तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त अणुबॉम्ब कोणत्या देशा जवळ आहे ?

0

अणू बॉम्ब हा शब्द उच्चारला की डोळ्या समोर फक्त हिरोशिमा आणि नागासाकीचे भयानक नरसंहाराचे दृश्य उभे राहते. पूर्ण नागासाकी आणि हिरोशिमा उध्वस्त झालं होतं. माणसं किडे मुंग्यांसारखी मेली होती, जळून खाक झाली होती. हाडामासाचे तुकडे सगळीकडे पसरले होते. इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या होत्या. नाती गोतीच उरली नव्हती. फक्त दोन अणुबॉम्बची ही करामत होती, पूर्ण जपान २५वर्ष मागे गेलं होतं. प्रचंड प्रमाणात नर संहार झाला होता, सगळ्या संपत्तीची धूळधाण झाली होती. जे जगले वाचले त्यांना खायला प्यायला काही नव्हते त्यामुळे त्यातले अनेकजण भुकेने तडफडून मेले. अणुबॉम्ब मधून पसरलेल्या विषारी वायूने अनेक मेले, काही जण शरीराला झालेल्या जखमांमुळे मेले. असंख्य लोक मारले गेले होते ह्या अणुबॉम्ब च्या हल्ल्यामुळे.

दोन देशातलं वैर हे कारणीभूत ठरलं ह्या एवढ्या मोठ्या हिंसेला . नुसती हिंसा नाही हा संहार होता. जो देश बलाढय तो आपली सत्ता स्थापन करायला आणि इतर लहान देशांना काबूत ठेवण्यासाठी अणुबॉम्बचा वापर करायचा. त्याला अणूयुद्ध म्हटलं जातं. त्यानंतर अनेक राष्ट्र एकत्र आली आणि अनेक प्रकारचे सामंजस्य करार झाले, आणि हे अणूयुद्ध परत कोणत्याही देशाने केले नाही. पण ज्या देशाकडे हे अणुबॉम्ब आणि सैन्य जास्त तो देश सगळ्यांवर वर्चस्व गाजवतो. म्हणून अणू बॉम्ब बनवायचे थांबले नाही. आपण सगळ्यात ताकतवान आहोत हे दाखवण्यासाठी मोठ्या अनेक राष्ट्रांनी अणुबॉम्ब बनवून ठेवले आहेत, ते कधीही त्याचा वापर करू शकतात. ही दहशत राहावी म्हणून काही राष्ट्रांनी ते धाक दाखवण्यासाठी तयार केले.

1.- सगळ्यात जास्त अणुबॉम्ब हे रशियाकडे आहेत, म्हणून आज रशिया हे सगळ्यात बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखले जाते. रशियाच्या वाटेला कोणी कधीच जात नाही. पण रशिया इतर राष्ट्रांच्या मध्ये जर युद्ध झालेच तर ते आपल्या मित्र राष्ट्राच्या बाजूने युद्धासाठी मदतीला उभे राहते त्यामुळे युद्ध रशियाच्या दहशतीमुळे आपोआप थांबायला मदत होते. राशियाकडे आत्ता ७००० अणुबॉम्ब तयार आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त अणुबॉम्ब राशियाकडे आहेत म्हणून त्यांची दहशत जगामध्ये जास्त आहे.

2.- त्या खालोखाल अमेरिकेचा नंबर लागतो. अमेरिका ६८००अणुबॉम्ब तयार करून शक्तीशाली राष्ट्र झालं आहे.सगळ्यात जास्त दहशत अमेरिकेची आहे , कारण अमेरिकेचे सैन्य सुद्धा खूप मोठे आहे. इतर आधुनिक शस्त्रे सुद्धा अमेरिकेकडे जास्त आहेत म्हणून रशिया आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्र महासत्ता म्हणून आज जगावर वर्चस्व गाजवत आहेत.

३.- नंतर फ्रांस चा नंबर लागतो . फ्रांस सुद्धा आधुनिक शस्त्रे आणि अणुबॉम्ब बनवुन तीसऱ्या स्थानावर आहे. फ्रान्सने स्वतःचे तंत्रज्ञान वापरून अणुबॉम्ब बनवले आहेत फ्रांसकडे आत्ता ३०० अणुबॉम्ब तयार आहेत.

४.- चीन सुद्धा महा सत्ता बनू पाहतोय , कारण चीन कडे २७० अणुबॉम्ब तयार आहेत आणि चीनकडे सगळ्यात जास्त आर्मी सुद्धा असल्यामुळे चीन महा सत्ता होण्यासाठी धडपड करतो आहे.

५.- इंग्लंड चा नंबर चीन नंतर आहे कारण इंग्लंडकडे आत्ता २१५ अणुबॉम्बचा साठा आहे. इंग्लंडची सुद्धा ताकत मोठी आहे. देश छोटा असला तरी अणुबॉम्बची दहशत आहे.

६.- पुढचा नंबर पाकिस्तानचा लागतो. १२५ अणुबॉम्बची शक्ती पाकिस्तानकडे आहे. बाकी सैन्य त्या मानाने कमी असले तरी अणुबॉम्ब मुळे पाकिस्तानचा दबदबा आहे.

७.- सातवा नंबर भारताचा आहे. ११५ अणुबॉम्ब तयार आहेत. भारत सुद्धा महा सत्तेची वाटचाल करतो आहे. कारण भारताकडे सैन्य खूप मोठे आहे. आणि त्या जोरावर भारत, चीन आणि पाकिस्तानवर दहशत ठेऊन आहे. शेजारी देश असून छोट्या मोठ्या कुरापती काढत असतात पण युद्ध करत नाहीत. कारण भारत सुद्धा आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे.

८.- आठव्या नंबरवर भारताचा मित्र देश म्हणजेच इस्रायल आहे. इस्रायलने स्वतःचे तंत्रज्ञान वापरून आधुनिक शस्त्रास्त्रे स्वतःची स्वतः च केली आहेत. आणि ८० अणुबॉम्ब बनवून स्वयंपूर्ण देश म्हणून जगात इस्रायल ची ख्याती आहे.

९.- उत्तर कोरिया हा देश कोणत्याही शेजारी देशांशी चांगले संबंध न ठेवणारा देश. हुकूमशाही असलेला देश. अणुबॉम्बची धमकी अमेरिकेलाही देणारा देश आहे. ‘किम जोंग उन’ हा उत्तर कोरियाच्या हुकूमशहा. कोणत्याही इंटरनॅशनल कराराला ना जुमानणारा हा हुकूमशहा . त्याने स्वतःच्या देशातील लोकांच्या तंत्रज्ञानाने नवीन नवीन संशोधन करून वेग वेगळे अणुबॉम्ब बनवतो आहे. हे त्याने आजपर्यंत घेतलेल्या अणू चाचण्यांवरून सिद्ध झालं आहे. हुकूमशाहीमुळे ह्या देशाकडे किती अणुबॉम्ब तयार आहेत हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही.

हे सगळे देश अणुबॉम्ब स्वतःच्या तंत्रज्ञानावर तयार करून शक्तिशाली देश म्हणून ओळखले जातात. भरताकडेही आता नवीन तंत्रज्ञान आले आहे आणि त्या जोरावर भारत महा सत्तेकडे यशस्वी वाटचाल करायला लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!