या पाच कंपन्या गॅरेजमध्ये सुरू झाल्या आणि त्या आज दिवसाला करोडो रुपये कमावतात !

0

आता धंदा सुरु करायचा म्हटला तर आपल्याला वाटते “भांडवल पाहिजे” “काम करणारे ४-५ लोकं पाहिजे” “ऑफिस टाकायला जागा पाहिजे” “कुणालाच न आलेली भन्नाट कल्पना पाहिजे” पण हे कितपत खरं आहे कि या गोष्टींशिवाय तुम्ही व्यवसाय सुरु करू शकत नाही? आजकाल तर लोकं एक साधी Android एप बनवून रातोरात प्रसिद्ध होऊन जातात आणि काही लोकं २० वर्षे मेहनत करूनही धंदा बरोबर चालवू शकत नाही. म्हणण्याची गोष्ट हीच कि तुम्ही काय सुरु करता, कुठे सुरु करता ते महत्त्वाचं नसून तुम्ही त्याला कुठवरी नेताय हे महत्त्वाचं. आज मी तुम्हाला सांगणार आहे ५ अश्या कंपनीबद्दल ज्या गॅरेजमध्ये सुरु झाल्या होत्या आणि आज एकेका दिवसाची कमाई कोटींमध्ये आहे.

ॲमेझॉन : सुईपासुन मोठमोठ्या गाड्यांपर्यंत आज सगळं काही आपण ऑनलाईन विकत घेऊ शकतो आणि या चळवळीत प्रमुख भूमिका बजावली ती जेफ्री बेझोज यांनी. १९९४साल्या त्यांनी अॅमेझॉन डॉट कॉमची स्थापना केली आणि हा व्यवसाय सुरु केला त्यांनी आपल्या बेल्लेव्यू, वॉशिंग्टन येथे त्याचे गॅरेजमध्ये. गॅरेजमधून त्यांनी छापलेली पुस्तके विकणे सुरु केले आणि आता अॅमेझॉन छापलेल्या पुस्तकांपेक्षा जास्त ई-बुक्स विकतोय. जगातली सर्वात मोठी ऑनलाईन कंपनी; घराच्या गॅरेजमध्ये सुरु झाली; विश्वास होत नाहीये न?

गुगल : हे तर फक्त एक कंपनी नसून आता क्रियापद झालं आहे. काहीही माहिती पाहिजे असली कि “गुगल कर”. गुगलची सुरुवात देखील सुजेन वोझ्कीकीच्या गॅरेजमध्ये झाली. लेरी पेज आणि सर्गी ब्रायन यांनी एका गॅरेजमध्ये सुरु केलेली कंपनी आज जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे आणि आता तुम्हाला सांगतो कि जी कंपनी पहिल्या नंबरवर आहे ती देखील गॅरेजमध्ये सुरु झाली.

ऍपल : आयफोन घेण्यासाठी किडनी विकण्याचे जोक तुम्ही ऐकले असतील, होय – आयफोन ऍपल बनवते. १९७६साली आपल्या घरच्या गॅरेजमध्ये स्टीव जॉब्स आणि स्टीव वोझ्नीएकने ही कंपनी सुरु केली. सुरुवातीला ते लोकं फक्त पर्सनल कॉम्पुटर्स विकायचे नंतर त्यांनी स्वतःचा फोन आणला, iPod, iTunes आणि अशे खूप सारे i बापारात आणले. घराच्या सध्या गॅरेजमध्ये सुरु झालेली ऍपल कंपनी आज जगात सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे.

डीज्नी : मिक्की माउस, डोनाल्ड डक यांसारख्या एक ना अनेक कार्टून मुले लहान-थोरांची मन जिंकलेली डीज्नी ही कंपनी सुद्धा गॅरेजमध्येच सुरु झाली आहे. पेपर वाटायचं काम करण्याऱ्या वाल्ट डीज्नीला संपादकाने जॉब दिला नाही म्हणीन आपल्या भावासोबत मिळून त्याने आपल्याच गॅरेजमध्ये कंपनी सुरु केली आणि कंपनीला नाव दिले “डिस्ने स्टुडिओ”. एलीस आणि वंडरलेंड सारखे बहुप्रसिद्ध चित्रपट या कंपनीने काढले आहेत शिवाय मार्वेल कॉमिक्स सुद्धा या कंपनीच्या अंतर्गत येते.

हार्ले-डेव्हिडसन : तरुणांच्या हृदयाची धडकन असणारी ही मोटरसायकल आपण सगळ्यांनी पहिली आहे. अर्थूर डेव्हिडसन आणि विलियम हार्लेने यांनी मिळून ही मोटरसायकल कंपनी सुरु केली, आपल्या विस्कोन्सिन मधील गॅरेजमध्ये. सुरु केल्यानंतर पुढच्या दोन वर्षांत, हार्ले आणि डेव्हिडसन यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने एक कारखानाच उभारला आणि आज हार्ले-डेव्हिडसन ही जगातील सर्वात प्रसिद्ध मोटरसायकल ब्रँड आहे.

सांगायचं तात्पर्य एवढंच कि “तुम्ही आपला व्यवसाय कुठे सुरु केला, कसा सुरु केला, काय विकून सुरु केला, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे तुम्ही तो कुठपर्यंत पोहचवला. स्टीव असो वा हार्ले, पहिल्याच दिवशी त्यांचे सगळे कॉम्पुटर विकल्या गेले नसतील आणि आणि सगळ्या मोटरसायकलची बुकिंगही झाली नसेल पण त्यांनी हार मानली नाही. प्रयत्न करत राहिले, नवीन नवीन गोष्टी जोडत राहिले आणि आज बघा ते कुठे आहेत. तुम्हालाही काहीतरी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा कधीही, कुठेही सुरु करू शकता.

जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेयर करा आपल्या मित्रांशी, परिवाराशी. त्यांनाही अशी नवल वाटणारी माहिती वाचायला आवडेल आणि प्रोत्साहनही मिळेल. लवकरच अश्याच लहान जागी सुरु झालेल्या भारतातील व्यवसायांची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!