या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीवर फिदा आहे टायगर श्रॉफ, अभिनेत्रीचे नाव ऐकून विश्वास बसणार नाही!

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच त्याचा बागी 3 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या टायगर बागी 3 च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. याशिवाय टायगर नेहमीच दिशा पाटनीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतो. या दोघांनीही कधीच त्यांचं नातं मान्य केलं नसलं तरीही त्यांना सतत एकत्र पाहिल्यावर या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे असं सर्वांना वाटतं. पण बागी 3 च्या प्रमोशनमध्ये टायगरनं त्याच्या क्रशचा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसेल.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत टायगर श्रॉफनं त्याच्या क्रशचं नाव सांगितलं. ही मुलगी दिशा पाटनी नाही तर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. एवढंच नाही तर शाळेत असताना पासूनच मला श्रद्धा आवडते असंही या मुलाखतीत टायगरनं स्पष्ट केलं आहे.

वढी हिंमत नव्हती. त्यामुळे असं झालं की श्रद्धा याबद्दल कधीच समजलं नाही.’ टायगर श्रॉफच्या अगोदर वरुण धवननंही कॉलेजमध्ये असताना त्याला श्रद्धा कपूरवर क्रश होतं. पण त्यावेळी त्यालाही त्याच्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत.

टायगर आणि वरुण दोघांनीही त्यांना श्रद्धा कपूरवर क्रश असल्याचं सांगितलं असलं तरीही आता त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे जोडीदार आहेत. टायगर दिशा डेट करतो असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे वरुण धवन लवकरच त्याची बालमैत्रिण नताशा दलालशी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या तयारीत आहे. ऑनस्क्रीन केमिस्ट्री बद्दल बोलायचं तर वरुण आणि टायगर या दोघांसोबतही श्रद्धाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

टायगर श्रॉफचा बागी फ्रेंचायजीचा हा तिसरा जबरदस्त अ‍ॅक्शन सिनेमा असणार आहे. ‘बागी 3’चं दिग्दर्शन अहमद खाननं केलं आहे. तर निर्मिती साजिद नाडियालवालाची आहे. या सिनेमात आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे यांच्याही भूमिका असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे या तिसऱ्या भागातही जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स असणार आहेत.