हे पदार्थ शिजवल्याशिवाय किंवा अर्धे कच्चे खाता का..? तर हे होतील दुष्परिणाम.

0

एकमेकांना भेटल्यावर एकमेकांची चौकशी करण्यापलीकडे, काय मग हल्ली दीक्षित की दिवेकर? असे प्रश्न आवर्जून विचारले जात आहेत. हल्लीच्या डाएट च्या फॅड मुळे दिवसेंदिवस खाण्यापिण्याच्या पद्धतींमध्ये फरक होऊ लागला आहे. जंक फूड न खाण्याकडे कल वाढला आहे. जितके हेल्दी जेवण तितके तब्येतीस बरे..!! कच्चे अन्नपदार्थ सुद्धा चालतीत आहेत. ते खाल्ल्याने वजन उतरविण्यास मदत होते. पण काही पदार्थ मात्र कच्चे झाल्यास तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला माहीत आहेत कोणते ते ?? चला तर मग बघुयात आज.

१. अंडी : कच्चे अंडे दुधात घालून पिणे हा काही पाहिलवानांचा रोजचा रतीब. काहींना रोज नाश्त्याच्या टेबल वर सनी साईड अप करून हाफ फ्राय आणि काहींना हाफ बॉईल्ड एग लागते हे सगळे खायला मस्त लागते ह्या बाबतीत दुमत नाही. तुमचे नशीब चांगले असेल किंवा तुम्ही निक्षून ऑरगॅनिक अंडी खात असाल तर उत्तम पण कधी कधी एखादे अंडे इन्फेक्टेड असू शकते. त्यामध्ये ‘सालमोनेला’ नावाचा घातक व्हायरस असू शकतो. जो पोटाच्या तक्रारी उभ्या करतो. त्यामुळे ‘रिस्क’ कशाला घ्या..?? मस्त पूर्ण भाजून किंवा उकडूनच मजा घ्याकी राव..

२. बटाटे : हिरवे बटाटे अथवा काही कारणाने हिरवे पडलेले बटाटे आपल्या शरीरासाठी हनिकारकच.. ह्या मध्ये ‘सोलेनाईन’ नावाचे रासायनिक द्रव्य तयार झालेले असते. डोकेदुखी, थकवा, पोटदुखी असे काही होत असल्यास आठवून पहा की आज जेवणात काय खाल्ले..?? नक्कीच हे हिरवट बटाटे खाल्ले तेही व्यवस्थित न उकडता.. खरे तर हे हिरवट बटाटे खाऊच नयेत. जर थंड हवेशीर जागी बटाट्याची साठवसन केली असेल तर ते हिरवट होत नाहीत. त्यामुळे असे बटाटे पूर्ण शिजवून खाण्यायोग्य ठरतात..

 

३. लाल बीन्स : जेवणात फक्कड राजमा चावल, किंवा लाल चवळई ची उसळ असे चटक मटकी आपल्याला सतत लागते. हे आशा प्रकारचे कडधान्य शिजवताना मात्र खूप काळजी घ्यावी लागते. ते पाण्यात काही तास भिजवून मग कूकरला ७ – ८ शिट्ट्या देऊन चांगले रटरट शिजवावे लागतात. जर कच्चे राहिले आणि पुन्हा शिजवायला कंटाळा केला तर पोटदुखी चा ‘कलप्रिट’ हाच.

म्हणजे कसं आहे ना.. ह्या मध्ये कलप्रिट नावाचे रसायन असते जे शिजवल्यावर कमी किंवा नाहीसे होते पण भाऊ, अर्ध्या कच्च्या उसळी मध्ये हे असते.. आणि मग आपल्याला उलटी, पोटदुखी, पोटात सूज येणे आशा तक्रारी उद्भवतात.

४. चिकन : अर्धे कच्चे चिकन म्हणजे हॉस्पिटल वारी..!! अहो चिकन कट केल्यावर ते खाटकाकडे किती वेळ बाहेर असते. म्हणजे त्यावर बॅक्टेरिया असतातच समजा.. आणि ते आणून धुवून स्वच्छ करून जरी आपण घेत असली तरी आतील बाजूस असलेले बॅक्टेरिया शिजवल्या शिवाय मरत नसतात.

जर हॉटेल मध्ये कच्ची तंदूरी मिळाली तर तुम्ही काय करता..?? त्वरित ती हॉटेल मालकाला दाखवून दुसरी मागवता नाही का..?? तसे घरी देखील चिकन शिजवताना ते पूर्ण शिजले आहे ना ह्याची खात्री करूनच खा… नव्हे नव्हे १६५ डिग्री वर न्हेउन शिजवा.. नाही तर ‘फूड पॉइझनिंग’ नक्की..!!

५. कसावा: परदेशी पदार्थापैकी एक असलेला कसावा हल्ली आपल्याकडे पण खाल्ला जातो. ह्याच्या पानांमध्ये ‘सायनाईड’ हे विषारी रसायन आढळते. जे ह्याचा किडे आणि जनावरांनी खाण्या पासून बचाव करते. त्यामुळे अर्थातच हे शिजवताना हलगर्जी पणा केल्यास आपल्या जीवाला धोका संभवतो.. म्हणून स्वच्छ धुवा आणि पूर्ण शिजवा.. मगच हा कसावा खा..!!

तर मित्रांनो स्वतःचे स्वास्थ्य टिकवणे आपल्याच हातात असते. थोडीशी काळजी घेतली तरच आपल्या आवडत्या पदार्थांची लज्जत आहे..! नाहीतर आपल्याच शरीराची फसगत आहे..!! काळजी घ्या.. मस्त खा आणि तंदुरुस्त राहा..

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!