Loading...

सकाळी लवकर उठण्यासाठी महत्वाच्या टीप्स

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

‘लवकर निजे,लवकर उठे त्याला आयु-आरोग्य लाभे.’ ही म्हण आपण अगदी आपल्या लहानपणा पासुन ऐकत आलो आहे. मात्र लवकर जाग येत नाही म्हणुन किंवा आळसामुळे आज आपण लवकर उठणे हे जवळजवळ विसरुनच गेलो आहोत. सकाळी लवकर उठल्याने दिवसभरातील कामे वेळेत होतात व कामाचा ताण कमी होतो. कामे घाईघाईत करण्याचे प्रमाण कमी होते.

सहाजिकच आपला संपुर्ण दिवस फ्रेश जातो.  याउलट रात्री उशीरापर्यंत जागरण केल्याने शरीराला आठ तासांची पुरेशी व निवांत झोप मिळत नाही.

याचा विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण होतात. मग यावर उपाय म्हणुन आपण लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. पण सकाळीअगदी गजर लावुनही उठण्यात यश येत नाही.

Loading...

सकाळीलवकरजाग येण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स-

रात्री वेळेत झोपा-

इतर कामापेक्षा पुरेश्या झोपला प्रथम प्राधान्य द्या. यासाठी रात्री ठरवून वेळेवर झोपा व सकाळी लवकर उठा.

उशीरा झोपण्याची सवय बदला-

रात्री उशीरा झोपल्याने दुस-या दिवशी सकाळी लवकर उठणे तुम्हाला शक्य होत नाही. मग या गोष्टीची तुम्हाला सवयच लागते. सर्वप्रथम ही सवय बदला.रात्री झोप येत नसेल तर रात्री एक ग्लास कोमट दुध घ्या. शतपावली करा. ज्यामुळे तुम्ही लवकर झोपु शकाल. जाणून घ्या शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’ फायदेशीर !

प्रयत्न सोडू नका-

जर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी जाग आली नाही तर लगेच धीर सोडू नका. तुमच्या शरीराला उशीरा उठण्याची सवय लागली आहे ही सवय मोडायला थोडा वेळ लागेल. जरी पहिल्या दिवशी तुम्हाला वेळेत जाग आली नाही तरी आठवडाभर प्रयत्न केल्यास तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागेल. त्यामुळे प्रयत्न करीत रहा.

आधी छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा-

सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करण्यासाठी आधी छोटे-छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा.म्हणजे पहिल्या दिवशी नेहमीच्या वेळेच्या १५ मिनीटे आधी झोपा व दुस-या दिवशी १५ मिनीटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा.

मग दुस-या दिवसापासुन ३० मिनीटे आधी झोपा व ३० मिनीटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा.अशा रितीने तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळी सकाळी लवकर उठण्यात यश मिळवू शकता. नक्की वाचा नवजात बाळांपासून वयोवृद्धांना नेमकी किती तास झोप आवश्यक आहे ?

दुपारी झोप घेण्याचे टाळा –

कधीही दुपारी झोपू नका.कारण दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही व त्यामुळे पुन्हा सकाळी लवकर जाग येत नाही.

Loading...

दुपारची झोप टाळण्यासाठी स्वत:ला इतर गोष्टी किंवा तुमच्या आवडीच्या छंदामध्ये मध्ये गुंतवा. (सुचना-मात्र डॉक्टरने काही कारणांमुळे तुम्हाला दुपारी झोप घेण्यास सांगितले असेल तर मात्र तसे करा.)

झोपण्यापुर्वी वातावरण निर्मिती करा-

पुस्तके वाचा किंवा सुवासिक चहा घ्या किंवा ज्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल अशी एखादी गोष्ट ठरवून रोज रात्री करा. ज्यामुळे ती गोष्ट केल्यावर तुमच्या शरीराला झोपण्याची वेळ झाली असे वाटेल.

झोप येण्यासाठी तुमच्या बेडरुममधील वातावर स्वच्छ, नीटनेटके, आनंदी व झोपेसाठी पुरक असे ठेवा. जाणून घ्या अपुरी झोप वाढवेल या ‘7’ समस्यांचा धोका

आठवडा भराच्या कामाचे नियोजन करा-

आठवडाभरात तुम्ही जी कामे करणार आहात त्याचे आधीच नियोजन करा. रोजच्या कामामध्ये तुम्हाला उत्साहीत करणारी कामे सकाळी सकाळसाठी ठरवा.

जसे की मित्राला फोन करणे किंवा एख्याद्या नविन जागी भेट देणे ज्यामुळे तुम्हाला सकाळी उठण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.