Loading...

जेव्हा भारताचे गृहमंत्री जवानांना खांदा देतात…

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

जम्मू-काश्मीरवरील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह बडगाम येथे पोहचले. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाला खांदा दिला. ANI मीडियाने एक विडिओ जारी केला आहे , ज्यामध्ये बडगाम मधील पुलवामा हल्ल्यातील शहिद CRPF च्या एका जवानाला खांदा देताना भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू -कश्मीरचे DGP दिलबाग सिंग दिसत आहेत. 

Loading...

एवढंच नाही तर, भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्य पाल मलिक आणि भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी देखील बडगाम मध्ये पुलवामा हल्ल्यातील CRPF च्या जवानांना श्रद्धांजली दिली.

शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह दुपारी 2 वाजता श्रीनगर येथे पोहचले. तेथून ते बडगामला गेले. असे म्हटले जात आहे की जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये हा दहशतवादी हल्ला हा शतकातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

Loading...

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून निषेध होत आहे. या हल्ल्यात शहीद जवानांची पार्थिवं ज्यावेळी आणण्यात आली तेव्हा सगळा देश हळहळला. या जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला, त्याआधी केंद्रीय गृहमंत्र्यांनी या पार्थिवांना खांदा दिला.

तसेच श्रीनगरमधील आर्मी बेस कॅम्पमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह जखमी सीआरपीएफच्या कर्मचार्यांना भेटले.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्याप्रकरणी आवश्यक ती संपूर्ण कारवाई केली जाईल, या कारवाईत कोणतीही कसूर केली जाणार नाही, असे या हल्ल्याबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह  काल म्हणाले होते.  हा हल्ला पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने केला आहे.

मी आणि संपूर्ण देश याचा निषेध करतो. या दहशदवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संपूर्ण देश एक झाला आहे. मी जनतेला आश्वस्त करु इच्छितो की, याप्रकरणी जी काही कारवाई केली जाईल, त्यामध्ये थोडीदेखील कसूर केली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. पुढील कारवाई कुठे करावी, त्याची वेळ काय असणार आणि ठिकाण कोणते असेल, त्याचे स्वरुप काय असेल, हे ठरवण्याची जबाबदारी आम्ही सैन्याकडेच सोपवली आहे, असे मोदींनी सांगितले आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.