Loading...

फक्त साडेसात एकरात 60/70 लाखाचं उत्पन्न काढतोय हा ६वी पास तरुण !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

वडिलांची २५ एकर शेती, धान्य आणि भाजीपाला पिकवणारी पारंपरिक शेती. हुशार मुलगा पण वडिलांच्या अचानक मृत्यू मुळे घरावर मोठं संकट कोसळलं, सगळी शेतीची जबाबदारी आईच्या खांद्यावर पडली. आईला थोडीफार मदत करायला लागला. पण शाळा सोडावी लागली. पारंपरिक शेतीत ह्याचं मन रमेना, म्हणून कामधंदा करून पैसे कमावण्याची आस लागली. घर सोडून लांब जावं लागलं तेंव्हा काम मिळालं.

Loading...

शिकायची जबरदस्त आवड, पण शिक्षण नाही, मग मेकॅनिक ची कामं करून निष्णात झाला, हळू हळू इंग्लिश शिकायला सुरुवात केली, आणि इंग्लिशवर प्रभुत्व मिळवलं. कॉम्पुटर शिकून इंटरनेट सर्फिंग जमायला लागलं. हळू हळू चांगली नोकरी मिळवली, अनेक क्षेत्रातलं ज्ञान आत्मसात केलं, अशी १३ वर्ष बाहेर काम करून आईच्या आग्रहामुळे परत घरी आला.

आल्यावर गावात सगळीकडे फिरून बघितलं तर सगळे शेतकरी पारंपरिक शेती सोडून चहाची शेती करायला लागले होते . सखोल चौकशी करून ह्याने सुद्धा चहाची शेती करायचा निर्णय घेतला. आसाम मधल्या उदलगिरी जिल्ह्यातला, कचिबारी गावातला हा शेतकरी, त्याचं नाव आहे तेनजिंग बोडोसा. चहाची शेती करायचा निर्णय घेतला खरा, पण अनुभवी लोकांच्या सांगण्यावरून ह्या शेतीला रासायनिक खतं आणि रासायनिक फवारणी करावी लागते हे तेन जिंग च्या ध्यानात होतं.

आणि त्यानुसार त्याने चहाची लागवड करून रासायनिक फवारणी आणि खतं द्यायला सुरुवात पण केली, खतं आणि फवारणी करताना त्या खतांचा आणि त्या औषधांचा खूप उग्र वास यायचा. ह्या वसानी तेन जिंग ला त्रास व्हायचा, त्याचं त्या वासानी डोकं दुखायला लागायचं, आणि नंतर उलट्या व्हायला लागल्या. अनेक वेळा ही खतं आणि फवारणी करून त्याला जास्तच त्रास व्हायला लागला.

करण असली रासायनिक खतं किंवा फवारणी त्याच्या वडिलांनी पण कधी केली नव्हती. वडील नेहमी जैविक खतं, वापरायचे, गायीच्या शेण आणि गोमूत्र ह्यापासून बनवलेलं खत सगळ्या शेतीला पुरायचं, हे तेनजिंग सुद्धा लहानपणी पाहायचा. ह्या वासाचा त्रास होतो म्हणून त्याने जैविक खतं वापरता येतील का म्हणून बंगलोरच्या डॉ. नारायण रेड्डी ह्यांची भेट घेतली.

त्यांनी दिलेल्या माहितीवरून जैविक खतांचा वापर सुरू केला, पण म्हणावा तसा परिणाम मिळाला नाही. मग इंटरनेट वरून कॅनडा मधल्या फरटाईल ग्राउंड नावाच्या NGO ची माहिती मिळाली. त्या लोकांशी संपर्क साधल्यावर त्यांनी तेनजिंग ला कॅनडा मध्ये बोलावले. त्याला ट्रेनिंग दिले आणि नंतर त्यांच्या लोकांनी तेंजिंगला त्याच्या शेतात येऊन मदत केली. आणि २००७ मध्ये तेनजिंग ने संपूर्ण जैविक पद्धतीने चहाची शेती करायला सुरुवात केली.

Loading...

भरपूर आणि भरघोस पीक आलं आणि त्यानंतर फक्त जैविक खतं वापरूनच त्याने शेती केली. आपल्या २५ एकर शेतात फक्त साडेसात एकरात जास्तीत जास्त चहाचं उत्पादन मिळवून दाखवलं. बाकीच्या शेतात धान्य, आणि फळं ह्यांचं सुद्धा जैविक पद्धतीनं जोरदार उत्पन्न मिळवायला सुरुवात केली.

आज तेनजिंग ह्या चहाच्या उत्पादनातून ६०/७० लाख रुपये सहज मिळवतो आहे. बाकीचे उत्पन्न वेगळेच.चहा चे ठोक विक्रेते इतर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर करायला भाग पडायचे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचा कस कमी व्हायचा, चाहशिवाय दुसरं कोणतही उत्पादन घेताच येत नव्हतं, मग ह्या इतर शेतकऱ्यांनी तेनजिंगची मदत घेतली. आणि त्यांना सुद्धा चांगलं उत्पादन मिळायला लागलं.

तेनजिंग च यश सगळीकडे पसरायला वेळ लागला नाही. आज अनेक लोक त्याच्याकडे जैविक शेतीचं मार्गदर्शन घेण्यासाठी लांबून लांबून येतात. तेनजिंग त्यांना खूप आपुलकीनं आणि आनंदानं मार्गदर्शन करतो आहे. काही लोक त्याच्याकडे संपूर्ण ट्रेनिंग घेण्यासाठी येतात,१०/१० लोकांच्या टीमला सुद्धा तेनजिंग ट्रेनिंग देतो. ते लोक तिथेच राहतात आणि त्यांची सगळी सोय तेनजिंग कडे केली जाते, जेवण खाण, राहण्याची सोय वगैरे.

तेनजिंग च्या शेतातला शेवटचा काही भाग हा त्याने न पिकवता प्राण्यांसाठी, पशु पक्षांसाठी म्हणून वेगळा ठेवला आहे. त्या भागात खूप झाडे लावली आहेत. आणि अलीकडे संपूर्ण बांबूची लागवड केली आहे त्यामुळे त्या शेतात अनेक जंगली प्राणी , पक्षी अगदी मुक्त विहार करत असतात. मुख्य म्हणजे ह्या शेताला लागून भूतानची सीमा रेषा आहे आणि तिथेही घनदाट जंगल आहे, ह्या जंगलात खूप हत्ती आहेत ते हत्ती चाऱ्यासाठी तेनजिंगच्या त्या राखीव शेतात येत असतात आणि त्यांना भरपूर चारा मिळतो.

तेनजिंग ला सुद्धा प्राण्यांचा तो सहवास आवडतो म्हणून त्याने तेवढा शेताचा भाग प्राण्यांसाठी राखून ठेवला आहे. आता तर तेनजिंग कडे परदेशातून लोक भेट देण्यासाठी यायला लागले आहेत. काही लोक निसर्ग अनुभवायला येतात, तर काही शेतीची माहिती घ्यायला येतात तर काही लोक प्राणी बघायला येतात. पण तेनजिंग सगळ्यांचे आदराने स्वागत करतो.अशा ह्या हरहुन्नरी शाळा न शिकलेल्या पण सगळ्यात पारंगत असलेल्या सुशिक्षित शेतकऱ्याला आमचा सलाम.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.