Loading...

तुम्हाला माहिती नसेल रोज 3 मिनिटे धावल्याने होतात बॉडी मध्ये हे 5 बदल वाचा !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

डोंगराला आग लागली पळा पळा पळा.. हा खेळ आपण लहान पाणी खेळायचो.. शिवणापाणी, धावयची रेस आणि कित्येक मैदानी खेळ खेळून आपण अगदी धष्टपुष्ट राहायचो. हल्ली सारखे कोणते आजार नाहीत की स्थूलता नाही. शरीराला मैदानी खेळांमुळे भारीच व्यायाम मिळायचा. पण आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे मैदानी खेळ विसरत जातो आणि नंतर पोटापाण्याच्या कामाला लागल्यावर तर पगाराबरोबर वाढत जाते ते फक्त वजन..!!

Loading...

त्या वाढत्या वाजनाकडे दुर्लक्ष करायला आपल्याकडे खूपच गोंडस कारण असते. ते म्हणजे ‘व्यायामाला वेळ नाही’ पण तुम्हाला खुप्पच सोप्पा व्यायाम मिळाला ज्याला अवघी ३ ते ४ मिनिटे सुद्धा भरपूर आहेत, तर तेवढा वेळ तर नक्कीच तुमच्याकडे असेल नाही का ? हो रोजची ३ ते ४ मिनिटे भरपूर झाला एवढाच व्यायाम. नॉन स्टॉप पाळायला जा. ३ मिनिटे रोज न चुकता, रनिंग शूज घालून मस्त धवायला जा. ह्याने तुमचे वजन कमी होणार आहे. पण फक्त इतकेच नाही तर आणखीही काही भन्नाट फायदे शरीराला मिळणार आहेत. कोणते म्हणता ? वाचा तर मग.

१. शरीराचे मेटाबॉलिझम उत्तम होते : ‘पळणे’ ह्या व्यायाम प्रकाराला ‘हाय इंटेनसिटी वर्कआऊट’ म्हणतात. म्हणजे असा व्यायाम जो केल्यानी तुमच्या कॅलरीज जळतात. पण तुमचा मेटाबॉलिझम रेट उत्तम झाला तरच तुमचे वजम भराभर उतरते. आणि पाळण्याच्या व्यायामामुळे मेटाबॉलिझम नक्कीच वाढते. म्हणजे ‘वाढता मेटाबॉलिझम आणि घटते वजन’ असे ते गणित आहे..!!

२. हृदयाचे स्वास्थ्य राखते : पळल्याने आपल्या हृदयाचे ठोके वाढतात म्हणजेच हार्ट रेट सुधारतो. ह्या मुले हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रुधिरा उत्तम काम करू शकतात आणि हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. हृदय ठणठणीत राहते. हाय कोलेस्टेरॉल किंवा मधुमेहाचा हृदयाला असणारा धोका देखील टळतो.

Loading...

३. डिप्रेशन घटवते : अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी इतर कोणत्याही व्यायाम प्रकार पेक्षा धावल्याने शरीरातील मेद झपाझप कमी होतो. आणि लठ्ठपणामुळे आलेले डिप्रेशन देखील कमी होते. मानसिक तणाव कमी करते. शरीरातील निगेटिव्ह एनर्जी देखील कमी होते.

४. शारीरिक शक्ती वाढवते : धावण्याने शरीराला मजबुती येते. स्नायूंची शक्ती आणि पर्यायाने शाररिक शक्ती वाढते. ह्याला सोप्या भाषेत ‘स्टॅमिना’ वाढणे देखील म्हटले जाते. त्यामुळे अपण सहजासहजी आजारी पडत नाही.

५. पायांचे टोनिंग होते आणि हाडे, सांधे ह्यांचे आयुष्य वाढते : पायाचे स्नायू मजबूत झाल्याने आपल्या पायांना धावपटूंच्या पायाप्रमाणे आकार येतो. सांधे आणि हाडे मजबूत होतात. उतारवयात होणारी सांधे दुःखी आपण टाळू शकतो.

पळून आल्यावर शरीरास परिपूर्ण अशा आहाराची गरज असते तो योग्य प्रमाणात घेतल्यास आपले वजनही लवकर कमी होते. तर मग मंडळी लवकर हे रुटीन सुरू करा.. पळा पळा, कोण पुढे पळे त्याला चांगला रिझल्ट मिळे..!!

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.