Loading...

साताऱ्यातून उदयनराजे भोसले एवढ्या मतांनी पिछाडीवर

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

9 वाजे पर्यंत

महाराष्ट्रात विधानसभेचा धमाका चालू असताना साताऱ्यात विधानसभेसोबतच लोकसभा पोटनिवडणूकीचा धमाका सुरू होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवायचं ठरवलं. परंतू आज पहिला कल हाती आली तेव्हा( 9 वाजून 10 मिन) उदयनराजे भोसले 1089 मतांनी पिछाडीवर आहेत.

Loading...

साताऱ्यातील लढत अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवून या लढतीत चुरस निर्माण केली. शरद पवार यांच्या सभेने साताऱ्यात एक वातावरण निर्माण झालं. साताऱ्यातून उदयनराजेेंचा पराभव होणार म्हणजे, असं राष्ट्रवादीचे सगळेच नेते सांगत आहेत.

10:30 वाजे पर्यंत

महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून महाराष्ट्रात जनतेचा कौल कोणत्या पक्षाला मिळेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरू असून यात राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले 10 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. येथे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रचारसभेत लोकांच्या हितासाठी भाजपमध्ये गेल्याचे भोसले यांनी सांगितले होते. पण भोसले यांच्या या निर्णयावर त्यांच्याच पक्षांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यातील सभा गाजवली.

Loading...

धो धो पडणाऱ्या पावसात मतदारांच्या मनाचा ठाव घेणारं भाषण पवारांनी केलं आणि तिथेच साताऱ्यातील राजकारणाचं समीकरण बदललं अशी चर्चा सुरू झाली. पण उदयनराजे यांनी आपला विजय निश्चित असल्याचं भाकित केलं होते. गुरुवारी साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरू असून त्यात उदयनराजे 10 हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.

  • दुसऱ्या फेरीत २००० मतांनी पिछाडीवर आहेत. 
  • तिसऱ्या फेरीत उदयनराजे १०००० मतांनी पिछाडीवर 
  • उदयनराजे भोसले ३२ हजार मतांनी पिछाडीवर 
  • उदयनराजे भोसले ८१ हजार मतांनी पिछाडीवर

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.