तुला पाहते रे फेम गायत्री दातार हिला चक्क एका महिलेचा अश्लील मॅसेज !
ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतो तीही एक स्त्री चं असते. आपली आई आपल्याला खूप प्रिय असते. आदरयुक्त असते. तर मग समाजात जगणाऱ्या स्त्रीचा ही आई सारखचं सन्मान करणं ही काळाची खूप मोठी गरज आहे. आपली नजर कुणाकडे ही पाहण्याचा हा स्वच्छ असावा. नितळ असावा. मग कोणतीही महिला असुद्या. तिचा सन्मान हा आपल्या आईचा सन्मान असेल. पण सध्या तुला पाहते रे या मालिकेतील मुख्य अभिनेत्री गायत्री हिला एका पुरुषांनी नाहीतर चक्क माहिलेन अश्लील मेसेज केला आहे.
यावर गायत्री नाही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गायत्री दातारला सोशल मीडियावर वाईट अनुभव आला. एका महिलेने गायत्रीच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील मेसेज पोस्ट केला. या मेसेजचा स्क्रिनशॉट गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.
‘नुकताच हा मेसेज फेजबुक पेजवर वाचला आणि मला धक्काच बसला. हे असं बोलण्याची गरज आहे का ? हे बरोबर आहे का?,’ असं गायत्रीने लिहिलं. गायत्री ने केलेली भूमिका ही प्रेक्षकांना ही प्रचंड आवडली होती. तिच्या भूमिकेच खूप कौतुक झालं होतं. अनेक लोकांच्या मनात पोहचलेल्या अभिनेत्री वर एका महिलेने केलेला अश्लील मेसेज हा खूप खेददायक ठरत आहे.
तुला पाहते रे मालिका सध्या बंद झाली आहे मात्र गायत्री या गोष्टी मुळे चर्चेत आली आहे. तिला आलेल्या अश्लील मेसेज वर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. गायत्री एका नवीन कामाच्या तयारीत आहे. ज्या माहिलेनं हे कृत्य केलं तिच्या विरोधात आपण एकत्र येऊन आवाज उठवू असं तिच्या चाहत्यांना तिने आवाहन केले आहे.