विजय मल्ल्या म्हणतो मी चोर नाही ! चोर तर चोर वरून शिरजोर !

0

क्रिकेटवर्ल्डकप सध्या इंग्लड मध्ये सुरू आहे. फायनल मॅच बाकी आहे. अनेक भारतीय चाहते सध्या इंग्लड मध्ये क्रिकेट पाहायला थांबले आहेत. सेमीफायनल ला भारत हरल्यावर मात्र काही भारतीय चाहते भारतात परतले आहेत. काही टीम वर्ल्ड कप च्या बाहेर गेल्या आहेत. त्यात वेस्टइंडिज सुद्धा आहे. वेस्टइंडिज चे खेळाडू मात्र अजूनही इंग्लड मधेच आहेत. ख्रिस गेल सुद्धा सध्या इंग्लड च्या सफरिचा आनंद घेत आहे.

यात त्यानं विजय मल्ल्या ची भेट घेतली होती. आणि ट्विटरवर फोटो देखील ट्विट केला आहे. त्याच्यावरून अनेक लोकांनी ट्रोल केलं. भारतीय लोकांच्या मनामध्ये विजय मल्ल्या हा एक चोर आहे. कारण त्याने 9000 हजार कोटी रुपये बुडून भारतीय बँकेची चोरी केली होती.

मल्ल्याने लिहिले आहे, की माझा मित्र आणि युनिव्हर्स बॉसला भेटून आनंद झाला आहे. मला काहीजण चोर म्हणतात. पण त्यांनी आपल्या बँकाना विचारावे, गेल्या वर्षभरापासून मी सर्व पैसे द्यायला तयार आहे. त्यांना वारंवार तशी विनंतीही केली. मात्र, बँक पैसे का घेत नाही. त्यानंतरच मला चोर म्हणायचा निर्णय घ्यावा. तुम्हीच ठरवा नेमकं चोर कोण?

 

भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने एक ट्विट करत तुम्ही ठरवा चोर कोण असे म्हटले आहे. यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्याचे उत्तर शोधणं जरा कठीण आहे.

लंडनमध्ये राहत असलेल्या विजय मल्ल्याचे क्रिकेटप्रेम सर्वांनाच परिचीत आहे. त्याने अनेकवेळा भारतीय संघाचे सामने पाहिले आहेत. लंडनमध्ये वेस्ट इंडिजचा धडकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने विजय मल्ल्याची भेट घेतली. विजय मल्याच्या भेटीचा फोटो गेलने सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी गेल आणि मल्ल्याला चांगलेच ट्रोल केले. विजय मल्ल्यानेही गेलने पोस्ट केलेल्या फोटोला रिट्विट करत हे वक्तव्य केले आहे. मल्ल्या भारतातील बँकांचे 9000 हजार कोटी घेऊन फरार झाला आहे.

विजय मल्ल्या हा मागची भारताची मॅच पाहायला आला होता. तेव्हा तेथील भारतीय यांनी त्याला चोर चोर म्हणत विडिओ काढून व्हायरल केले होते. मल्या सध्या फरार आहे. आणि भारतीय बँकेचे 9000 हजार कोटी सुद्धा सध्या फरार असल्या सारखेचं आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!