फक्त सलमानच नाही तर या तीन प्रसिद्ध अभिनेत्रीही आहेत अविवाहित !

0

“किती वाजले?” या प्रश्नानंतर जर भारतात कोणता प्रश्न सर्वात जास्त विचारल्या जात आहे तर तो आहे “सलमान खान कधी लग्न करणार आहे?”. हो ना, आता पन्नाशीत असलेला सलमान खान अजूनही अविवाहित ही गोष्ट पचत नाहीये पण खरी आहे. सलमान खान भारताचा सर्वात जास्ती वयाचा बेचलर आहे आणि तुम्हाला माहिती आहे का सलमान खानला सोडून बॉलीवूडमध्ये अजूनही असे काही दिग्गज कलावंत आहेत जे अविवाहित आहेत.

आणि वाटतंय सलमान खान सोबतच त्या तीन कलाकारांचे आयुष्य सुद्धा अविवाहितच जाईल. या यादीत बॉलीवूडच्या काही सुंदर अभिनेत्री सुद्धा आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहे ते दिग्गज कलावंत.

साक्षी तनवर : साक्षी टीव्हीच्या जगाची एक खूपच प्रसिद्ध अभिनेत्री आहे. साक्षीचा जन्म 12 जानेवारी 1973 मध्ये एका सेवा-निवृत्त सीबीआई अधिकाऱ्याच्या घरी झाला. ती एक भारतीय अभिनेत्री आणि दूरदर्शन प्रस्तुतीकार आहे. ती आपल्या दूरदर्शनच्या कहाणी घर घर कि आणि बडे अच्छे लगते है मधील कामासाठी खूप प्रसिद्ध आहे. 2016 मध्ये त्यांनी आमिर खान-कलाकार दंगलमध्ये अभिनय केला. साक्षीला एक मुलगी आहे जिला त्यांनी २०१८ मध्ये दत्तक घेतलं; दित्या तनवर. ४६ वर्षांच्या साक्षीला अजूनपर्यंत आपल्या आवडीचा नवरा मिळाला नाही कदाचित.

तब्बू : तब्बू ती अभिनेत्री आहे जिच्या लग्नाची वात प्रेक्षकांना एकदम सलमान खानच्या लग्नासारखी लागली आहे. तब्बू म्हणून ओळखली जाणारी तबस्सुम फातिमा हाश्मी हिचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 ला झाला. या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे चे अजूनही लग्न झालेले नाही. तिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त इंग्रजी, तमिळ, तेलगु, मल्याळम, मराठी आणि बंगाली या भाषांमध्ये सुद्धा प्रामुख्याने काम केले आहे.

तिने दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार जिंकला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी रेकॉर्ड चार वेळा पुरस्कारांसह सहा फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले आहेत. 2011 मध्ये त्यांना भारत सरकारद्वारे पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. तब्बू चे अफेयर तर खूप राहिले पण त्यांची गोष्ट लग्नापर्यंत पोहचली नाही आणि मला वाटते आता तिचा लग्नाचा काही विचार नाहीच.

जया भट्टाचार्या : जया भट्टाचार्य टीव्ही जगताची एक खूपच लोकप्रिय कालकार आहे आणि तिने जवळपास ३० मालिकांत काम केलं आहे. जया टीव्ही सीरियलमध्ये ती विरोधी/खलनायिकेची भूमिका बजावण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका देखील केल्या आहेत. त्यांची क्योंकी सास भी कही बहू थी मधील पायलच्या भूमिकेसाठी खूपच प्रसिद्ध आहे.

तिने कसममध्ये जिग्यासा बालीची भूमिका, झांसी की रानी मधील सक्कू बाईची आणि गंगा येथील सुधा बुआ यांची भूमिका बजावली आहे. थपकी प्यार की या मालिकेतील (2015-2017) मध्ये वसुंधरा पांडे यांच्या भूमिकेतून त्यांनी पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवली. ४७ वर्षीय ही अभिनेत्री सुद्धा अजूनही सिंगल आहे. तर ही होती माहिती काही अविवाहित अभिनेत्रींची.

सोबतच अक्षय खन्ना (विनोद खन्नांचा ,मुलगा) सुद्धा अविवाहित आहे. अक्षय खन्नाचा जन्म 28 मार्च 1975 रोजी झाला. त्यांना दोन फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले आहेत.एवढ्या वयाचा हा अभिनेता सुद्धा अविवाहित आहे. आता यांचं लग्न जोडून देण्यासाठी तुम्ही काही मदत करू शकत असाल तर नक्की सांगा आणि अश्या मजेदार माहितीसाठी आम्हाला फॉलो करत रहा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!