या व्हॅलीला जर एक वेळ भेट दिली तर तुम्ही विसरून जाल कामाचा ताण !

0

आपण शहरात राहतो, रोज सकाळ झाली की कामाला लागतो, ६-४९ ची लोकल पकडली तरच ऑफिसला वेळेवर पोचतो, नाहीतर लेटमार्क. त्यासाठी डोळ्यावर झोप असताना गजर बंद करून कसं तरी डोळे बंद असतानाच सकाळी उठायला लागतं, घाई घाईत दात घासून कावळ्याची अंघोळ करून कपडे घालता घालता नाश्ता करून चहा ढोसायला लागतो आणि पळत पळत ती ६-४९ ची लोकल पकडायला लागते. ती जर चुकली तर मात्र पुढे ट्रॅफिक मध्ये अडकून ऑफिसला उशीर होणार ह्याचं सतत टेन्शन.

अहो हे एखाद्यावेळी असेल तर ठीक, पण हे तर रोजचंच असतंय की. ऑफिसमध्ये दिवसभर काम करून संध्याकाळी लोकल पकडायची म्हणजे एक दिव्यच असतं, खरं का खोटं? वर्षानुवर्षे आपण सगळे अशाच धक्का धक्की च्या प्रवासाला तोंड देत असतो, डोक्यात वेळेत पोचायचं ह्याचा विचार, घरातले आणि ऑफिसमधले दोन्ही प्रश्न कसे सोडवायचे ह्याची गणितं चालू असतात. एक सेकंद सुद्धा मनाला शांतता नसते, किंवा शरीराला उसंत मिळत नाही. सुट्टीच्या दिवशी घरातली आठवडाभर राहिलेली कामं आपल्यालाच करायची असतात.

चार दिवस सुट्टी काढायलाच पाहिजे, वर्षभर एवढा जीवाचा आटापिटा करायचा तर मग चार दिवस तरी स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, निवांत , शांत , ह्या सगळ्या धावपळीपासून जर दूर, निसर्गाच्या आल्हाददायक वातावरणात वर्षातून एकदा तरी जायलाच पाहिजे. अहो एकदम फ्रेश होतो आपण. म्हणून कुठंतरी सुट्टी काढून जायलाच पाहिजे. पण जायचं कुठं? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो.

एक आहे असं ठिकाण, जे तुम्हाला देईल खरा आनंद, निसर्गाचं वेगळेपण तिथं तुम्हाला अनुभवायला मिळेल. अपल्याच देशात अशी असंख्य ठिकाणं आहेत जी आपल्याला माहिती नाहीत, तिथलं वेगळेपण आपण अनुभवलं नाही. खूपच सुंदर आहेत ती सगळी स्थळं, त्यातलंच एक म्हणजे ‘वाईचीन व्हॅली'(Waichin Vally ).

हिमाचल प्रदेश म्हणजे सुंदरता आणि निसर्गाने नटलेला प्रदेश. ह्याच हिमाचालमध्ये ही ‘वाईचीन व्हॅली’ आहे. सगळीकडे उंच उंच पर्वत, हिरवेगार गालिचे पांघरलेले, पर्वतांच्या खाईमध्ये उंच उंच झाडांची घनदाट जंगलं. हिरवीगार शेतं, आणि ह्या दिवसात ह्या हिरवळीवर पसरते बर्फाची पांढरी शुभ्र चादर. आकाशातून ह्या उंच उंच पर्वतांवर सतत होत असतो बर्फाचा शिडकावा.

डोळ्याला आल्हाद दायक वाटणारं हे दृश्य म्हणजे रोजच्या धकाधकीच्या आयुष्य काहीतरी वेगळं अनुभवल्याचं सुख. ह्या ताज्या तवान्या हिरव्या गार हिरवळीवर दुपारच्या भर बाराच्या उन्हात बसून सुद्धा तुम्हाला त्या सूर्याचा प्रखरपणा जाणवणार नाही इतकं आल्हाद दायक वातावरण. आपल्याकडच्या दमट हवामानात आणि लोकलमधल्या प्रवासात अंगाला दरदरून घाम फुटतो, अगदी कपडे ओले होतात. पण इथं घामाचं नाव पण काढता येणार नाही.

हयाच व्हॅलीला मॅजिक व्हॅली सुद्धा म्हणतात. म्हणूनच ह्या वातावरणात चार दिवस आपल्यावर मॅजिक झाल्यासारखं वाटेल. डोक्यात कुठले विचार येणार नाहीत. मन अगदी शांत शांत होईल. हिमाचल प्रदेश मधल्या मलाणा ह्या गावापासून ४ किलोमीटर दूर ह्या पर्वत राजीत जाण्यासाठी ट्रेकिंगचा अनुभव सुद्धा तुम्हाला घेता येईल.हे आगळं वेगळं निसर्ग सौंदर्य अगदी जवळून न्याहाळता येईल. मग आता वाट कसली पाहता? चार दिवस मज्जा करा, सुट्टी काढा आणि अनुभवा हे आपल्याच भूमीवरचं स्वर्ग सुख. Waichin Vally .

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!