हि आहेत भारतातील २० पर्यटन स्थळं, जिथे फक्त फेब्रुवारी महिन्यातच जावं.

0

आपलाच भारत देश इतका निसर्गाने आणि डोळ्याचे पारणे फिटेल अशा अद्भुत गोष्टींनी नटलेला आहे की त्या स्थळांना आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आता अनेक स्थळांना भेटी द्यायच्या तर त्याला काही विशिष्ट वेळी जर तुम्ही गेलात तर फुललेला निसर्ग, अतिशय ताजी शुद्ध हवा, कमीत कमी गर्दी, कमी खर्च, आणि भरपूर आनंद लुटता येईल, म्हणून ह्या फेब्रुवारी महिन्यात कोणत्या स्थळांना तुम्हाला भेट देणं आणि तिथली मजा लुटणं सोयीचं आणि सुखद असेल अशी सुंदर सुंदर ,आणि विविधतेने नटलेली २० ठिकाणं आहेत. मग कुठं जायचं ते लवकर ठरवा आणि निघा झटपट.

१- गोवा- निसर्ग रम्य गोवा म्हणजे पर्यटकांसाठी ह्या महिन्यात पर्वणीच ठरते. डिसेंबर, जानेवारीत सगळे पर्यटक इथे जाऊन आलेले असतात, त्यामुळे ह्या महिन्यात गोव्यात गर्दी नसते. राहायला उत्तम हॉटेल्स स्वस्त दरात मिळतात, हवा अगदी मस्त असते. गोव्यातले असंख्य बीचेस कमी गर्दी मुळे मनमुराद पाण्यात डुंबायची मजा अनुभवता येते. वॉटर स्पोर्टस ची खरी मजा लुटता येते. सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना निवांत भेटी देता येतात आणि पाहिजे तेवढं शॉपिंग करता येतं. रस्तेसुद्धा फार गजबजलेले नसतात.ही सगळी खरी मजा ह्याच महिन्यात अनुभवायला मिळते.

२- आग्रा- हे स्थळ ह्या बघायला हाच महिना सोयीस्कर म्हणता येईल. कमी गर्दी मुळे सगळी ठिकाणं शांतपणे बघता येतील. ताजमहाल तर आहेच पण मेहतबा बाग सुद्धा पर्यटकांना आकर्षित करते. दिल्ली तून ही सफर यमुना एक्सप्रेस मुळे एक दिवसात करता येते.

३- मोरनी, ( हरियाणा ) हे एक निसर्ग सौंदर्याने नटलेले मनाला आल्हाददायक असे ठिकाण आहे. ट्रेकिंग करणाऱ्यांना इथे ते थ्रिलिंग अनुभवायला मिळते. शिवाय बोटिंग करायला खूप मजा येते. हिरवा गार निसर्ग, डोंगर दऱ्या, पाणी, ही मजा वेगळीच असते.

४- निमराना, ( राजस्थान ) निमराना फोर्ट साठी खूपच प्रसिद्ध आहे. कदाचित तुम्ही गेलाही असाल. फेब्रुवारी महिन्यातच इथली मजा अनुभवायला पाहिजे. ह्या किल्ल्याच्या आतून बाहेरचं सौंदर्य अनुभवा, खूप मोठी आणि सुंदर लेक इथे आहेत.

५- शिमला (हिमाचल प्रदेश )- स्नो फॉल चा अनुभव घ्यायचा असेल तर शिमला हे फेब्रुवारी महिन्यात जाण्याचं योग्य ठिकाण. हिम वर्षाव ह्याच महिन्यात तुम्हाला शिमल्यात पाहायला मिळेल. आणि ‘माल रोड’ इथं भरपूर शॉपिंग करू शकाल.

६- माल देवता, ( उत्तरा खंड ) ट्रेकर्स साठी पर्वणी असलेलं हे ठिकाण. उंच उंच पहाड इथे पाहायला मिळतात. शिवाय ह्या उंच पहाडातून जमिनीवर कोसळणारे धबधबे तुम्हाला खिळवून ठेवतात.

