चित्रपटात काम करणाऱ्या ‘दिग्गज’ आणि ‘इतर’ कलाकारांनी शूटिंग करताना वापरलेले कपडे , शूटिंग संपल्यावर जातात कुठे ?

0

तुमच्या आमच्या सारख्या सर्व सामान्य सिने प्रेक्षकांच्या मनात कधी न कधी हा एक प्रश्न तर हमखास येत असणार. की चित्रपट तयार होताना जे कलाकार मग ते नावाजलेले हीरो, हिरॉईन, असोत किंवा इतर जे सह कलाकार असतात त्यांनी वापरलेले जे सुंदर सुंदर कपडे असतात ते कपडे नंतर कुठे जातात ? ते कपडे त्याच लोकांना दिले जातात? का काय? कारण हीरो किंवा हिरॉईन आपले स्वतःचे कपडे चित्रपटात वापरत नाहीत. त्यांना तात्पुरते दुसरे कपडे करायला दिले जातात. ऐश्वर्या किंवा काही आणखी हिरॉईन गाण्याच्या वेळी प्रत्येक शॉट ला वेगळा वेगळा ड्रेस घालतात, मग इतके ड्रेस नंतर काय केले जातात? हा प्रश्नच पडतो ना आपल्याला.

ह्याची सहज चौकशी केली तर आपल्याला ह्या इतक्या कपड्यांचं नंतर काय होतं हे ही उत्तर आपल्याला मिळतं. मुख्य म्हणजे मोठे चित्रपट निर्माते सतत वेगवेगळे चित्रपट निर्मिती च्या कामात व्यस्त असतात. त्यांच्या पुढच्या चित्रपटांची सतत चालू असते. त्यात सतत वेगवेगळे कपडे आवश्यक असतात. त्यांचं बजेट सुद्धा आधीच ठरवलं जातं. पण आधीच्या चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर जे जे समान , कपडे, त्या चित्रपटात वापरले गेलेले असतात ते सगळे वेग वेगळ्या पेट्यांमध्ये ठेवले जातात आणि त्या पेट्यांवर त्या चित्रपटाचे नाव लिहिले जाते.

त्यात ठेवलेल्या कपड्यांची यादी त्यावर लावली जाते, आणि ह्या सगळ्या पेट्या प्रॉडक्शन हाऊस मध्ये ठेवल्या जातात. आणि पुढच्या काही चित्रपटांमध्ये हेच कपडे मुख्य कलाकार सोडून इतर कलाकारांसाठी पुन्हा वापरले जातात. कारण ते शूटिंग करताना थोडा वेळच वापरलेले असतात. म्हणून पुन्हा वापरले जातात. फक्त ते सह कलाकारांना वापरायला दिले जातात. असेच काही विशिष्ट प्रकारचे कपडे नाटकात सुद्धा परत परत वापरले जातात. काही वेळेला मुख्य दिग्गज कलाकार आपल्यासाठी कपडे खरेदी करताना आपल्या ड्रेस डिझायनर बरोबर स्वतः जातात. पण शूटिंग नंतर ते प्रॉडक्शन हाऊस मधेच जमा केले जातात. आणि पुन्हा दुसऱ्या चित्रपटाच्या वेळी वापरात आणले जातात.

काही मोठे चित्रपट निर्माते ह्या कपड्यांचा लिलाव सुद्धा करतात. आणि आलेले पैसे चॅरिटी साठी म्हणून वापरतात. असेच टी व्ही सिरीयल बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर कपडे वापरले जातात. पुढच्या एपिसोड मध्ये बदलून बदलून वापरले जातात. सेम मॅच किंवा कॉन्ट्रास्ट मॅचिंग करून ते कपडे वापरले जातात. काही टी व्ही सिरीयल चे निर्माते तर कपडे व्यापाऱ्यांशी कपड्यांचे कॉन्ट्रॅक्ट ठरवून ठेवतात. त्या त्या वेळी त्या त्या प्रसंगात वापरले जाणारे कपडे हे व्यापारी निर्मात्यांना पुरवतात, आणि शूटिंग झाले की परत घेऊन जातात. अशा पद्धतीने ह्या कपड्यांचा पुन्हा वापर केला जातो.

नाटकासाठी सुद्धा, देवांचे , राजे, प्रधान, शिपाई, पोस्टमन, न्यायाधीश , असे दुर्मिळ कपडे भाड्याने घेतले जातात आणि नाटकाच्या दौऱ्यानंतर ते पुन्हा त्या दुकानदारांना दिले जातात. अशी ही पद्धत आहे. पण चित्रपटांसाठी सगळं चमकणारं दाखवावं लागतं त्यामुळे प्रत्येक वेळी निदान मुख्य कलाकारांसाठी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. गाण्याच्या वेळी मागे डान्स करणाऱ्या लोकांना हे कपडे परत वापरले जाऊ शकतात. म्हणून प्रॉडक्शन हाऊस ची ही जबाबदारी असते.

म्हणजे आता हा प्रश्न तरी आपल्या सगळ्यांच्या मनात राहणार नाही की चित्रपटांच्या शूटिंग नंतर इतके कपडे जातात तरी कुठे??????

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!