकेने हे बॅन केलेले आहे. तरीही भारत आणि अमेरिकेतले काही नागरिकही चीन कडून हे मध आयात करत असतात.

परदेशात खाद्य पदार्थांच्या शुद्धीकरणासाठी भरपूर निर्बंध आहेत. काही भेसळ आढळल्यास खूप मोठमोठ्या शिक्षा ही दिल्या जातात. आता हे पदार्थ तिकडे वर्ज्य आहेत म्हणजे ह्यात नक्कीच घातक घटक असणार. पण भारतात मात्र कसलेच निर्बंध नाहीत.. कोणतेही आणि कसलेही पदार्थ आपण बिनधास्त खातो आणि नंतर नशिबाला दोष देतो.. त्या पेक्षा काळजी घेऊया ना.. आपली, आपल्या कुटुंबाची आणि त्याच बरोबर देशाचीही..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!