७- कुर्ग ( कर्नाटक ) कर्नाटकातल्या ह्या कुर्ग ला भारतातल्या स्कॉटलंड ची उपमा दिली जाते. निसर्ग रम्य ठिकाण. इथे चहा आणि मसाल्याच्या पदार्थांची शेती केली जाते. आणि फेब्रुवारी महिन्यात चहा आणि मसाल्याच्या पदार्थांचा सुगंध सगळ्या आसमंतात दरवळायला लागतो. हाही एक वेगळा अनुभव घ्या.

८- मुंबई- महाराष्ट्राची राजधानी, २४ तास जागी असणारी ही मुंबई फेब्रुवारी महिन्यात बघायला जाणे योग्य. हवेत गारवा असतो, सगळीकडे अथांग समुद्र, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, म्युझियम, मत्स्यालय, प्लानिटोरिम राणीचा बाग, मलबार हिल, महालक्ष्मी मंदिर, सिद्धी विनायक,सी लिंक,जुहू बीच, ही मुंबईतली प्रेक्षणीय स्थळं.

९- उदयपूर-(राजस्थान) संपूर्ण डोंगरांनी वेढलेलं एका बाजूला पाणी, आणि ऐतिहासिक वारसा असलेलं हे शहर फेब्रुवारी महिन्यात कात टाकल्या सारखे दिसते.

१०-जैसलमेर (राजस्थान) जैसलमेर फोर्ट बघण्यासाठी आणि राजपुतांचा ऐतिहासिक हवेल्या पाहण्यासाठी इथे जरूर जावेच. पाकिस्तान ची बॉर्डर दिसते इथून अगदी जवळ.

११-गुलमर्ग- संपूर्ण बर्फाच्छादित शहर,डोंगर दऱ्या, त्यामुळे नवीन लग्न झालेल्या जोडीला हनिमून साठी उत्तम ठिकाण.

१२- वृंदावन- तुम्ही धार्मिक असा किंवा नसा, वृंदावन ह्या महिन्यात पाहायला डोळ्याचं पारणं फिटल्याचा अनुभव देतं.

 

१३- बीर, (हिमाचल प्रदेश) पॅराग्लायडिंग चे शौकीन असाल तर हा अनुभव घ्यायला फेब्रुवारीत जा आणि मनसोक्त पॅराग्लायडिंग करा.

१४- अल्मोडा, अतिशय सुंदर आणि आवडेल असे हिल स्टेशन. निसर्ग आणि भव्य सुंदर मंदिरे इथली विशेषता.

१५- वाराणसी,- धार्मिक शहर, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी इथे जायचं आणि महा शिवरात्रीचा धार्मिक आनंदासाठी लुटायला वाराणसी एकमेव ठिकाण.

१६- लुधियाना- लोकरीचे गरम कपडे, सुती कपडे ह्यांच्या शॉपिंग साठी लुधियाना एक प्रसिद्ध शहर म्हणून ओळखलं जातं. नवीन नवीन गाड्या घेणारे शौकीन इथे भरणाऱ्या Mach Auto Expo साठी देश विदेशातून येतात.

१७- कोलकाता- एक व्यापार करणारं शहर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. बंगाली मिठाई, संदेश ही मिठाई इथली खूप प्रसिद्ध आहे. ट्राम मधून कोलकाता शहराची सफर करून मजा घ्या.

१८- बेंगळुरू- निसर्ग प्रेमींसाठी फेब्रुवारी महिन्यात Neralu Festival असतो. ह्यात झाडे आणि निसर्ग ह्याच्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी जरूर जावे असे ठिकाण.

१९- कच्छ- (गुजरात) सगळं गुजरात फिरा पण कच्छ ला जाऊन आल्याशिवाय गुजरात ची सफर पूर्ण होत नाही. पण हाच महिना कच्छला भेट देण्यासाठी चांगला असतो.

२०- कोवलम- (केरळ) सुंदर आणि शांत समुद्र आणि रेती चा स्वच्छ बीच हे इथलं वैशिष्ट्य. वॉटर स्पोर्ट्स चा मनमुराद आनंद घेण्यासाठी आणि केरळी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ह्या बीच वर गेलात की तिथेच मुक्काम करावा असेच वाटते.

मग काय ? कुठं जायचं ठरावताय? कुठं जाऊ न कुठं नको असं झालं ना? पण जाऊन आल्यावर अनुभव कळवायला विसरू नका बरका..

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!