Loading...

सकाळी गरम पाण्यात हळद मिसळून प्या आणि कमाल पहा!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

आपल्या सर्वांच्याच घरामध्ये हळद वापरली जाते. कधी खाण्यात, कधी सौंदर्य खुलवण्यासाठी तर कधी जखमेवर लावण्यासाठी. हळदीमध्ये Curcumin नावाचे रसायन असते. हे उष्ण आणि चवीला तिखट आणि कडवट असते. जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक गुण आहेत.

हळदीमध्ये असलेले रसायन शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी वापरले जाणाऱ्या एंझायम्सचे प्रमाण वाढवते. हे यकृतातील रक्त शुद्ध करण्यासाठी काम करते. रक्तप्रवाहाचे प्रमाण सुधारण्यामुळे हळद यकृताच्या आरोग्यासाठी चांगले आहे

Loading...

हळदीमधील लिपोपॉलिसाकाराईड अँटीबक्टेरीयल, अँटीवायरल, अँटीफंगल असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोज हळदीच्या दुधाचे सेवन पडसे होण्याचे प्रमाण कमी करते.

ह्यामध्ये असणारे आरोमॅंटिक टरमरॉन मेंदूमधील पेशींसाठी महत्वपूर्ण काम करते. दह्यामध्ये हळद आणि मध घालून तयार केलेला लेप चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावर तेज येते.

रक्ती मुळव्याधीच्या रुग्णांनी बकरीच्या दुधात हळद घालून त्याचे सेवन करावे. कावीळ झालेल्या व्यक्तीने ताक व हळद मिसळून प्यावे. आजकाल बऱ्याच लोकांना मुतखड्याचा त्रास होतो अशा लोकांनी ताकामध्ये हळद व जुना गुळ घालून त्याचे सेवन करावे.

हळदीचे पाणी पिण्याचे भरपूर फायदे

हळद ही पोटाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. हळदीमुळे पित्ताशयामध्ये पित्तरस निर्माण होण्यास मदत होते. पित्तरसामुळे पाचनशक्ती चांगली होते. यामुळे पाचनक्रिया सुरळीत राहते. जर तुम्ही खूप जंक फूड खात असाल तर तुम्हाला दररोज हळदीच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे.

Loading...

हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेंट्री गुण असतात ज्याचा शरीराला फायदा होतो. यासोबतच सांधेदुखीमध्येही हळदीचा फायदा होतो. ज्यांना आर्थराइटिसची समस्या आहे अशा व्यक्तींनी या पाण्याने आपल्या दिवसाची सुरूवात करावी.

हळद त्वचेसाठी वरदान मानले जाते. जर तुम्ही याचे सेवन केलेत तर तुमच्या त्वचेचा रंग उजळतो. हळदीमध्ये रक्त स्वच्छ करणारे घटक असतात. हळदीमुळे त्वचेमधील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. यामुळे त्वचा साफ, स्वच्छ आणि उजळ होते.

हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते.

-भक्ती संदिप

(Nutritionist in Foodvibes Grocers)

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.