Loading...

दिवंगत लोकनेते मनोहर पर्रीकरांच्या या १० गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहिती असायला पाहिजे.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

आपणास कळविण्यात अत्यंत दुखः होत आहे कि गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माझी रक्षा मंत्री मनोहर पर्रीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना Pancreatic Cancer झाला होता. कर्करोगाशी झुंज देत असताना देखील मनोहरराव कामावर होते आणि नाकात नळी लागली असताना त्यांनी बजेट मांडला होता. अश्या या महान माणसाला स्टार मराठी कार्यकर्त्यांची भावपूर्ण श्रद्धांजली. या आहेत काही गोष्टी ज्या तुम्हाला मनोहर पराळीकरांबद्दल माहिती असायलाच पाहिजे.

आपली राजकीय भेट असो किंवा आपल्या मुलाचे लग्न, त्याचं आपलं अर्ध्या बाह्यांचे शर्ट, ट्राऊजर आणि साधी पादत्राणे, हाच त्यांचा पोशाख असायचा. त्यांच्या शेवटच्या घटकांमध्ये देखील ते आपल्याला याच पोशाखात दिसले.

Loading...

भारतीय जनता पक्षाच्या या नेत्याने व्यक्तिगत कारणांना आपल्या सरकारी आणि लोकांच्या कामावर किंवा जबाबदाऱ्यांवर कधीच हावी होऊ दिलं नाही. उदाहरण बघायचे झाले तर जेव्हा त्यांनी सन २००० मध्ये मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली त्याच्या काही महिन्यानंतरच त्याच्या पत्नीचे निधन झाले, पण त्यांनी या दुर्घटनेला त्याच्या जबाबदारीवर परिणाम होऊ दिला नाही आणि आपल्या किशोरवयीन मुलांचे देखील योग्य पालन केले.

पर्रीकर सरकारी माणूस म्हणजेच मुख्यमंत्री असून देखील त्यांनी पाहिजे ते सरकारी फायदे घेतले नाही. ते स्वतःच्याच घरात रहायचे जे अगदी सामान्य होतं. ते अजूनही आपली इनोवा गाडी वापरायचे जी त्यांना विरोधी पक्षाचा नेता नात्याने मिळाली होती.

मनोहर पर्रीकर एयरलाईनच्या इकोनोमी क्लासमध्येच प्रवास करायचे. मी तर पुष्कळ वेळा असं वाचलं आहे कि ते गोव्याच्या बाहेर असताना सामान्य माणसासारखे ऑटोरिक्षा किंवा दुसऱ्या सार्वजनिक वाहनातून देखील प्रवास करायचे.

ते स्वतःच्या मोबाईलचे बिल देखील स्वतःच भरायचे.

त्यांना गोव्याचे मिस्टर क्लीन सुद्धा म्हटलं जायचं. राज्यातील बेकायदेशीर खनन रॅकेट हटविल्यानंतर त्यांनी बऱ्याच व्यापाऱ्यांचे परवाने काढून घेतले होते आणि याच कारणांने त्यांना हे नाव मिळालं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बिडीओ, पंचायतचे सचिव, खालच्या दर्जाचे कर्मचारी; जो कुणी भ्रष्टाचारात सापडला, त्या सगळ्यांना निलंबित केलं आहे.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई मधून पदवी घेतलेले मनोहर पर्रीकर पहिले IITen MLA होते. १९७८ मध्ये त्यांना IIT Bombay ची मेटलर्जिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळाली.

Loading...

मनोहर पर्रीकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी जवचे होते. जेव्हा २०१४ मध्ये मोदींची लहर यायची होती तेव्हा त्यांनी उघड्या स्वरुपात मोदींना पंतप्रधान पदी निवडल्या जाण्याची गोष्ट केली होती.

ज्या वेळी भारताने पहिली वहिली सर्जिकल स्ट्राईक केली त्या वेळी मनोहर पर्रीकर हे भारताचे रक्षा मंत्री होती आणि त्यांच्या आयुष्यातील ही सर्वात मोठ्या कामगिरीपैकी एक आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

त्यांना २००१ मध्ये आईआईटी मुंबईचा प्रतिष्ठित माजी विद्यार्थी, २०१२ मध्ये सीएनएन-आईबीएनचा राजकारण श्रेणीतील इंडियन ऑफ द इयर, २०१८ मध्ये नेशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा द्वारा डॉक्टरेट आणि २०१८ मध्येच डॉक्टर एस पी पारितोषिक मिळाले आहे.

अश्या या जमिनीशी जोडला असलेल्या नेत्याला टीम स्टार मराठीची भावपूर्ण श्रद्धांजली.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.