भारतीय गुप्तचर संस्था RAW विषयी तुम्हाला ही माहिती कदाचित नसेल … वाचा काय आहे रॉ

0

खूप आधी एक चित्रपट आला होता – “एक था टायगर”; त्यात सलमान खान कसा आईएसआईची सगळी माहिती काढून घेतो आणि आपल्या देशाला पुरवतो हे आपण सगळ्यांनी माहिती आहे. पण सलमान खान कोणत्या संस्थेसाठी हे काम करतो तुम्हाला माहिती आहे का? रॉ. Research and Analyzing Wing. भारताची एक गुप्त शाखा जी काम करते देशाच्या संरक्षणासाठी. दिल्लीच्या प्रगती विहारात नेशनल इंफोर्मेटीक सेंटर आणि सेन्ट्रल ब्युरो ऑफ इंवेस्टीगेशन यांच्या मोठ मोठ्या शासकीय इमारती उभ्या आहेत ज्यांमध्ये एक इमारत आहे ज्यावर कोणते नाव लिहिलेले नाही, नाही ही तिच्याबद्दल माहिती देणारे फलक तिथे लागले आहे. तीच इमारत आहे रॉची. संपूर्ण देशांवर नजर ठेऊन असणाऱ्या रॉवर आम्ही नजर ठेवली आणि त्याबद्दलचा का स्पेशल रिपोर्ट.

भारताची राजधानी नवी दिल्ली येथील प्रगती विहारात तुम्हाला ही इमारत दिसेल पण तुम्हाला त्याबद्दल माहिती देणारं कुणीच मिळणार नाही. या इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कोटवर ना त्यांचं नाव असते ना त्यांचा औदा. गुप्तरीत्या काम करून देशासाठी हितकारक गोष्टी करणे हेच यांचं उद्दिष्ट. आपली ही गुप्तचर संस्था एकदम तशीच काम करते जशी अमेरिकेची सीआईए आणि इज्राईलची मोसाद आहे पण रॉच्या क्रियाकलापा बद्दल कुणालाच काहीच माहिती नसते.

तुम्हाला माहिती आहेच कि प्रत्येक राष्ट्राचा शासकीय कार्यकाळ हा जगजाहीर आहे; अहो –सैन्य सुद्धा आपल्या सैन्याचा, लढायांचा लेखा-जोख लिहून ठेवतो जेणेकरून येणाऱ्या पिढीला कळावं कि आपल्यासाठी सैनिकांनी काय केलं आहे पण रॉच्या कारनाम्यांची सूत्रे, बातम्या कधीच कुणाच्या हाती लागत नाही आणि त्यांच्या कामासाठी त्यांना कुणी शाबाशीही देत नाहीत. आपल्या देशातील हे असे सैनिक आहे ज्यांच्या किस्से एक तर त्यांना माहिती असतात आणि त्या नंतर त्यांच्या शत्रूंना. रॉ आपल्या देशाचा इतका गुप्त विभाग आहे कि यांचा वार्षिक बजेट काय आहे हे सुद्धा सामान्य माणसाच्या समोर आणलं जात नाही. संसादेकडेही याची काही माहिती नसते; संपूर्ण देशात एकाच माणसाला ही गोष्ट माहिती असते, आपले अर्थ मंत्री.

रॉचे किती कर्मचारी आहे, ते कोण कोणत्या देशात सक्रीय आहेत आणि कोणत्या मिशनवर काम करत आहे ही माहिती फक्त त्या चार भिंतीच्या आत आहे आणि त्यांच्या भिंतीला कान सुद्धा नाहीत. धर्मो रक्षति रक्षित या सूत्रावर अवलंबन करणारी रॉचे महत्त्वाचे काम आहे देशाच्या “आर्थिक, राजकीय आणि सैन्य फायद्यासाठी दुसऱ्या देशात गुप्तहेरी करणे”. दुसऱ्या देशात काम करण्यासाठी या गुप्तहेरी संस्था खूप पैसे देतात. द्यायलाही पाहिजे –आपल्या जीवावर खेळून माहिती काढणे काही ऐऱ्या;गैऱ्याचे काम आहे होय? यांच्या कामाची कधीच सार्वजनिक पातळीवर प्रशंसा झाली नाही तरही त्यांना काही वाईट वाटत नाही कारण त्यांच्या डोक्याच फक्त एकच विचार असतो – देशाचे हित.

