जुन्या रूढी परंपरा मोडीत काडून या दांपत्यांनी घडवला इतिहास !

0

दैनंदिन आयुष्यात अनेक बातम्या आपण वाचतो, पाहतो आणि ऐकतो. काही बातम्या माहिती देता, काही मनोरंजन करतात तर काहींमुळे अंगावर काटे उभे होतात. माझ्याही वाचण्यात एक अशी बातमी आली जी वाचल्यावर मी देखील स्तब्ध्तेनेते उभा राहिलो. तसं काम करण्याला आठवून सन्मानाचे दोन शब्द ओठांबाहेर पडले. ही गोष्ट आहे सांगली मधील सोनाली पाटील, संतोष पाटील आणि उमेश पाटील यांच्या लग्नाची.

गोष्ट आहे दोन वर्षापूर्वीची. कोल्हापूरच्या इचलकरंजी मधील सोनाली दत्तात्रय पाटील हिचे लग्न सांगलीच्या शिरगावातील संतोष नामदेव पाटील यांच्याशी झाला. एकमेकांना एक-दुसऱ्याची साठी लाभली. प्रेमाची बंधन जुडली. संसार थाटला आणि आता त्यांना ६ महिन्यांचा मुलगी देखील होती. पण देवाला सोनालीचे सुख पाहून झालं नाही आणि तिच्या घरमालकाचा अकाली मृत्यू झाला.

सोनालीवर तर दुःखाचा डोंगराच कोसळला. सोनालीसमोर तिच्या आणि तिच्या मुलीच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिला. तिच्या माहेरच्या लोकांना देखील आपल्या लेकीचे होणारे हे हाल पाहून होत नव्हते आणि अश्या वेळी तिच्या तिच्या सासरच्या लोकांनी एक धाडसी निर्णय घेतला. संतोषचा लहान भाऊ, उमेश पाटील याच्याशी सोनालीचा विवक करून देण्याचा तो निर्णय. हाच असतो विचारातील फरक, उच्चशिक्षित आणि मंद लोकांच्या विचारांत.

संतोषच्या आईला म्हणजेच सोनालीच्या सासू राजश्रीताई पाटील यांनाही आपल्या सुनेची आणि नातीची तितकीच चिंता होती जितकी तिच्या माहेरच्या लोकांना. धाकट्या मुलाचे अजून लग्न झाले नाही, त्याच्या बायकोने जर सोनाली आणि तिच्या मुलीला चांगली वागणूक दिली नाही तर? तर दोघींमध्ये चांगले नातेसंबंध राहिले नाही तर मग एका घराचे दोन घर व्हायला वेळ लागणार नाही, हा विचार त्यांच्या डोक्यात फिरतच रहायचा आणि मग त्यांच्या डोक्यात आपला धाकट्या मुलाचे आणि विधवा सुनेचे लग्न लावून देण्याचा विचार आला.

त्यांनी हा विचार सुनेसमोर आणि तिच्या माहेरच्या लोकांसमोर देखील मांडला. त्यांना महत्व पटवून दिलं, आणि सोनाली व तिच्या माहेरच्या लोकांनी आपला होकार कळवला. एकदम सध्या पद्धतीने उमेश आणि सोनालीचा लग्न सोहळा पार पडला आणि उमेश-सोनालीने आपल्या चिमुकली सोबत संसार सुरु केला. अंधारमय जीवनात पुन्हा एकदा नव्याने प्रकश पडला असून पाटलांचा घरची सून झाल्याचा आनंद आहे; अश्या भावना सोनालीने व्यक्त केल्या आहे.

इकीकडे जिथे गृहकलेष, भाऊबंदकी, पैसा-अडका यामुळे एका घरात दोन चुली पेटतात, एकट्या आईचा छळ केला जातो तिथेच दुसरीकडे पाटील कुटुंबासारखे लोकं आपल्यासमोर एक नवीन उदाहरण उभे करतात. सोनाली आणि उमेशच्या भविष्यासाठी स्टार मराठी परिवाराच्या शुभेच्च्या आणि पाटील कुटुंबाच्या या निर्णयाला सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!