Loading...

संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणणारे डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहिलेत साक्षात छत्रपती उदयनराजे भोसले.. !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

इतिहासाने दुर्लक्षिलेले मराठा साम्राज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या वादळी व्यक्तिमत्वाची खरी ओळख करून देण्यासाठीच डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जन्म झाला असावा असे सध्या सगळीकडे बोलले जात आहे. स्वराज्यातल्या ह्या सिंहाच्या छाव्यावर कायम अन्याय होत गेले. त्यामुळे अजूनही लोकांना त्यांच्या बद्दल फारशी माहिती नाही. त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून जगदंब क्रियेशन ह्या निर्मिती संस्थेने झी मराठी टीम सोबत ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ ह्या सिरीलची निर्मिती केली आणि प्रेक्षकांना संभाजी महाराज्यांच्या प्रेमात पाडले. कमी वयात त्यांनी गाजवलेल्या कर्तृत्वाची कहाणी पाहताना उर भरून येते.

एवढेच काय तर लहान लहान मुलांना ही सीरिअल घरोघरी एक संस्कार म्हणून दाखवली जात आहे. पण ह्या सीरिअलला मिळणाऱ्या यशात डॉ कोल्हे ह्यांचा मोठा सहभाग आहे. ते स्वतः शंभू राज्यांच्या भूमिकेत तर आहेतच पण ह्या सिरिअलच्या निर्मितीमध्ये देखील त्यांचा सहभाग आहे. जगदंब क्रियेशन ह्या प्रोडक्शन द्वारे डॉ अमोल कोल्हे या मालिकेच्या निर्मितीची सूत्रे चालवत आहेत. पण सुरुवातीला मात्र त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला.

Loading...

ऐतिहासिक सीरिअल मधून काही फायदा होत नसतो ह्या इन्व्हेस्टरच्या धोरणामुळे ह्या सीरिअल ला पैसाच मिळत नव्हता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका उत्तम वठवल्यावर शंभू महाराजांचा इतिहास लोकांपुढे मांडायचाच ह्या ध्येयाने डॉ अमोल कोल्हे ह्यांनी स्वतःच राहतं घर विकून पैसा उभा केला. आता ही सीरिअल ज्या अत्युच्च स्थानावर उभी राहिली आहे ते बघता अमोल ह्यांना त्यांनी केलेल्या त्याग बद्दल काहीच वाटत नाही. ते म्हणतात, “संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना आपण जे करतोय ते अगदीच सूर्या पुढे काजवा असल्यासारखं आहे”

संभाजी महाराजांचे कार्य सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या अमोल कोल्हे ह्यांना नुकताच ‘मराठी विश्वभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षावही होत आहे. पण ह्या उप्पर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली ती दस्तुरखुद्द छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांची. नुसत्या कौतुकवरच ते थांबले नाहीत तर , “जो पपर्यंत हा उदयनराजे आहे तो पर्यंत तुमची प्रॉपर्टी आणि तुमचे घर सोडा, तुमच्या दारातली वीट देखील विकायची गरज पडणार नाही, तुम्ही मालिका चालवू ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे.” असे आश्वासनही दिले.

Loading...

आता मराठी विश्वभूषण पुरस्कार आणि खुद्द छत्रपतींची शाबासकी असताना डॉ अमोल कोल्हे ह्यांना मागे वळून पहायची गरजच उरणार नाहीये हे नक्की..! समाजाला आपल्या धाकल्या धन्याचा गौरवशाली इतिहासास सांगण्याचे उत्तम कार्य करणाऱ्या डॉ अमोल कोल्हे ह्यांना स्टार १ मराठी तर्फे पुरस्कारासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!!

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर शेयर करायला विसरू नका !

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.