इंटेलिजेन्स एजन्सीच्या इतिहासावर नजर टाकली असता आपल्याला दिसून पडते कि आजपासून जवळपास १८५ वर्षाआधी, जेंव्हा इस्ट इंडिया कंपनी भारतात कार्यरत होती तेव्हा जगातील पहिल्या-वहिल्या इंटेलिजेन्स एजन्सीची स्थापना केली होती आणि तिचे नाव ठेवण्यात आले आईबी म्हणजेच इंटेलिजेन्स ब्युरो. भारतीय लोकांवर नजर ठेवण्यासाठी इंग्रजांनी याचा निर्माण केला होता. जेंव्हा इंग्रजांना वाटलं कि रशिया ब्रिटीश इंडियावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे तेव्हा या इंटेलिजेन्स एजन्सीला रशियाच्या विरोधात सक्रीय करण्यात आले पण मग रशियाने काही हल्ला केला नाही तर इंग्रजांनी भारतीय क्रांतीकारांच्या विरोधात गुप्तहेरी करण्यासाठी या इंटेलिजेन्स एजन्सीचा वापर करायला सुरुवात केली.

असं म्हटल्या जाते कि सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधींच्या सभोवतालाही खूप सारे गुप्तचर फिरत रहायचे. दुसऱ्या विश्वयुद्धात या इंटेलिजेन्स एजन्सीने (आईबीने) म्यानमारमधून जपानियांच्या वायरलेस संदेशांना रेकॉर्ड केलं होतं. स्वातंत्र्यापूर्वी आईबीने आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि सगळे संदेश मिटवून टाकले. १५ ऑगस्ट १९४७ नंतर आईबीची सूत्रे सांभाळली संजीव पिल्लईने. स्वातंत्र्यानंतर चीन आणि पाकिस्तानच्या घुसखोरींना आणि महात्मा गांधींच्या हत्तेला आळा घालण्यात असमर्थ राहिली आणि नेहृजींनीही वेळेपूर्वीच नवीन इंटेलिजेन्स एजन्सी निर्माण करू शकले नाही पण इंदिरा गांधींनी हे काम पूर्ण केलं.

त्यांना माहिती होतं कि दुसऱ्या देशाची गुप्त माहिती काढून त्यांचे मिशन निष्क्रिय करणे यातच देशाचे हित आहे आणि म्हणून २१ सप्टेंबर १९६८ला रॉचे गठन करण्यात आले आणि रामेश्वर नाथांना रॉचे डायरेक्टर बनविण्यात आले. आता मजेदार गोष्ट ही कि रॉच्या निर्मितीनंतरही याबद्दल कुणालाच काहीच माहिती नव्हती पण दिल्लीच्या अशोक रैना नावाच्या पत्रकाराने या एजन्सीची पडताळणी केली आणि १९८१ मध्ये एक पुस्तक प्रकाशित केली “इनसाइड रॉ” आणि तेव्हा सगळ्यांना कळले कि भारतासाठी रॉ नावाची एक सिक्रेट एजन्सी काम करत आहे.

तसं तर त्यांचे मिशन कधी लोकांच्या समोर येत नाहीत पण कधीकधी कोणत्या पत्रकार एखादी घटना छापून देतो. उदाहरनार्थ सन १९७१मध्ये रॉच्या लोकांनी पाकिस्तानच्या गुप्त संदेशाला डिकोड करून त्यांच्या कराचीतील जहाजांना निष्क्रिय केले होते. तसंच १९९१ मध्ये, कारगिल युद्धा अगोदर रॉने एलओसीवरील हालचालीचे फोटो तत्कारील रक्षामंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना पाठविले आणि भारत सरकारने तातडीने घुसखोरांना काढून टाकण्यासाठी मार्ग काढला. अनेक कारनामे आहेत गुप्त एजन्सीचे जे एका लेखात सांगणे शक्य नाहीच आणि त्यापेक्षा तर ते कारनामे जास्त आहे जे आपल्या समोर आलेच नाहीत आणि देश हितासाठी ते संन्या माणसासमोर नाही आले तर तेच चांगलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी पडद्या आड काम करण्याऱ्या या सैनिकांना माझा आणि टीम स्टार मराठीचा सलाम. जय हिंद.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!