Loading...

मराठीतला हा लोकप्रिय अभिनेता, एकेकाळी होता बॉलिवूडमध्ये साईड डान्सर!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

‘चालतंय की…’ म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून हार्दिक घराघरांत पोहोचला आहे. कमी कालावधीतच तो घराघरातील अविभाज्य भाग बनला आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादाच्या भूमिकेने हार्दिकला खरी ओळख मिळवून दिली.

मित्रांनो तुम्हांला झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका तर माहिती असेलच. हि मालिका सुरु झाल्यापासूनच मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर खूप आधीपासूनच राज्य केलं आहे. मालिकेतील राणादा आणि पाठक बाई तर प्रत्येकाच्या कुटुंबाचा जणू भागच बनले आहेत. राणा आणि पाठकबाईच्या ह्या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रालाच वेड लावले.

Loading...

हार्दिकचा अभिनयाचा हा प्रवास 2009 पासूनच सुरु झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अनेक लहानमोठ्या भूमिका केल्या. याचकाळात त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये साइड डान्सर म्हणूनही काम केले.

६ ऑक्टोबर १९८८ ला हार्दिकचा जन्म झाला. शाळेतील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने २००९ साली मुंबईमधील माटुंगा येथील खालसा कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्याला मोटारबाईक्सची आवड असून तो स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त आहे.

मालिकेत येण्यापूर्वी हार्दिक जोशीने खूप संघर्ष केलेला आहे. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि तो एक उत्कृष्ठ डान्सर सुद्धा आहे. त्याने बॉलिवूडमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून सुद्धा काम केलेले आहे.

कोरिओग्राफर गणेश आचार्य ह्यांच्या हाथाखाली अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ ह्या चित्रपटाच्या गाण्यात हार्दिक जोशीने साईड डान्सर म्हणून काम केलेले आहे. ह्या चित्रपटाच्या टायटल सॉंग मध्ये त्याने काम केले असून त्याचा फोटोही त्याने त्याच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर ‘माय वर्क’ असे कॅप्शन ठेवून शेअर केलेला आहे.

Loading...

हार्दिकने ‘अस्मिता’, ‘राधा ही बावरी’, ‘दुर्वा’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ यासारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले. तसंच मकरंद अनासपुरेच्या ‘रंगा पतंगा’ चित्रपटात त्याने एसीपी पाठक नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमातही त्याने छोटेखानी भूमिका साकारली होती.

 

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.