Loading...

महाराष्ट्रातील एका गरीब घरातील मुलाची इसरो मध्ये प्रशिक्षण विद्यार्थी म्हणून निवड !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

ठरवलं की मनात जे येतं ते पूर्ण करण्याची धमक अंगात धुमसत असते नुसतं. गरिबी ही परिस्थिती च्या आड कधीच येत नाही. फक्त सगळ्यांची सकारात्मक सोबत आणि मार्गदर्शन असलं की गोष्ट पूर्णत्वाला नेण्यास वेळ लागत नाही.चांद्रयान -२ मध्ये तो ही प्रशिक्षण विद्यार्थी म्हणून त्याची इसरो मध्ये निवड झाली. आईची अपार मेहनत आणि वंदेश या पालघर मधील मुलाची इचछाशक्ती फळास आली आहे. त्याचं सगळीकडून प्रचंड कौतुक होत आहे. स्वप्न पूर्ण करण्याच्या नजराण्याची गोष्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.

Loading...

पालघर तालुक्यातील मायखोप (केळवे पूर्व) येथील वंदेश राजेश पाटील या २५ वर्षीय तरुणाने अत्यंत गरिब परिस्थितीत आईच्या अपार मेहनतीच्या आणि स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर अहमदाबाद येथील अंतरिक्ष अनुसंधान केंद्रात (इसरो) झेप घेतली आहे. चांद्रयान २ अवकाशात झेपावत असतांना वंदेशच्या हातात आपली इसरोमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्याचा मेल आल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

देशाला अंतरिक्ष संशोधनातील महत्त्वपूर्ण माहिती मिळवावी माहिती तंत्रज्ञानात आपण नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करावी, यासाठी इसरोमधून देशातील अंगी गुणवत्ता आलेल्या तरुणांना इसरोच्यावतीने नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातात. वंदेशची सन २०१७ मध्ये हुकलेली संधी पुन्हा प्राप्त झाल्यानंतर सोडायची नाही. ही मनाशी बांधलेली पक्की खूणगाठ प्रत्यक्षात उतरविण्यात त्याला यश मिळाल्याने तो खूपच आनंदित झाला आहे. आपल्या देशाला माहिती तंत्रज्ञानबाबत स्वयंपूर्णतेकडे नेण्याबाबत आपला थोडा का होईना खारीच्या वाट्याचा हातभार लागेल या कल्पनेनेच त्याला आकाश ठेंगणे वाटू लागले आहे.

Loading...

पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकाच्या पूर्वेला असलेले मायखोप या छोट्याशा गावात वंदेश आपली आई व दोन भावासह राहतो. दहा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. एका झोपडीत राहणाऱ्या या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आपल्या कुटुंबाचा डोलारा ढळू द्यायचा नाही ही खूणगाठ मनाशी बांधून त्याच्या आईने श्राद्ध कार्यक्र माचे सोपस्कार पूर्ण केल्यावर डोक्यावर माश्यांची टोपली आणि हातात भाजीपाला घेऊन परिसरात विक्रीच्या व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून त्या माउलीने आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले.

वंदेश याने वाणगाव आयटीआयमधून इन्फरमेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स चा अभ्यासक्रम पूर्ण केला. एप्रिल २०१७ मध्ये ऑनलाइनवर अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्र (इस्त्रो) मधून टेक्निशियन भरती ची जाहिरात त्याच्या वाचनात आली. त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यातही आले, मात्र दुर्दैवाने त्याची संधी हुकली. प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्रीचा हात असल्याचे सांगितले जाते, माझ्यामागे माझ्या आईची अपार मेहनतीचा हात असल्याने मी यशस्वी होऊ शकलो. – वंदेश पाटील, यांच म्हणणं आहे..

जर प्रयत्न केले तर आपण कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकतो. प्रत्येक गोष्ट यशस्वी पणे पार पाडू शकतो. कामात सातत्य असणं खूप गरजेचं असतं. तेच सातत्य वंदेश पाटील या मुलाने दाखवलेलं आहे. त्याचं सगळीकडे भरपूर कौतुक होत आहे. देशाच्या वैज्ञानिक प्रगती मध्ये त्याचा हातभार लागत आहे. या साठी त्याला त्याच्या आईचा आणि नातेवाईक यांचा भरपुर मदत मिळाली आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.